हाती आलेल्या वृत्तानुसार घडलेली घटना अशी की घराचा वीज पुरवठा गेल्या २ दिवसापासुन बंद होता या बाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला होता आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान संबधित महावितरणचा कर्मचारी घटनास्थळी आला व विलास यास तु पोलवर चढुन विज जोडून घे असे म्हणून फिडर वरुन विज प्रवाह बंद करुन घटनास्थळी आला त्याच वेळी दुसर्या फिडरवरुन विज प्रवाह सुरुच होता ही बाब सांबधीत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली नाही कट केलेली विज जोडणी करण्यासाठी संबधीत कर्मचाऱ्यांने विलास यास पोलवर चढण्याचा आग्रह धरला महावितरण कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार विलास पोलवर चढला परंतु दुसऱ्या फिडरवरुन विज प्रवाह सुरु असल्यामुळे त्याला जोराचा शाँक बसला व तो फेकला गेला परंतु त्याचा पाय वरच अडकला तसेच पोलवरील अँंगलला पँट अडकल्यामुळे तो जागेवरच मयत झाला विलास गेला त्यास तातडीने साखर कामगार हाँस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मयत झाल्याचे जाहीर केले .
मयत विलास हा अतिशय गरीब कुंटुबातील एकमेव कमवता व्यक्ती होता. त्याच्या निधनामुळे संपूर्ण गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
*पप्पा उठा ना !*
मुलगा तुषार मुलगी शुभांगी, साक्षी यांच्या पप्पा उठा ना, आमच्याशी बोला ना ! या हंबरड्याने अंत्यविधी जमलेल्या हजारो ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. महावितरणच्या गलथान कारभारा विषयी नागरिकामधुन संताप व्यक्त करण्यात येत असुन मयत विलासच्या कुंटूबियाला महावितरण ने तात्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.*
Post a Comment