बेलापुर (प्रतिनिधी )-जिल्हा परिषद व ग्रामपंचायत याच्या माध्यमातून तीन कोटीची विकास कामे केली जाणार असुन ज्या विश्वासाने गांवकऱ्यांनी सत्ता ताब्यात दिली त्या विश्वासाला कधीच तडा जावु दिला जाणार नाही अशी ग्वाही जि प सदस्य शरद नवले यांनी ग्रामसभेत ग्रामस्थांना दिली बेलापुरची ग्रामसभा गायकवाड वस्ती येथे घेण्यात आली या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच महेंद्र साळवी हे होते या वेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी १५ व्या वित्त आयोगाचा निधी कुठे कसा खर्च करणार या विषयी माहीती दिली गावातील वाड्या वस्त्यावरील विकास कामेही झाली पाहीजेत त्याकरीता निधीची आवश्यकता असुन जि प सदस्य शरद नवले निधी आणण्यास सक्षम आहेत त्यामुळे गावात जोराने विकास कामे सुरु आहेत गेल्या दहा वर्षात विकास कामे झालेली नाहीत तो बँकलाँक भरुन काढावयाचा आहे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन ग्रामपंचायतीने सर्व उपाय योजना सुरु केल्या आहे कुटुंब आरोग्य मोहीम सुरु करण्यात आली आहे पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी शेती महामंडळाच्या जमीनीबाबत प्रक्रिया सुरु आहे असेही उपसरपंच खंडागळे म्हणाले या वेळी बोलताना सरपंच महेंद्र साळवी म्हणाले की सध्या गाव व वाड्या वस्त्यावर तीन कोटी रुपयांची कामे सुरु करण्यात येणार असुन घरकुल योजना नविन पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत या वेळी तंटामूक्ती अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम भराटे यांची निवड करण्यात आली.तसेच पाणीपुरवठा समितीच्या अध्यक्षपदी अरविंद साळवी यांची निवड करण्यात आली .ग्रामसभा बेकायदेशिर घेण्यात आली असुन या बेकायदेशिर ग्रामसभेत झालेले सर्व विषय नामंजुर करण्यात यावे या मागणीचे निवेदन माजी सरपंच भरत साळूंके यांनी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना दिले व सभेवर बहीष्कार टाकून ते निघुन गेले या बाबत उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना विचारणा केली असता कोरोनामुळे दोन वर्षानंतर ग्रामसभा होत होती या सभेस कोरम पुर्ण झाल्यामुळे सभेचे कामकाज सुरु करण्यात आले व साभा खेळीमेळीत पार पडली हे विरोधकांना अपेक्षित नव्हते आम्ही उपस्थीतांच्याच सह्या घेतल्या सत्ता असताना विरोधकांनी ग्रामसभेत सभेत गोंधळ होवु नये म्हणून दोन दिवस आगोदर सह्याची मोहीम सुरु केली जात होती तरीही गोंधळ होतच होता कारण विकासाच्या नावाखाली गावा भकास करण्याचे काम यांनी केले याचा जनतेला विसर पडलेला नाही असेही खंडागळे म्हणाले या वेळी चंद्रकांत नवले मुस्ताक शेख मिना साळवी सुरेश वाघ सुनिता बर्डे रमेश अमोलीक नितीन नवले प्रभाकर कुऱ्हे श्रीराम मोरे अरविंद साळवी अजिज शेख पुरुषोत्तम भराटे कचरु साबळे नानासाहेब सदाशिव सलीम पठाण कैलास त्रिभूवन संजय पाडूळे किशोर पगारे सुरेश कुऱ्हे शेषराव हिवराळे सुनिता वाघ रंजना सोनवणे रेखा मोरे सुप्रिया मोरे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते मुस्ताक शेख यांनी आभार मानले ग्रामविकास आधिकारी राजेश तगरे यांनी अहवाल वाचन केले..
Post a Comment