जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आश्वासना नंतर आंदोलन मागे
बुलडाणा - 26 ओक्टोबरको:- रोनाच्या दहशतीतही मोठी जोखीम पत्कारून सेवा बजावणाऱ्या नर्स, ब्रदर, कंत्राटी सफाई कामगार यांचे गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वेतन रखडले आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुलडाणा जिल्हा रुग्णालयातच आज 26 ऑक्टोंबर रोजी जिल्हाप्रमुख मदनराजे गायकवाड यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले असता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात व जगात गेल्या 7 महिन्यापासून कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या कोरोना काळात डॉक्टर, नर्स, ब्रदर, कंत्राटी सफाई कर्मचारी जीव मुठीत घेऊन कोविड योद्धे म्हणून कोरोना संशयीत व इतरही आजारग्रस्तां साठी सेवा देत आहे. मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून त्यांचे वेतन थकल्यामूळे त्यांना सण उत्सवाच्या काळात प्रपंच सांभाळणे कठीण झाले आहे. या कोरोना योद्धयांसमोर निर्माण झालेला आर्थिक पेचप्रसंग तात्काळ सोडविण्याची आग्रही भूमिका घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी कार्यकर्त्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयात धडक देऊन तेथेच ठिय्या मांडला. दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी आंदोलकांना भेट देऊन चर्चा केली. काही तासातच प्रलंबित वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे तडस यांनी आश्वासित केल्याने तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रमुख मदन राजे यांनी दिली. यावेळी मनसे जिल्हा उपप्रमुख बंटी नाईक,शहर प्रमुख मनोज पवार, अनिल मोरे, विशाल गायकवाड, पवन सुरडकर, मनीष सोनवाल, अमर लोखंडे, अनिल वाघमारे,गौरव इंगळे आदी उपस्थित होते.
Post a Comment