बुलडाणा - 21 ओक्टोबर
बुलडाणा तालुक्यातील भडगाव येथे कार्यरत तलाठी संजय जगताप यांनी महसला तलाठी कार्यालयात कार्यरत कोतवाल योगेश सपकाळ यालाच नव्हे तर सर्व कोतवालांना आई,बहिनी व बायका वरुण अश्लिल भाषेत मोबाइलवर शिवीगाळ केली तसेच विदर्भवाद्या हो आत्महत्या करने तुमच्या नशीबी आहे,,आत्महत्या करा,पंचनामा करुण तुम्हाला 1 लाख देऊ, अशी मागरूरीचा भाषा करणाऱ्या तलाठी संजय जगतापला आखेर निलंबित करण्यात आले आहे.
17 ओक्टोबर रोजी तलाठी संजय जगताप याने फोनवार दारुच्या नशेत सर्वच कोटवालांना अश्लील शिवीगाळ केली होती.या घटनेला निंदनीय सांगत हा प्रकार थांबला पाहिजे म्हणून महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा बुलडाणाच्या वतीने जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी एकत्र येऊन 19 ऑक्टोबरला बुलडाणा तहसील कार्यालयात प्रदर्शन करुण आपली मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दिले होते.निवेदनात तलाठी संजय जगताप यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली होती.या गोष्टीला तहसीलदार रूपेश खंडारे यांनी गंभीरतेने घेऊन तात्काळ तलाठी संजय जगतापला निलंबित करण्यासाठी प्रस्ताव तैयार करुण उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांना पाठविल असता उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी तलाठी संजय जगतापला शासकीय कर्तव्यात कसूर व गैरवर्तन केल्याने एका आदेशाने निलंबित केले आहे.
Post a Comment