बेलापुर (प्रतिनिधी )- विविध गुन्ह्यात पोलीसांना हवा असलेल्या गुन्हेगाराच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे ती गाडी व गावठी कट्टा पोलीसाच्या ताब्यात मिळाला असुन ती गाडी पोलीस स्टेशनला आणणार्या व्यक्ती विरुध्द आर्म अँक्टचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांना मागे घ्यावा लागला. या बाबत समजलेली माहीती अशी की पोलीसांना खंडणी मारामारी दहशत पसरविणे धमकावणे अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात हवा असणारा गुन्हेगार आकाश अशोक बेग उर्फ टिप्या बेग याच्या गाडीचा श्रीरामपुर बेलापुर रस्त्यावर असणार्या मोसंबी बागेजवळ अपघात झाला त्या वेळी दोन्ही गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या वेळी दोन्ही गाडी चालकांची आपापसात समेट झाली
त्यामुळे कुणीही पोलीसांकडे तक्रार दाखल केली नाही दरम्यान दोन्ही अपघातग्रस्त गाड्या दुरुस्तीसाठी आणत असतानाच एक गाडी गुन्हेगार टिप्या बेग याची असल्याची बातमी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीराट यांना समजली त्यांनी तातडीने ती गाडी ताब्यात घेण्याचे आदेश दिले त्या वेळी बेलापुरातील नितीन शर्मा हा ती गाडी घेवुन येत असताना पोलीसांनी त्यास ताब्यात घेतले त्यावेळी गाडीत गावठी कट्टा आढळला त्यामुळे पोलीसांनी नितीन शर्मा याचेवर आर्म अँक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली हे भाजपाचे कार्यकर्ते सुनिल मुथा यांना समजताच त्यांनी ग्रामस्थासह बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली नितिम शर्मा हा केवळ अपघातग्रस्त गाडी आणत होता त्यामुळे त्याचेवर खोटा गुन्हा दाखल करु नका नाहीतर गाव बंद ठेवु रस्ता रोको करु असा ईशारा देण्यात आला भाजपाचे प्रकाश आण्णा चित्ते व सुनिल मुथा यांनी अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशी संपर्क साधुन खोटा गुन्हा दाखल करु नये
अशी मागणी केली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे व उपविभागीय अधिकारी राहुल मदने यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्याशी चर्चा केली व नितीन शर्मा याचा जबाब घेवुन सोडून देणार असल्याचे सांगितले त्यामुळे सुनिल मुथा व प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणारे आंदोलन स्थगीत करण्यात आले त्या नंतर पत्रकाराशी बोलताना पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट म्हणाले की गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्यास पाठीशी घालण्याचा कुणीही प्रयत्न करु नये आकाश बेग उर्फ टिप्या बेगवर वेगवेगळ्या स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्या गाडीला अपघात झाल्याचे समजताच श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने तातडीने ती (एम एच ०२ ऐ पी ९२१६ )गाडी ताब्यात घेवुन झडती घेतली असता गाडीत तीन राऊंड व एक गावठी कट्टा आढळला असुन तो जप्त करण्यात आला आहे फरार झालेल्या गुन्हेगाराचा शोध सुरु असुन लवकरच त्याला अटक करु असा विश्वासही पोलीस निरीक्षक बहीरट यांनी व्यक्त केला.
Post a Comment