प्रकृती कारणास्तव उपोषण मागे घेण्याची विनंती राहुरी (प्रतिनिधी) डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्री शिवाजी नगर राहुरी येथे दिनांक 23 ऑगस्ट 2021रोजी पासून उपोषणास बसलेल्या कामगारांची आज रोजी Dy.s.p.संदीप मिटके यांनी उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली
कारखाना कामगारांच्या अनेक वर्षापासून दरमहा मिळणाऱ्या पगार, प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम, ग्रॅज्युएटी, पगाराचा फरक, रिटेन्शन अलाउंस,अशा स्वरूपाचे अनेक रकमा थकीत आहे त्या अनुषंगाने Dy.s.p.संदीप मिटके यांनी उपोषण कर्त्याबरोबर सकारात्मक चर्चा करून सहाय्यक कामगार आयुक्त तसेच असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांचेशी पत्रव्यवहार करून उपोषणकर्ते यांचेशी सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. भेटीदरम्यान उपोषणास बसलेल्या कामगारांच्या प्रकृतीची चौकशी करून उपोषण लवकरात लवकर मागे घेण्यासंदर्भात पोलीस विभागाच्या वतीने विनंती करण्यात आली.
यावेळी उपोषणकर्ते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे आदींनी पोलीस विभागाने लक्ष देण्याची विनंती केली आणि आभार व्यक्त केले.
Post a Comment