संक्रापुर (प्रतिनिधी )-राहुरी तालुक्यातील शेतकर्यांचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले असुन द्राक्ष डाळींब पेरु आंबा या फळबागांचेही नुकसान झालेले असुन फळबागाचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील फळबाग शेतकऱ्यांनी केली आहे. नामदार प्राजक्त दादा तनपुरे आमदार लहु कानडे यांना दिलेल्या निवेदनात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी पुढे म्हटले आहे की अति पावसामुळे डाळींब पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले फळे खराब झाल्यामुळे ती रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली खराब हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांचेही नुकसान झालेले आहे असे असाताना केवळ भुसार मालाचेच पंचनामे करण्यात आले असुन आम्हाला केवळ भुसार पिकाचेच पंचनामे करण्याचे आदेश असल्याचे अधिकार्यांनी सांगीतल्यामुळे फळबाग उत्पादकांनी नामदार प्राजक्त दादा तनपुरे व आमदार लहु कानडे यांच्याकडे दाद मागीतली आहे शासनाने फळबाग शेतकऱ्यानाही नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला असताना राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यावरच अन्याय का असा सवालही फळबाग उत्पादक रविंद्र खटोड देविदास देसाई नारायण जाधव दिलीप जाधव सुभाष दाते महेबुब शेख दिपक पांढरे सतीश देठे नबाजी जगताप लक्ष्मण चव्हाण वसंत लोखंडे अशोक टाकसाळ रोहीदासा खपके संजय जगताप आदिसह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
Post a Comment