अब्दुल कलाम यांनी भारताची शान जगात उंचावली - पटारे , उर्दू शाळेमध्ये संयुक्त जयंती सोहळा संपन्न .

श्रीरामपूर (प्रतिनिधी) पूर्व राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या कर्तृत्वाने भारताची शान जगात उंचावण्याचे कार्य केले. भारताला बलशाली बनवताना त्यांनी पुस्तकांशी मैत्री केली. त्यांचे अग्निपंख हे पुस्तक मी दोनदा वाचले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कष्ट करून नावलौकिक प्राप्त केला. त्यांचे कार्य भारतातील सर्वांसाठी व येणाऱ्या पिढीसाठी दीपस्तंभासारखे आहे. वाचन प्रेरणा दिनापासून प्रेरणा घेऊन उर्दू शाळेने आयोजित केलेला आजचा सोहळा प्रशंसनीय आहे. सर सय्यद अहमदखान यांनी सामाजिक सुधारणेसाठी मोठे कार्य केले आहे. या थोर विभूतींचे स्मरण सतत होणे आवश्यक आहे असे अनमोल विचार शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी व्यक्त केले .

परमवीर शहीद अब्दुलहमीद नगरपालिका डिजिटल उर्दू शाळा नंबर पाच मध्ये थोर समाजसुधारक सर सय्यद अहमद खान व भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा जयंती सोहळा तसेच शालेय विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका वितरण व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंतांचा तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पटारे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाकभाई पठाण हे होते.व्यासपीठावर समाजसेवक कलीम कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक काँग्रेसचे प्रदेश सचिव सोहेल बारूदवाला, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव ॲड.समीन बागवान, शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर एहतेशाम शेख, इम्तियाज खान, बिलालशहा, हारुन शाह आदी उपस्थित होते .

आपल्या प्रमुख भाषणात पटारे यांनी शाळेच्या प्रगतीचे मुक्तकंठाने कौतुक करून प्रत्यक्षपणे जयंती सोहळा साजरा करून शाळेने समाजासमोर एक उदाहरण घालून दिल्याचे सांगितले . यावेळी बोलताना उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी शाळेसाठी सर्वतोपरी मदत शासनाकडून मिळवून देण्याचे आश्वासन दिले.ॲड.समीन बागवान व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रज्जाक भाई पठाण  यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . 

याप्रसंगी वाचन प्रेरणा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी कथा व उतारा वाचन केले . शाळेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना इक्रा हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले . तसेच इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या ताहेरा अतहरहसन रिजवी, फरहान बिलाल शाह व अल्फिया हारून शाह यांचा भेटवस्तू देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .शाळेला नेहमी सहकार्य करणारे सोहेल बारूदवाला यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सचिवपदी नियुक्तीबद्दल  व  ॲड. समीन बागवान यांची जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .शाळेच्या शिक्षिका शाहीन शेख यांनी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम तसेच मोहम्मद आसिफ यांनी सर सैय्यद अहमदखान यांच्या जीवनकार्याचा परिचय आपल्या व्याख्यानातून करून दिला.

शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये लॉक डाऊनच्या काळात शाळेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली .पालक व विद्यार्थी शाळेमध्ये येण्यास खूप आतुर आहेत .परंतु शासनाच्या आदेशाशिवाय नियमित शाळा सुरू करता येत नाही असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन मोहम्मद आसिफ यांनी केले तर आभार फारुक शाह यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वहिदा सय्यद, नसरीन इनामदार, जमील काकर, शाहीन शेख, अस्मा पटेल, निलोफर शेख,बशीरा पठाण,मिनाज शेख, एजाज चौधरी, सदफ शेख, रिजवाना कुरेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले .


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget