श्रीरामपूर : श्री. किशोर गाढे यांजकडून भारतीय मिडीया फौडेशनचे महाराष्ट्र कमेटीचे चेअरमन श्री. राजेंद्र वाघ यांनी मालेगांव शहरातील लॉकडाऊनच्या काळातील झालेल्या रेशन घोटाळा प्रकरणी चौकशी करावी या मागणीकरीता मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब कार्यालय, मालेगांव या ठिकाणी दिनांक 0७/१०/२०२० व दिनांक ०८/१०/२०२० रोजी सलग दोन दिवस भारतीय मिडीया फौडेशनच्या वतीने उपोषण केले. त्या उपोषणाची दखल घेता नायब तहसिलदार श्री. वाणीसाहेब, लिपिक सावणे व पुरवठा अधिकारी यांनी दिनांक १०/१०/२०२० रोजी या चौकशीस मौजे डाबली, पोस्ट काटी, ता. मालेगांव या गावात श्री. राजेंद्र वाघ यांना चौकशी कामी समक्ष हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. याबाबतची दवंडी देवून ग्रामस्थांना हजर राहणेबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार दिनांक १०/१०/२०२० रोजी सदरील अधिकारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यावेळी उपस्थित होते. यांच्यासमक्ष गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या चौकशीत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या पत्नी सौ. भारती राजेंद्र वाघ व आई निर्मला एकनाथ वाघ यांना मारहाण केली. तसेच श्रीमती निर्मला वाघ यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यांच्या या क्रुर कृत्याचा निषेध भारतीय मिडीया फौडेशन व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत भा.दं.वि. कलम ३५३ अन्वये कार्यवाही करावी, तसेच श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या कुटूंबियांतील लोकांना मारहाण केल्याबद्दल तसेच श्रीमती एकनाथ वाघ यांचेबरोबर लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याबद्दल पत्रकार संरक्षण कायद्यान्वये या गुंडांवर कार्यवाही करण्यात यावी. याचबरोबर श्री. राजेंद्र वाघ व त्यांच्या कुटूंबियांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून त्यांना कलम १६९ अन्वये आरोप मुक्त करण्यात यावे या मागणीचे निवेदन भारतीय मिडीया फौंडेशन व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात दिनांक २०/१०/२०२० रोजी देण्यात आले. सदरील दोन्ही निवेदन शिरस्तेदार श्री. डी. डी. गोवर्धने यांनी स्विकारले असून तुमच्या मागण्या वरिष्ठांना कळविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. निवेदनावर श्री. शेख बरकतअली, किशोर गाढे, अमीरभाई जहागिरदार, अस्लम बिनसाद, शेख फकीर महंमद, रमेश शिरसाठ, शब्बीरभाई कुरेशी, गुलाबभाई वायरमन, सचिन केदारी, गणेश ताकपिरे, अक्रम कुरेशी, अयाजअली शाह बाबा आदि पत्रकारांच्या सह्या आहेत.
Post a Comment