August 2021

बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिल्हा परिषद व ग्रामपंचायत याच्या माध्यमातून तीन कोटीची विकास कामे केली जाणार असुन ज्या विश्वासाने गांवकऱ्यांनी सत्ता ताब्यात दिली त्या विश्वासाला कधीच तडा जावु दिला जाणार नाही अशी ग्वाही जि प सदस्य शरद नवले यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना दिली                                               बेलापुरची ग्रामसभा गायकवाड वस्ती येथे घेण्यात आली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी १५ व्या वित्त आयोगाचा निधी कुठे कसा खर्च करणार या विषयी माहीती दिली  गावातील वाड्या वस्त्यावरील विकास कामेही झाली पाहीजेत त्याकरीता निधीची आवश्यकता असुन जि प सदस्य शरद नवले निधी आणण्यास सक्षम आहेत त्यामुळे गावात जोराने विकास कामे सुरु आहेत गेल्या दहा वर्षात विकास कामे झालेली नाहीत तो बँकलाँक भरुन काढावयाचा आहे  कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन ग्रामपंचायतीने सर्व उपाय योजना सुरु केल्या आहे कुटुंब आरोग्य मोहीम सुरु करण्यात आली आहे पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी शेती महामंडळाच्या जमीनीबाबत प्रक्रिया सुरु आहे असेही उपसरपंच खंडागळे म्हणाले या वेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की सध्या गाव व वाड्या वस्त्यावर तीन कोटी रुपयांची कामे सुरु करण्यात येणार असुन घरकुल योजना नविन पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत या वेळी तंटामूक्ती अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम भराटे यांची निवड करण्यात आली.तसेच पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी अरविंद साळवी यांची निवड करण्यात आली .ग्रामसभा बेकायदेशिर घेण्यात आली असुन या बेकायदेशिर ग्रामसभेत झालेले सर्व विषय नामंजुर करण्यात यावे या मागणीचे निवेदन माजी सरपंच भरत साळूंके यांनी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना दिले व सभेवर बहीष्कार टाकून ते निघुन गेले  या बाबत उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना विचारणा केली असता कोरोनामुळे दोन वर्षानंतर ग्रामसभा होत होती या सभेस कोरम पुर्ण झाल्यामुळे सभेचे कामकाज सुरु करण्यात आले व साभा खेळीमेळीत पार पडली हे विरोधकांना अपेक्षित नव्हते आम्ही उपस्थीतांच्याच सह्या घेतल्या सत्ता असताना विरोधकांनी ग्रामसभेत सभेत गोंधळ होवु नये म्हणून दोन दिवस आगोदर सह्याची मोहीम सुरु केली जात होती तरीही गोंधळ होतच होता कारण विकासाच्या नावाखाली गावा भकास करण्याचे काम यांनी केले याचा जनतेला विसर पडलेला नाही असेही खंडागळे म्हणाले  या वेळी चंद्रकांत नवले मुस्ताक शेख मिना साळवी सुरेश वाघ सुनिता बर्डे रमेश अमोलीक नितीन नवले प्रभाकर कुऱ्हे श्रीराम मोरे अरविंद साळवी अजिज शेख पुरुषोत्तम भराटे कचरु साबळे नानासाहेब सदाशिव सलीम पठाण कैलास त्रिभूवन संजय पाडूळे किशोर पगारे सुरेश कुऱ्हे  शेषराव हिवराळे सुनिता वाघ रंजना सोनवणे रेखा मोरे सुप्रिया मोरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते मुस्ताक शेख यांनी आभार मानले ग्रामविकास आधिकारी राजेश तगरे यांनी अहवाल वाचन केले..

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर तंटामूक्ती समीतीच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम भराटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली                                                 बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने गायकवाड वस्ती येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते बेलापुर तंटामूक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते छत्रपती तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली भराटे यांच्या नावाची सूचना अरविंद साळवी यांनी केली तर श्रीराम मोरे यांनी अनुमोदन दिले पुरुषोत्तम भराटे यांच्या निवडीबद्दल  पत्रकार देविदास देसाई उपसरपंच अभिषेक खंडागळे विशाल आंबेकर गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे मोहसीन सय्यद प्रफुल्ल डावरे विशाल आंबेकर विजय हुडे दादा कुताळ उपस्थित होते.

अहमदनगर (प्रतिनिधी)-दिनांक २५/०८/२०२१ रोजीचे सकाळी फिर्यादी श्री. महेश चंद्रकांत थोरात, वय- ३२ वर्षे, रा. लोणी रोड,पारनेर हे त्यांचे मित्राची बजाज कंपणीची सीटी-१०० मॉडेल मोटार सायकल नं. एमएच-१६-बीक्यू-०२१७ ही घेवून वासूदे, ता. पारनेर येथे गेले होते. वासूंदे गावातील स्वराज किराणा दुकाणासमोर मोटार सायकल उभी करुन फिर्यादी हे दुकाणामध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची वरील नमुद मोटार सायकल चोरुन नेली होती. त्याबाबत पारनेर पो.स्टे. येथे गुरनं. १६०९/२०२१, भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि/अनिल कटक यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा साईनाथ माळी, रा. कुंची, ता. संगमनेर याने केला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश इंगळे, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, पोन विशाल दळवी, शंकर चौधरी, पोकॉ/मयूर गायकवाड, रोहिदास नवगिरे, चालक पोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून संगमनेर येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून व आरोपी शोध घेवून आरोपी नामे साईनाथ मुरलीधर माळी, रा. कुंची, ता. संगमनेर यास कर्जूले हर्या, ता. पारनेर येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची माहिती देवून गुन्ह्यातील चोरलेली २०,०००/-रु. किं. ची बजाज कंपणीची सीटी-१०० मॉडेल मोटार सायकल ही समक्ष हजर केल्याने ती जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह पारनेर पो.स्टे. येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पारनेर पो.स्टे. करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे.

दतनगर- मा. खा. डाॅ. सुजयदादा विखे पाटिल, यांच्या सकंल्पनेतुन, दतनगर ग्रामपंचायत, व ग्रामस्थ यांच्या सयुंक्त विदयमाने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर रेणुकानगर संत गोरोबा काका मदिंर या ठिकानी उस्पुर्थ प्रतीसाद दर्शवुन तरूण युवक व महिला यांनी ही रक्तदान करुन एक सामाजिक कार्यास सहभाग नोदवला, रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान होय, कोविड काळात अनेक रुग्ण यांना रक्ताची अवशक्ता भासली, अनेक रुग्ण यांचे जिवदान करीता, रक्तदान करण महत्वपूर्ण होय, दतनगर ग्रामपंचायत चे लोक नियुक्त सरपंच मा.सुनिल भाऊ शिरसाठ, मा.प्रेमचंद कुंकूलोळ उपसरपंच, दतनगर ग्रामपंचायत चे विदयमान सदस्य, मा.बाळासाहेब विघे, माजी सदस्य मा.रविद्र गायकवाड़, मा. सुरेश जगताप (सदस्य) यांनी रक्तदान करुन प्रथम सुरुवात केली, यास प्रतीसाद दर्शवुन तरूण नवनिर्वाचित रूजु झालेले मा.निलेशजी लहारे पाटिल (दतनगर ग्रामपंचायत चे ग्रामसेवक) यांनी ही रक्तदान करुन सामाजिक योगदान देवुन एक ग्रामसेवक आपल्या गावातील या उपक्रमला कस स्वरूप दिल, दर्शवल आहे, या प्रसंगी उपस्थित मान्यवर मा.भगवान सेठ कुकूलोळ, मा. रमजान भाई बागवान (सदस्य) मा. अरूण वाघमारे (सदस्य) मा. प्रदिप गायकवाड़ (सदस्य) मा.आनंद(भैया) चावरे, मा. ईद्रजीत गायकवाड़, रेणुकानगर परीसरातील युवक वर्ग, महिला वर्ग, यांनी नेत्र तपासणी करुन घेतली, डाॅ.विखे पाटिल मेमोरियल हाॅस्पिटल विळदघाट अहमदनगर, स्टाफ यांच सरपंच व उपसरपंच यांनी अभिनंदन केले, आभार व्यक्त अशोक लोढे यांनी केले, हा उपक्रम यशस्वी सर्व स्टाफ व दतनगर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच मनपुर्वक अभिनंदन करतांना, सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच मनपुर्वक आभार व्यक्त राजेन्द्र गायकवाड़ यांनी मानले,

अहमदनगर : जिल्ह्यातील नगर-मनमाड, नगर-पुणे,लोणी-संगमनेर या महामार्गावर,अनेक वाहन चालकांना अडवून, त्यांना हत्याराचा धाक दाखवून लुटमार केल्या संदर्भात अनेक गुन्हे दाखल आहेत, या सर्व गुन्ह्याचा तपास लावण्याचे मोठं आवाहन पोलीस प्रशासनावर असतांना. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असतांना. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मोठं यश आले आहे. ज्यात नगर मनमाड महामार्गावर झालेल्या रस्तालुट प्रकरणी आरोपी नितीन मच्छिन्द्र माळी, वय वर्ष २२ राहणार मोरे चिंचोरे, राहूरी, गणेश रोहीदास माळी, वय वर्ष २१ राहणार खडकवाडी, मूळा डॅम जवळ, राहूरी, रवि पोपट लोंढे, वय वर्षे २२ राहणार घोडेगाव,नेवासा, निलेश संजय शिंदे, वय वर्षे २१ राहणार पारिजात चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर व एका अल्पवयीन साथीदार अशा ४ प्रौढ, एका अल्पवयीन सराईत आरोपीस, १ लाख ९५ हजारांच्या मुद्देमालास ताब्यात घेतले असून. सदर आरोपींनी मागील दोन महिन्यांच्या कालावधीत, नगर-पुणे रोड, सुपा शिवार, नगर-मनमाड रोड व संगमनेर- लोणी रोड,या ठिकाणी वाहन चालकांना अडवून, ७ लुटमारी केल्याची कबुली दिल्याने, ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. यासह या रस्तालुटीच्या गुन्ह्यातील ३ फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार यांच्या सुचनेनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्ष, गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोलीस नाईक शंकर लोढे, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर माने, आकाश काळे, राहूल सोळंके, सागर ससाणे, रणजित जाधव, रोहित येमूल, सागर सुलाने, माच्छिद्र बर्डे उमाकांत गावडे, बबन बेरड आदींनी यशस्वी रित्या पार पाडली.


बेलापुर  (विशेष प्रतिनिधी  )-कडक लाँकडाऊन बाबत सध्या मिडीयामध्ये फिरत असलेली चर्चा चुकीची असुन नागरीकांनी अशा अफवावर विश्वास ठेवु नये असे अवाहन उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी केले आहे    सोमवार पासून पुन्हा कडक निर्बंध होणार ३१ जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्याचे  निर्बंध अशा मथळ्याची वृत्तपत्रातील   बातमी सध्या सर्वत्र पसरवली जाता आहे या वृत्तामुळे नागरीक व्यापारी कारखानदार उद्योजक यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे या बाबत वस्तूस्थिती समजुन घेण्यासाठी बिनधास्त न्यूजचे संपादक असलम बिनसाद यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्याशी संपर्क साधुन या वृत्ताबाबत नागरीकात गोंधळाचे वातावरण तयारा झाले असुन शासनाची भूमिका काय आसे विचारले असता उपविभागीय अधिकारी अनिल पवार म्हणाले की

सोमवार पासून कडक निर्बंध लागू होणार असे वेत्तपत्राचे कात्रण सध्या सोशल मिडीयावर फिरत आहे परंतु अजुन तरी कडक निर्बंधाबाबत शासन स्तरावर कुठल्याही सूचना नाहीत तरी नागरीकांनी अशा खोट्या अफवावर विश्वास ठेवू नये तसेच अशा अफवा सोशल मिडीयावर पसरु नये अशा अफवा पसरविणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळावेत मास्क हे सक्तीचे  असुन विना मास्क बाहेर पडू नये गर्दीची ठिकाणे टाळावीत काही त्रास जाणवला तर वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी विनाकारण घाबरुन जावू नये असे अवाहनही प्रांताधिकारी पवार यांनी केले आहे च  चार वाजेनंतर कडक लाँकडाऊन होणार अशी अफवा.

श्रीरामपूर( प्रतिनिधी)आज दि.  29/09/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर शहरातील गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  गोंधवणी परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला. 

आरोपी. क्र.) 1 अशोक काशिनाथ शिंदे 

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2500/- रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2. अशोक सिताराम गायकवाड

45,500/-  रु. कि.चे 650 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3.  राजेंद्र फुलारे

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3000/- रू  किमतीची 30  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4.   दिलीप नाना फुलारे

28,000/-  रु. कि.चे 400 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

2000/- रू  किमतीची 20  लिटर तयार गावठी हातभट्टी  दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 5.   सुरेश फुलारे

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3500/- रू  किमतीची 35  लिटर तयार गावठी हातभट्टी   दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

---------------------------------------------

 एकूण 2,13,500/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पो. स्टे. गु.र.नं.III 568,569,570,571,572, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भल्या पहाटे अचानक केलेल्या या कारवाईमुळे  श्रीरामपूर शहरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे सर्व स्तरातून Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक होत आहे.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके Psi ऊजे, ASIराजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, श्याम बनकर, आदिनाथ चेमटे, प्रदीप गर्जे, सलमान कादरी, गौतम दिवेकर आर. सी. पी. पथक श्रीरामपूर आदींनी केली.

राहुरी (प्रतिनिधी )-खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी कान्हू गंगाराम मोरे  वय 42 हा नगर येथील शासकीय रुग्णालयात आजारावर उपचार घेत असताना पोलिसांच्या तावडीतून पसार झाला.करोना बाधित  झाल्याने त्यास राहुरी तुरूंगातून उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते. मोरे यास मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला नगर येथील शासकीय रुग्णालयातून पुणे येथे उपचारासाठी घेवून जाण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र या वेळेतच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. ही घटना काल शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली.दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून मोरे हा पसार झाल्यानंतर कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या रडारवर जिल्ह्यासह बाहेरील रूग्णालये आली आहेत. मोरे हा राहुरीतील  पत्रकार रोहिदास दातीर यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी आहे. दातीर यांचा खून केल्याप्रकरणी राहुरी तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हे चारही आरोपी राहुरी येथील तुरूंगात होते. तेथे मोरे यास करोनाने गाठल्यानंतर त्याला नगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेही त्याला मुतखड्याचा त्रास होऊ लागल्याने मोरे यास पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात येणार होते. यातच तो पसार झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राहुरी (प्रतिनिधी)-माजी आमदार जनतेची दिशाभूल करत आहे.खोटी पाणी योजना मंजूर करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम माजी आमदारांनी केले. तर येणाऱ्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी राहुरी नगरपालिकेला येणार असून निवडणुकी दरम्यान दिलेल्या जाहीर नामा प्रमाणे सर्व कामे मार्गी लागणार असल्याचे नामदार प्राजक्त तनपुरे यांनी घोषणा केली.

        राहुरी शहराच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे, ना. विश्वजीत कदम, आमदार रोहित पवार, डॉ. सौ. उषाताई तनपुरे शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, राहुरी पालिकेचे नगराध्यक्ष अनिल कासार, उपनगराध्यक्ष नंदाताई उंडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहु कानडे, जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन सदस्य धनराज गाडे, ज्ञानदेव वाफारे, सौ. सोनालीताई तनपुरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा शारदा खुळे युती अध्यक्ष तृप्ती येवले आदी व्यासपीठावर होते.

      यावेळी नगरसेवक प्रकाश भुजाडी, सूर्यकांत भुजाडी, ज्योती तनपुरे, अशोक आहेर, विलास तनपुरे, नंदू तनपुरे अॅड. राहुल शेट, महेश उदावंत, नगरसेविका ज्योती तनपुरे, अनिता पोपळघट, इंद्रभान थोरात, दिलीप चौधरी, बाळासाहेब उंडे, दशरथ पोपळघट, संजय साळवे, अशोक कदम, शरद तनपुरे आदी उपस्थित होते.



श्रीरामपूर : आजकाल विवाह जमविणे अतिशय क्लेषदायक प्रक्रिया झालेली आहे.त्यात दिव्यांगाची वैवाहिक जीवनाची घडी बसवितांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन श्री.संजय साळवे यांनी मागील 20 वर्षापूर्वी दिव्यांग वधू वर सूचक केंद्राची श्रीरामपूरात स्थापना केली व त्या माध्यमातून आजतागायत राज्यातील 272 दिव्यांग व्यक्तीचे विवाह जमविले व संसारात देखील यशस्वी केले.याबरोबरच 18 दिव्यांग व्यक्तीचे नाॅर्मल व्यक्तीशी आंतरजातीय विवाह यशस्वी केले. चि.सौ.कां.सविता भालेराव ( कर्णबधिर ) व चि.राजेंद्र जाधव ( नाॅर्मल ) यांचा आंतरजातीय विवाह श्री.संजय साळवे यांनी आज यशस्वी केला आहे.अपंग सामाजिक विकास संस्थेचा दिव्यांग वधू वर सूचक केंद्र प्रकल्प दिव्यांग व्यक्ती व दिव्यांग व्यक्तींच्या पालकांकरिता अतिशय दिलासादायक व दिशादर्शक  ठरत आहे.असे प्रतिपादन अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटना आयोजित दिव्यांग नाॅर्मल शूभविवाह कार्यक्रम प्रसंगी आ.लहू कानडे यांनी केले.

         अपंग सामाजिक विकास संस्था व आसान दिव्यांग संघटनेच्या वतीने मातोश्री मंगल कार्यालय यां ठिकाणी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.कार्यक्रम प्रसंगी रोटरी एज्यूकेशन ट्रस्टचे चेअरमन सूरेश पा.बनकर,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,चेअरमन संजय साळवे,आसान दिव्यांग संघटनेच्या महिला राज्याध्यक्ष सौ.स्नेहा कूलकर्णी,राज्य उपाध्यक्ष सूनिल कानडे,मूकबधिर विद्यालयाचे मूख्याध्यापक संतोष जोशी,संत तेरेजा चर्चचे प्रमूख धर्मगूरू फा.सूरेश साठे,काँग्रेसचे तालूकाध्यक्ष अरूण पा.नाईक,ज्ञानेश्वर मूरकूटे,संत लूक हाॅस्पिटलच्या संचालिका सि.फिलोमिना चालील,व्यवस्थापिका सि.मेरी डार्लिल,मेट्रन सि.फातिमा मेरी यांची प्रमूख उपस्थिती होती.

          याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी संस्थेच्या उपक्रमाची माहिती देतांना मागील 16 वर्षापासून दर वर्षी मोफत राज्यस्तरीय दिव्यांग वधू वर परिचय मेळावा आयोजीत केला जात आहे.कोरोना महामारीच्या संकटामूळे मेळावा आयोजीत करता येत नाही परंतू विवाह जमविण्याचे पवित्र कार्य मात्र थांबलेले नाही.कोरोना काळात देखील 16 विवाह जमविण्यात आली आहेत.मानव जातीवर संकटे येतच राहतील परंतू जीवन रहाटी थांबवून चालनार नाही.त्यामूळे दिव्यांगा करिता अहोरात्र सेवाधर्म हा सूरूच राहणार आहे.सदरचा विवाह अहमदनगर येथील रजिष्टार आॅफिसमध्ये नोंदणीक्रूत पध्दतीने करण्यात आला तदनंतर श्रीरामपूर येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.सदर जोडप्यास जि.प.समाज कल्याण विभागाची दिव्यांग सदृढ विवाह योजनेचे 50 हजार रूपयांचे अनूदान प्रस्ताव दाखल करण्यात येइल

         याप्रसंगी संत तेरेजा चर्चचे प्रमूख धर्मगूरू यांनी सूखी व समाधानी वैवाहिक जीवनांची त्रिसूत्री सांगितली.नवविवाहित व संसारिक लोकांनी विवाह पवित्र बंधन मानून सूसंस्कारित पिढीची पायाभरणी करणे आवश्यक आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय साळवे,वर्षा गायकवाड, सौ.मिना भालेराव,श्री.भगवान भालेराव,श्री.तूळशीराम जाधव,तेलधूने परिवार,सौ.श्रूती जाधव इ,नी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भालेराव यांनी केले तर आभार सौ.मनिषा भालेराव यांनी मानले.

लोणी (प्रतिनिधी) - दिनांक २६/०८/२०२१ रोजी २३.०० ते दिनांक २७/०८/२०२१ रोजी ०५.०० वाजेपावेतो समाधान पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी लोणी पोलीस स्टेशन यांना तसेच पो.ना.२१८० दिपक रोकडे चालक पो.ना.१२५ कैलास भिंगारदिवे अशांना शिर्डी विभागात विभागीय गस्त करत असताना रात्री ०४.४० वाजण्याचे सुमारास लोणी ते संगमनेर रोडवर पेट्रोलींग करीत असताना चंद्रपुर बस स्टापचे समोर एक महेंद्रा पिक अप गाडी नं. MH २५ P १२९४ ही संशयीत स्थितीत जात असताना दिसल्याने सदरची पिक गाडीचे चालकास थांबण्याचा इशाला केला असता सदर गाडीवरील चालक यांनी गाडी न थांबताच पुढे जात असल्याने सदर पिक अप गाडी यांचा पाठलाग करुन थांबविली व यातील आरोपीतांना विचारपुस केली असता त्यांनी दिलेले उत्तेर समाधानकारक न वाटल्याने आमचा संशय बळावला त्यामुळे सदर गाडीची कसुन झडती घेतली असता त्यांत गांजा असलेल्या पांढ-या रंगाचे गोण्या या नारळाचा भुश्याने भरलेल्या गोण्याचे खाली लपवलेल्या होत्या त्यातील गांजाची गोणी काढुन त्यातील माल चेक केले असता त्याचा उग्र वास व त्याचे रंगावरुन आमची खात्री झाल्याने सदर वाहनाचा सरकारी पंच मा. तालुका दंडाधिकारी सो राहाता, पोलीस निरीक्षक श्री. सुभाष भोये सो राहाता पोलीस स्टेशन फोटोग्राफर व वजन काटा धारक यांचे समक्ष पंचनामा करुन गाडीतील ५१० किलो ७५ लाख रुपये किमतीचा गांजा व ५ लाख रुपये किपतीची महेंद्रा पिक अप गाडी नं. MH २५ P १२९४ असा एकुन ८० लाख १ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी मा.श्री.मनोज पाटील सो पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे मँडम मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर, मा.श्री.संजय सातव सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो शिर्डी विभाग शिर्डी यांचे सुचना व मार्गदशनाखाली सपोनि समाधान पाटील, पोहेकॉ २३१ राजेंद्र औटी पो.ना.२१८० दिपक रोकडे, चालक पो.ना.१२५ कैलास भिंगारदिवे ,सहा फौज लबडे, पो.ना संभाजी कुसळकर, पोना. मनोज सनानसे, पो.ना.संतोष लांडे, पो.ना.अशोक शिंदे, पोहेकॉ सांगळे, पोहेकॉ जायभाये, पो.कॉ.वडणे, पोहेकॉ आव्हाड, पोकॉ इंगळे यांचे पथकाने केली आहे.


बेलापुर(  विशेष प्रतिनिधी  )- येथील एका अल्पवयीन मुलीसह फरार झालेल्या जोडप्याला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले असुन दोघांनाही ताब्यात घेवुन पोलीस श्रीरामपुरकडे रवाना झाले आहे.बेलापुर येथील १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी २३ जुलै रोजी दुपारी घरातून निघुन गेली होती या बाबत बेलापुर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता मुलीचा लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी जि प सदस्य शरद नवले  सरपंच   महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व गावातील पत्रकारांनी  उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे केली होती त्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी गावात येवुन ग्रामस्थांची बैठक घेतली होती त्या वेळीही तपास सुरु आहे लवकरच दोघांनाही ताब्यात घेवु असे अश्वासन त्यांनी दिले होते त्यांनंतर भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले दोनच दिवसांनी शिवप्रहार संघटनेच्या वतीने श्रीरामपुर बेलापुर बंदचे अवाहन करण्यात आले होते व्यापारी व ग्रामस्थांनीही बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता त्यामुळे पोलीसावर दबाव वाढला होता पोलीस आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत होते ज्या ज्या ठिकाणी पोलीसांना माहीती मिळत होती पोलीस तेथे जावुन रिकाम्या हाताने परत येत होते तपासाबाबत ग्रामस्थ तसेच वरीष्ठाकडूनही वांरवार विचारणा   होत असल्यामुळे त्या जोडप्यांना पडण्यासाठी पोलीसांनी चंग बांधला होता अखेर २३जुलै रोजी सैराट झालेले ते दोघे तब्बल एक महीन्यानंतर धुळे येथे असल्याची खबर पोलीसांना मिळाली पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजय सानप ऐ पी आय संभाजी पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे धुळे जिल्ह्यात पोहोचले धुळे जिल्ह्यातील पाळधी या गावी अल्पवयीन मुलीसह तो मुलगा असल्याची पक्की खबर पोलीसांना मिळाली ऐ पी आय संभाजी पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे वेषांतर करुन मिळालेल्या ठिकाणावर पोहोचले परंतु पोलीस पोहोचण्या आधीच तो मुलगा फरार झाला होता पोलीसांनी पुन्हा त्याच ठिकाणी सापळा लावला दुसऱ्या दिवशी त्या मुलाला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले यात फुरकान शेख यांनी तांत्रीक विश्लेषणच्या आधारे कामात मोठी कामगिरी बजावली अल्पवयीन मुलगी व त्या मुलाला ताब्यात घेवुन पोलीस श्रीरामपुरच्या दिशेने रवाना झाली आहेत एक महीन्याच्या प्रयत्नानंतर पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे पोलीसांच्या विशेष कामगीरी बद्दल नागरीकांनी पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-पोलीस असल्याचे भासवून बेलापूर बायपास जवळ  एक तोळ्याची अंगठी घेवुन चोरटे पसार झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहे                       या बाबत समजलेली माहीती अशी की गोरक्षनाथ कुऱ्हे हे आपल्या घरी चालले असताना बेलापुर बायपासला एका लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांना अडविले आम्ही पोलीस आहोत तुमची झडती घ्यावयाची आहे असे सांगुन बोटातील एक तोळ्याची अंगठी काढुन धूम ठोकली त्या वेळी जवळच काही नागरीक उभे होते त्यांच्या ही बाब लक्षात आली तो पर्यत  चोरटे पसार झाले होते बेलापुर चौकात आता सी सी टी व्ही कँमेरे लावलेले असतानाही कँमेऱ्याची नजर चुकवुन चोरटे दिवसा नागरीकांना लुटत आहे घटनेची माहीती मिळताच पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे व हरिष पानसंबळ यांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे परंतु ठोस असे काहीही हाती आले नाही.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-कोरोनामुळे बस सेवा बंद असल्यामुळे एस टी महामंडळ अडचणीत सापडले असुन डिझेल अभावी बसेस डेपोत उभ्या राहत असतील तर ते दुर्दैव आहे असे मत एस टी स्थापनेतील पहीले वाहक लक्ष्मणराव केवटे यांनी व्यक्त केले. एस टी परिवहन महामंडळाच्या स्थापनेतील पहीले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांनी वयाच्या ९८ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रवासी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोरख बारहाते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड  प्रसिध्द उद्योजक रामेश्वर मणियार आडते बाजार असोसिएशनचे सचिव संतोष बोरा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षिरसागर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोहनलालजी मानधना यांच्या हस्ते केवटे यांचा सन्मान करण्यात आला या वेळी बोलताना प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड म्हणाले की आज एस टी महामंडळाची परिस्थिती ,आर्थिक नियोजन बिघडले आहे .या काळात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही महामंडळाकडे डिझेल भरण्यास पैसे नाहीत त्यामुळे सणासुदीचा काळ असतानाही बसेस डेपोत प्रवाशांची वाट पहात उभ्या आहेत अन बाहेर प्रवाशी बसेसची वाट पहात आहेत ही चिंतेंची तसेच चिंतनाची बाब आहे एस टी महामंडळाचे पहीले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांची १००वी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येईल आजही केवटे यांची प्रकृती उत्तम असुन या वयातही ते चष्म्याशिवाय पुस्तक वाचु शकतात ही आश्चर्याची बाब असल्याचे श्रीगोड म्हणाले या वेळी प्रवासी संघटनेचे बाबासाहेब भालेराव जयंत देशपांडे नरेश पांडव पत्रकार देविदास देसाई संतोष बोरा  आदि उपस्थित होते सुरेश केवटे यांनी स्वागत केले तर योग गुरु अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.

प्रकृती कारणास्तव उपोषण मागे घेण्याची विनंती राहुरी (प्रतिनिधी) डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्री शिवाजी नगर राहुरी येथे दिनांक 23  ऑगस्ट 2021रोजी पासून उपोषणास बसलेल्या कामगारांची आज रोजी Dy.s.p.संदीप मिटके यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली

कारखाना कामगारांच्या अनेक वर्षापासून दरमहा मिळणाऱ्या पगार, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम, ग्रॅज्युएटी, पगाराचा फरक, रिटेन्शन  अलाउंस,अशा स्वरूपाचे अनेक रकमा थकीत आहे त्या अनुषंगाने Dy.s.p.संदीप मिटके यांनी उपोषण   कर्त्याबरोबर सकारात्मक चर्चा करून सहाय्यक कामगार आयुक्त तसेच असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांचेशी पत्रव्यवहार करून उपोषणकर्ते यांचेशी सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. भेटीदरम्यान उपोषणास बसलेल्या कामगारांच्या प्रकृतीची चौकशी करून उपोषण लवकरात लवकर मागे घेण्यासंदर्भात पोलीस विभागाच्या वतीने विनंती करण्यात आली.

यावेळी उपोषणकर्ते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे आदींनी पोलीस विभागाने लक्ष देण्याची विनंती केली आणि आभार व्यक्त केले.


नाऊर ( वार्ताहर):। श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील गरीब शेतकरी कुंटुंबातील  विलास अशोक देसाई (वय ४१  वर्ष ) हा तरुण विद्युत प्रवाहच्या पोलवरील तारेला चिकटून दुर्देवी अपघाती मृत्यु झाला. मयत विलास हा घरात एकुलता एक कमवता  मुलगा होता. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, १ मुलगा व 2 मुली असा परिवार आहे.

     हाती आलेल्या वृत्तानुसार घडलेली घटना अशी की घराचा वीज पुरवठा गेल्या २ दिवसापासुन बंद होता या बाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क  साधला होता आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान संबधित महावितरणचा  कर्मचारी घटनास्थळी आला व विलास यास तु पोलवर चढुन विज जोडून घे असे म्हणून फिडर वरुन विज प्रवाह बंद करुन घटनास्थळी आला त्याच वेळी दुसर्या फिडरवरुन विज प्रवाह सुरुच होता ही बाब सांबधीत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही कट केलेली विज जोडणी करण्यासाठी संबधीत कर्मचाऱ्यांने विलास यास पोलवर चढण्याचा आग्रह धरला महावितरण कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार विलास पोलवर चढला परंतु दुसऱ्या फिडरवरुन विज प्रवाह सुरु असल्यामुळे त्याला जोराचा शाँक बसला व तो फेकला गेला परंतु त्याचा पाय वरच अडकला तसेच पोलवरील अँंगलला पँट अडकल्यामुळे तो जागेवरच मयत झाला  विलास गेला त्यास तातडीने साखर कामगार हाँस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मयत झाल्याचे जाहीर केले . 

    मयत विलास हा अतिशय गरीब कुंटुबातील एकमेव कमवता व्यक्ती होता. त्याच्या निधनामुळे संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.

*पप्पा उठा ना !*

    मुलगा तुषार मुलगी शुभांगी, साक्षी यांच्या पप्पा उठा ना, आमच्याशी बोला ना ! या हंबरड्याने अंत्यविधी जमलेल्या हजारो ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. महावितरणच्या गलथान कारभारा विषयी नागरिकामधुन संताप व्यक्त करण्यात येत असुन मयत विलासच्या कुंटूबियाला महावितरण ने तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.*

पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सतिश गोरे व कॉन्स्टेबल संतोष बडे हे करत आहे.

बेलापूर -(प्रतिनिधी ) येथील बाजारतळ परिसरात तरस या सहसा आपल्या परिसरात न आढळणार्‍या दुर्मिळ प्राण्याचे अचानक दर्शन झाले. यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.बेलापूर येथे सोमवारी संध्याकाळी तरस या प्राण्याचा संचार आढळून आला. दुर्मिळ प्रजाती वर्गातील हा प्राणी मांसाहारी मानला जातो. मेलेल्या प्राणी, पक्षांचे मांस व हाडे खावून गुजराण करणे हे या प्राण्याचे वैशिष्ट्य आहे. तरस हा निशाचर असून अंगाच्या विशिष्ट ठेवणीमुळे शिकार करत नाही. असे असले तरी रात्रीच्यावेळी शेळ्या, कोंबड्यांवर मात्र ताव मारतो.बिबट्याने शिकार करून खाऊन उरलेल्या मांस व हाडांचे अवशेष खाण्यासाठी तो भटकत असावा अशीही शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे हा प्राणी आढळल्याने याची गावभर चर्चा पसरली. तरस आढळून आल्याबाबत मोबाईलवर फोटोसह संदेश टाकून लोकांना सावधगिरीची सूचना देण्यात आली. बेलापूर परिसरात आधीच बिबट्याची दहशत असताना त्यात तरस आढळल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. याबाबत वन विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

अहमदनगर०६ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी २९ वर्षीय सुमिता दिनेश जाधव राहणार म्हसे खुर्द, तालुका पारनेर ही महिला गावातून घराच्या दिशेने जाधववाडी रस्त्यावरून एकटी पायी जात असतांना, पाठीमागून मोटार सायकलवरुन आलेल्या, अनोळखी इसमाने सदर महिलेस चाकूचा धाक दाखवून, तिच्या जवळील सोन्याचे मंगळसुत्र, कर्णफूले व दोन मोबाईल असा एकूण १९ हजार रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेल्याचा घटना घडली होती, सदर घटनेबाबत सुमिता दिनेश जाधव या महिलेने, दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात, अज्ञात आरोपी विरुद्ध गुरनं. ५६९/२०२१, भादवि कलम ३९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने, समांतर तपास करीत असताना, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, सदर गुन्हा किरण मेहेत्रे, राहणार जामखेड याने केला असल्याची माहिती मिळताच.पोलीस निरीक्षक कटके यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, पोकॉ रणजित जाधव, जालिंदर माने, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे आदींना आरोपी संदर्भातील माहितीची शहानिशा करून, ताब्यात घेण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, आरोपी नामे किरण अरुण मेहेत्रे, वय- २७ वर्षे, राहणार सदाफूले वस्ती, जामखेड,यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता. तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ५ हजार रुपये किंमतीचा विवो कंपणीचा मोबाईल काढून दिल्याने, पोलिसांनी तो जप्त करुन,आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर की असून. या पुढील कार्यवाही पारनेर पोलीस करीत आहेत. आरोपी किरण अरुण मेहेत्रे हा सराईत गुन्हेगार असून. त्याचे विरुध्द यापुर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, अपहार अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बेलापुर (प्रतिनिधी  )-नारायण राणे हे जेष्ठ नेते आहेत त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ते भूमिका स्पष्ट करतीलच प्रदेशाध्यक्षांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु त्यावरुन जे सूडाचे राजकारण चालू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे असे मत माजी मंत्री  राधाकृष्ण विखे पा यांनी व्यक्त केले. जि प सदस्य शरद नवले यांच्या वस्तीवर स्नेह मेळावा व कार्यकर्त्यांशी हितगुज कार्यक्रमासाठी ते आले असता पत्रकारांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया घेतली असता माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा म्हणाले की राज्यातील शासन सूडाचे राजकारण करत आहे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताच नाही आँन लाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिक्षण मंत्री महोदयांना राज्यातील सर्व मुलांना मोफत टँब देण्याची सूचना केली होती अनेक मुलाकंडे छोटे छोटे मोबाईल असल्यामुळे त्यांना निट समजत नाही मोबाईलला रेंजच नसते शाळा केव्हा सुरु होईल याचाही साधा निर्णय घेता आलेला नाही सर्व परीक्षेत हे सरकार नापास झाले आहे कुणालाच मदत करण्याची या सरकारची तयारी नाही  कोवीडमुळे अनेक स्थीत्यंतरे आली कोरोना लसीकरणाबाबत राज्याच केंद्रा विरोधात वातावरण तयार करण्यात आले होते परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारतात मोफत लस देण्याची घोषणा करुन लसीकरण सुरुही केले आहे गोरगरीबांना कोरोना काळात मोफत धान्य दिले आता तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात उतरले पाहीजे राजकारणाच्या पलीकडे जावुन तरुणाकरीचा रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहीजे शरद नवले हा लढवय्या कार्यकर्ता आहे सभापती असताना त्यानी जिल्ह्यात चांगले काम केले प्रस्थापीताविरुध्द लढण्याचे काम शरद नवले यांनी केले आहे असेही विखे पा म्हणाले या वेळी भाजपाचे प्रकाश आण्णा चित्ते मा सभापती दिपक पटारे राधाकृष्ण आहेर गिरीधर पा आसने उपसभापती बाळासाहेब तोरणे सरपंच महेंद्र साळवी गणेश मुदगुले सचिन गिरमे शंतनु फोफसे रणजित श्रीगोड  नितीन भागडे अनिल थोरात नानासाहेब शिंदे सुनिल मुथा आजय डाकले शांतीलाल हिरण प्रशांत लढ्ढा प्रविण बाठीया अरविंद साळवी डाँक्टर देविदास चोखर पंकज हिरण साहेबराव वाबळे प्रफुल्ल डावरे हाजी ईस्माईल शेख अकबर टिन मेकरवाले अशोक गवते मोहसीन सय्यद मुस्ताक शेख शफीक बागवान सुभाष अमोलीक पत्रकार देविदास देसाई प्रदिप आहेर सुनिल नवले दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम दिपक क्षत्रीय रमेश अमोलीक विशाल आंबेकर अमोल गाढे रामेश्वर सोमाणी बालू राशिनकर महेश ओहोळ अजिज शेख दादा कुताळ गोरख कुताळ गोपी दाणी विनायक जगताप श्रीराम मोरे मास्टर हुडे श्रीकांत अमोलीक आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिं प सदस्य शरद नवले यांनी केले तर अरविंद नवले यांनी सूत्रसंचलन केले तर चंद्रकांत नवले यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-डिझेल घेण्यासाठी एस टी महामंडळाकडे पैसेच नसल्यामुळे अनेक बसेस डेपोतच उभ्या करण्यात आल्या असुन यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी केली आहे          परिवहन मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड  यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाचे सावट थोडेफार कमी झाल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला असला तरी एस टी महामंडळाच्या आडमुठेपणामुळे नागरीक विशेषकरुन महीला वर्ग त्रस्त झाला आहे सध्या सणासुदीचे दिवस असुन या महीन्यात सणामुळे महीला वर्ग आपल्या माहेरी नातेवाईकाकडे जात असतो महीलांना सुरक्षित प्रवास हा केवळ एस टी बसचाच वाटत असल्यामुळे बसने प्रवास करण्यास महीला आग्रह धरतात असे असले तरी केवळ बसला इंधन नसल्यामुळे अनेक बस डेपोतच उभ्या आहेत बस नसल्यामुळे प्रवाशांची तर कुचंबणा होतेच परंतु बसचे चालक व वाहक यांनाही कामे राहीलेले नाहीत कोरोनामुळे बस बंद होती त्यामुळे त्यांना कामही नव्हते आता बस सुरु होवुन देखील केवळ चुकीच्या नियोजनामुळे बस डेपोतच उभ्या आहेत या नुकसानीस जबाबदार कोण ? एस टी महामंडळाच्या गलथान काराभारामुळे महामंडळासहीत सर्वच जण अडचणीत सापडले आहेत केवळ डिझेलमुळे बस डेपोत उभी राहत असेल तर त्या सारखे दुसरे दुर्दैव नाही  असा सवाल श्रीगोड यांनी केला आहे या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री  उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते खासदार आमदार यांना पाठविण्यात आलेल्या आहेत


बेलापुर  (प्रतिनिधी  )- एनसीआरटी यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेच्या कमालपूर शाखेतील विद्यार्थीनी सायली उदरभरे हीने विशेष नैपुण्य मिळविले असुन तीला आता शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली एन सी आर टी यांच्या मार्फत इयत्ता आठवी साठी एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी )परीक्षा घेतली जाते सदर परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती.या परीक्षेमध्ये बेलापूर शिक्षण संस्थेचे काशिनाथ पाटील मुरकुटे विद्यालय कमालपूरमधील सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले  आहे. यामध्ये इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी कुमारी सायली उदरभरे हिचा अहमदनगर जिल्ह्यात गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक आलेला आहे.तिला इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षासाठी अर्थात 48 महिन्यांसाठी प्रत्येकी 1000/- रुपये प्रमाणे 48000/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

विशेष म्हणजे कोविड परिस्थितीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष संपर्कात नसून देखील सायली उदरभरे  या विद्यार्थीनीने हे सुयश संपादन केले आहे  . कुमारी सायली उदरभरे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री श्रीकांत साळुंके ,श्री.शशिकांत थोरात  व सहकारी शिक्षक यांचे बेलापूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गणपतलाल मुथा, सचिव श्री शरद  सोमाणी,चेअरमन श्री भरत साळुंके,माजी सरपंच भास्करराव पा. मुरकुटे ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश निवृत्ती गोरे, मुख्याध्यापक श्री पडवळ सर यांनी अभिनंदन केले आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर ग्रामस्थ व पत्रकारांनी बेलापुर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन सण साजरा करुन चांगली परंपरा जपली आहे  रक्षाबंधन सण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे मायेचे प्रतिक भाऊ आपल्या बहीणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्याप्रमाणे आपण घरात निवांत झोपतो त्यावेळी पोलीसदादा रात्रभर गस्त घालत असतात आपल्या आया बहीणींची रक्षा करत असतात याची जाण ठेवुन गेल्या काही वर्षापासून पत्रकार व बेलापुर ग्रामस्थ यांनी पोलीसा समवेत रक्षाबंधन साजरा करण्याची परंपरा सुरु केली या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की सिमेवर कर्तव्य बजावणारा जवान व गावात नागरीकांचे संरक्षण करणारा पोलीस यांचे कार्य समान आहे

पोलीसांना आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागते त्यामुळे कोणताही सण उत्सव आपल्या कुटुंबासमवेत साजरा करता येत नाही त्यामुळे पोलीसा समवेत सण साजरे करण्याची चांगली प्रथा पत्रकार देविदास देसाई  व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केली आहे गावात काम करताना  नागरीकांच्या मूलभुत गरजा व्यतिरिक्त महीलांना सकाळ सायंकाळी फिरण्याकरीता सुरक्षित रस्ता तरुणांना अद्ययावत जिम हुशार विद्यार्थ्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षासाठी मार्गदर्शन व लायब्ररी असे उपक्रम राबविणार असल्याचे जि प सदस्य शरद नवले यांनी सांगितले या वेळी सरपंच महेंद्र साळवी बेलापुर महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँक्टर गुंफा कोकाटे मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे आदिंनी मनोगत व्यक्त केले बेलापुर महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँक्टर गुंफा कोकाटे  जे टी एस हायस्कुलच्या मुख्याध्यापक जयश्री अनभुले डाँक्टर संपदा काळे डाँक्टर स्मिता कडेकर यांनी पोलीस बांधव व उपस्थितांचे औक्षण करुन सर्वांना राख्या बांधल्या या वेळी पत्रकार सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम महेश ओहोळ अँड .दिपक बारहाते अनिल गाढे सुभाष उंडे उपस्थित होते शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले

धुळे (प्रतिनिधी)- शहर वाहतूक शाखेने कारवाई करून जप्त केलेल्या कर्णकर्णश आवाज करणार्‍या सायलेन्सरसह दादा, मामा, नावाच्या नावांच्या  32 नंबर प्लेटांवर व हॉर्नवर आज संतोषी माता चौकात रोडरोलर  फिरविला.पोलिस अधीक्षकांच्या  आदेशाने ही कार्यवाही करण्यात आली शहरातील अनेक बुलेट दुचाकी धारकांनी कंपनीने दिलेल्या सायलेन्सर ऐवजी कर्कश आवाज करणारे मॉडीफाईड सायलेन्सर बसवुन शहरात ध्वनी प्रदुषण करतात. अशा एकुण 29 बुलेट धारकांवर मोटर वाहन कायद्यान्वये  कारवाई करुन त्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर  शहर वाहतुक शाखेत येथे जमा करण्यात आले होते. तसेच काही दुचाकी चालक नियमाप्रमाणे वाहनास नंबर प्लेट न लावता फॅन्सी नंबर प्लेट (दादा,अण्णा, मामा, काका) अनाधिकृत 32 नंबर प्लेट वाहन चालकांवर कारवाई करुन त्यादेखील जमा करण्यात आल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या  आदेशा प्रमाणे ध्वनी प्रदुषण करणारे कर्कश (म्युझिकल) हॉर्न वापरणारे 7 वाहन धारकांवर कारवाई करुन ते म्युझिकल हॉर्न ही जमा करण्यात आले आहेत. असे एकुण जप्त करण्यात आलेले 29 मॉडीफाईड सायलेन्सर, 32 फॅन्सी नंबर प्लेट, 7 म्युझिकल हॉर्नवर पोलीस अधिक्षकांच्या आदेशान्वये आज सकाळी संतोषीमाता चौक रोड रोलर फिरवुन नाश करण्यात आले आहेत.ही विशेष मोहिम पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत  अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव उप विभागीय पोलीस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक धिरज महाजन, सपोनि संगीता राऊत, उपनिरीक्षक रामदास जाधव व शहर वाहतुक शाखेचे सर्व पोलीस अंमलदार यांनी राबविली होती.54 लाखांचा दंड वसूल जानेवारी 2021 ते माहे जुलै 2021 अखेरपर्यंत शहर वाहतुक शाखेतर्फे मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या 33 हजार 200 वाहन चालकांवर मो.व्हि.अ‍ॅक्ट प्रमाणे कारवाई करुन 54 लाख 94 हजार रोख तडजोड शुल्क वसुल करण्यात आले असुन 53 लाख 77 हजार 700 रूपये इतके तडजोड शुल्क अपडेत आहे. अपडेट तडजोड शुल्क वसुलीसाठी वाहन धारकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे देखील जे वाहन चालक मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे. तरी कोणीही मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करु नये, अन्यथा वरप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वाहतूक शाखेने दिला आहे.

नगर शहरामध्ये मोहरम सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला काल कत्तलीची रात्र पडल्यानंतर आज मोहरम विसर्जन पार पडले यावर्षी मोहर्रम बडे बारा इमाम सावरी उचलण्याचा मान Dysp संदिप मिटके व निसार जाहंगिरदार यांना देण्यात आला.

अहमदनगर शहरातील ऐतिहासिक मोहरम सण हे मुस्लिम धर्मीय नवीन वर्ष व मुस्लिम धर्मगुरु हसेन व हुसेन यांना मोहरम सणामध्ये सुमारे 400ते 500 साला पूर्वी यहुदी व मुस्लिम धर्मीय मध्ये झालेल्या युद्धामध्ये शहीद झाले असल्याने युद्धांमध्ये वापरण्यात आलेले शस्त्र  हे कोठला येथील मशिदीमध्ये असल्याने मोहरम सणांमध्ये 5  व्या तारखेला कोठला इमामवाडा या ठिकाणी हुसेन यांची सवारी ची स्थापना करतात व मंगल गेट हवेली या ठिकाणी हसन यांची सवारी स्थापन करतात मोहरमच्या 9 व्या तारखेला हसंन व हुसेन यांची हत्या झाल्याने त्या दिवशी रात्री 12/00 वाजता अहमदनगर शहरातील सुमारे 40ते45 यंग पार्टी चे कार्यकर्ते हे आळीपाळीने  खांदा देऊन सवारी उचलून अहमदनगर शहरात मिरवून सुमारे 6 किलोमीटर फिरून छोटे बारा इमाम व बडे बारा ईमाम सवारी कोठला या ठिकाणी पुन्हा बसवितात त्यानंतर मोहरमच्या 10 व्या तारखेला मोहरम विसर्जनाची मिरवणूक निघून यंग पार्टी पुन्हा सवारी खांदा देऊन  अहमदनगर शहरात फिरून सुमारे 09 किलोमीटर आंतर असून सावेडी बाराव याठिकाणी विसर्जन मोहरम मिरवणुक  मोठ्या प्रमाणात निघत असते तसेच अहमदनगर शहरात मोहरम सणानिमित्त भारतातून भाविक येत असतात

 यावेळी  सवारी विसर्जन मिरवणूक  कोविड मुळे होऊ शकली नाही त्यामुळे याच परिसरामध्ये असलेल्या सवारी ज्या ठिकाणी बसवली त्या ठिकाणी आज सावरी विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली होती दुपारी 12/30 वाजता जागेवरच सवारी चे विसर्जन करण्यात आले कोरोना चे नियमांचे पालन करून सर्वांनी सवारी चे दर्शन घेतले

यावेळी Dy.s.p.संदीप मिटके, pi गडकरी, pi न्याहळदे , निशार जाहंगिरदार , फरहान जहागीरदार, राजु जहागीरदार , अमीर जागीरदार, आरिफ मुजावर, शकील मुजावर इत्यादी मुस्लिम बांधव हजर होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget