संपूर्ण जग कोरोना महामारी मुळे हतबल झालेला आहे.कोरोना पासून वाचन्यासाठी फिजिकल डिस्टन्स,मास्क व वारंवार हाथ धुत राहणे हे उपाय सूचवलेले आहे.या नियमांचा पालन करून आपण कोरोनापासुन सुरक्षित राहु शकतात.बुलडाणा जिल्हा प्रशासन सुद्धा नागरिका मध्ये कोरोना संसर्गा बाबत जनजागृति करीत आहे.जिल्ह्यातील काही ठराविक कोविड सेंटर मध्येच कोरोना तपासणी केली जात होती त्यामुळे रुगणांना व त्यांचे नातेवाइकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता म्हणून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या निर्देशानुसार बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत सुरु 52 प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा कोरोना तपासणी सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र सांगळे यांनी दिली आहे.कोरोनाची लक्षणे दिसल्यास ग्रामीण भागातील जनतेने आपल्या गावा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची तपासणी करून घ्यावे,अशे आवाहन सुद्धा डॉ. सांगळे यांनी केले आहे.
आता बुलडाणा जिल्ह्यातील 52 पीएचसी मध्ये ही कोरोनाची तपासणी सुरु,पालकमंत्री डॉ.शिंगणे यांच्या सूचनेचे पालन
बुलडाणा - 28 ओक्टोबर
Post a Comment