बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर तंटामूक्ती समीतीच्या अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम भराटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने गायकवाड वस्ती येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते बेलापुर तंटामूक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते छत्रपती तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली भराटे यांच्या नावाची सूचना अरविंद साळवी यांनी केली तर श्रीराम मोरे यांनी अनुमोदन दिले पुरुषोत्तम भराटे यांच्या निवडीबद्दल पत्रकार देविदास देसाई उपसरपंच अभिषेक खंडागळे विशाल आंबेकर गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे मोहसीन सय्यद प्रफुल्ल डावरे विशाल आंबेकर विजय हुडे दादा कुताळ उपस्थित होते.
Post a Comment