अमरावती परिक्षेत्र पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बुलडाणा शहरात अधिकारीऱ्यां साधला संवाद,शहरातील अवैध धंदे होते बंद.

 


बुलडाणा - 23 ऑक्टोबर

गुंडाचे कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आज 23 ऑक्टोंबरला बुलडाण्यात प्रथमच भेट देताच ,गुन्हेगारी प्रवृत्तीचे धाबे दणाणले. मीना यांनी येथे दाखल होत प्रलंबित गुन्ह्यां विषयी आढावा बैठक घेऊन  जिल्ह्यातील 33 पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कर्तव्य भावनेतून पारदर्शीपणे कामकाज करण्याच्या सुचना दिल्या.पोलिस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना हे बुलडाणा शहरात येत असल्याने विशेष उपाययोजना करीत शहरातील 2 नंबरचे धंदे म्हणजे ठिकठिकाणी थाठलेले वरली मटक्याचे दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

    अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी आज 23 ऑक्टोंबरला बुलडाण्यात दाखल होत जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. विशेषतः खून, बलात्कार, महिला अत्याचार, चोरी, घरफोडी आदी घटनांसंदर्भात त्यांनी माहीती जाणून घेत जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.

     आगामी नवरात्रोत्सव,ईदए मिलाद या सण उत्सवाच्या काळात सामाजिक सलोखा, व शांतता अबाधित राहावी या दृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना पारदर्शीपणे काम काज करावे असे आवाहन केले. दरम्यान नवनिर्माणाधिन पोलीस कर्मचाऱ्यांच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी देखील केली. तत्पूर्वी उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले असता, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सलामी देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया,अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे,हेमराज राजपूत,रमेश बरकते, प्रिया ढाकणे, नलावडे, कोळी, विलास यामावर आदी डीवायएसपी, प्रभारी गृह पोलिस उपअधिक्षक बळीराम गिते, बुलडाणा शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे, ग्रामीण ठाणेदार सारंग नवलकर यांच्यासह जिल्ह्यातील 33 पोलिस स्टेशनचे सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget