अहमदनगर (प्रतिनिधी)-दिनांक २५/०८/२०२१ रोजीचे सकाळी फिर्यादी श्री. महेश चंद्रकांत थोरात, वय- ३२ वर्षे, रा. लोणी रोड,पारनेर हे त्यांचे मित्राची बजाज कंपणीची सीटी-१०० मॉडेल मोटार सायकल नं. एमएच-१६-बीक्यू-०२१७ ही घेवून वासूदे, ता. पारनेर येथे गेले होते. वासूंदे गावातील स्वराज किराणा दुकाणासमोर मोटार सायकल उभी करुन फिर्यादी हे दुकाणामध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची वरील नमुद मोटार सायकल चोरुन नेली होती. त्याबाबत पारनेर पो.स्टे. येथे गुरनं. १६०९/२०२१, भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि/अनिल कटक यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा साईनाथ माळी, रा. कुंची, ता. संगमनेर याने केला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश इंगळे, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, पोन विशाल दळवी, शंकर चौधरी, पोकॉ/मयूर गायकवाड, रोहिदास नवगिरे, चालक पोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर अशांनी मिळून संगमनेर येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून व आरोपी शोध घेवून आरोपी नामे साईनाथ मुरलीधर माळी, रा. कुंची, ता. संगमनेर यास कर्जूले हर्या, ता. पारनेर येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची माहिती देवून गुन्ह्यातील चोरलेली २०,०००/-रु. किं. ची बजाज कंपणीची सीटी-१०० मॉडेल मोटार सायकल ही समक्ष हजर केल्याने ती जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह पारनेर पो.स्टे. येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पारनेर पो.स्टे. करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे.
Post a Comment