श्रीरामपुर (प्रतिनिधी) सरकारने भारतातील हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना इन्कम टॅक्स रिटर्न (दोन लाखापेक्षा अधीक)बंधनकारक करून एक प्रकारची जाचक अट लावली आहे.इस्लाम धर्मियांमध्ये हज करणे हे एक मूलभूत कर्तव्य आहे त्यामुळे मुस्लिम समाजातील लोक किमान एकवेळ तरी हज यात्रा व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात त्यासाठीच शेतमजूर,मोलमजुरी, शेतकरी इतरांच्या घरातील धुनी भांडी यासारखे छोटे मोठे काम करणारे सर्वसामान्य लोक सुद्धा हज यात्रेच्या अपेक्षेने आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून थोडे फार पैसे वाचवून त्या पैशातून हज यात्रा करण्याचा मानस ठेवतात त्यामुळे अशी सर्वसामान्य लोक इन्कम टॅक्स रिटर्न (दोन लाखापेक्षा अधीक) भरणे कस शक्य आहे? सर्वसामान्य लोकांचे हज चे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सदर अट रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग चे महाराष्ट्र प्रदेश सचिव सोहेल शेख (दारूवाला) यांनी केली
Post a Comment