बेलापुर (प्रतिनिधी )- बेलापुर गावातील मुख्य पेठेतील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन डाबरीकरण करण्यात यावे या मागणी करीता सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने बेलापुर बु!! ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यकर्ते आजपासुन उपोषणास बसले आहे बेलापुर बाजारापेठेतील रस्ता अतिशय खराब झाला असुन ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे यारस्त्याची ताताडीने दुरुस्ती न झाल्यास सिध्दीविनायक युवा मंचच्या वतीने उपोषणास बसण्याचा इशारा मंचचे गोपाल जोशी राजेश सुर्यवंशी शशीकांत तेलोरे रोहीत बोरा विकी मुथ्था गोपी दाणी आदित्य जाधव यांनी दिला होता त्यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज साकाळपासुन हे कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषणास बसले आहे.
Post a Comment