धामणगाव बढे येथे नकली नोटा प्रकरणी 4 आरोपी अटक,स्टेट बँक शाखा व्यवस्थापकाच्या सतर्कतेने नकली नोटाचा प्रकार उघड

बुलडाणा - 27 ओक्टोबर

धामणगांव बढे येथील स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेत स्व:ता जवळील नकली नोटा चलनात आणण्यासाठी भारतीय चलनातील खऱ्या नोटा मध्ये नकली नोटा मिसळवुन चलनात आणण्याचा प्रकार धा.बढे येथे समोर आला आहे. ही घटना 26 आक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजे दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे धामणगाव बढे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या घटनेतील 4 आरोपींना पोलिस कोठडी मिळाली आहे. 

      बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुका अंतर्गतच्या धामणगांव बढे परिसरातील कुरहा येथील ज्ञानेश्वर मगनसिंग पेले हा 26 ऑक्टोंबर रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान पैसे भरण्या करीता स्टेट बँकेत आला. त्याने आपल्या सोबत नगदी 2 लाख  65 हजार रुपयाच्या नोटा आणल्या. नेहमी प्रमाणे बँकेतील कर्मचारीने नोटांचे विवरण लक्षात घेत नोटांची मोजणी करुन बँकेतील काउंटींग मशिनद्वारे तपासणी केली. यामधील 200 रु.च्या एकुण 365 नोटामध्ये तब्बल 181 नोटा नकली निघाल्या. ज्याची दर्शनी किंमत 36,200 रु. असलेल्या या चलनात आणण्या करिता खऱ्या चलनीय नोटा मध्ये समाविष्ट केलेल्या आढळुन आल्या.हा संपूर्ण प्रकार धा.बढे येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापक राजेश संजीव सोनवणे यांचे सतर्कतेने उघड झाला. या घटनेची फिर्याद शाखा व्यवस्थापक सोनवणे यांनी धा.बढे पो.स्टे.दिली असता आरोपी ज्ञानेश्वर मगनसिंग पेले, विठ्ठल सबरु मगरेसे, राहुल गोटीराम साबळे, गोटीराम साबळे यांच्या विरुध्द कलम 489(इ), 489 (उ) भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपी चारही अटक करुण त्यांना आज 27 ओक्टोबर रोजी न्यायालया समोर हजर केले असता 2 नोहेंबर पर्यंत त्यांना पोलीस रिमांड मध्ये पाठवण्यात आले आहे. प्रकरणी जि.पो.अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पो. अधीक्षक बजरंग बंसोडे, उपविभागीय पो.अधीकारी रमेश बरकते तसेच बुलडाणा एल.सी.बी.चे पो.निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शना खाली धा.बढेचे प्रभारी ठाणेदार योगेश जाधव करीत आहे.या प्रकरणी आरोपी संख्या वाढण्याची शक्यता असून बुलडाणा एलसीबीचा एक पथक शोधकार्या साठी रवाना झाल्याची माहिती एलसीबी प्रमुख महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget