बुलडाणा - 21 ऑक्टोबर
बुलडाणा तालुक्यातील सैलानी जवळ एका शेतातुन जात असताना 15 ते 20 मोकाट कुत्र्यानी एका 9 वर्षीय मुलावर हल्ला चढविला व त्याचे लचके तोडत असताना त्यांने आरडाओरड केली ते ऐकून आई धावत आली असता आईवर सुद्धा कुत्र्यांनी हल्ला केला. यात 9 वर्षे मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झालेली आहे.ही घटना 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उंबरखेड़ शिवारात घडली आहे.
लातूर जिल्ह्यातील धर्मापुर येथील शेख तस्लीम मागील काही काळापासून सैलानी येथे आपल्या परिवारसह राहत आहे.सद्या ते रमेश शेवाळे यांच्या शेतात राहतात.आज 21 ओक्टोबरला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 9 वर्षीय मुलगा शेख अरमान काही किराणा सामान आणण्यासाठी सैलानी कडे जात असताना अचानकपणे 15 ते 20 मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला करत त्याचे लचके तोडले, आरडाओरड ऐकून त्याची आई नसीम बी बचावासाठी धावत गेली असता त्याच्यावर ही कुत्र्यांनी हल्ला केला यात तीही गंभीर जखमी झाली. त्याच्या मदतीला काही लोक धावत आले तेव्हा कुत्रे पळून गेले. गावातील लोकांनी त्यांना उचलून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरने शेख अरमान याला मृत घोषित केले तर आई नसीम बी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
Post a Comment