बेलापुर (प्रतिनिधी )-कोरोनामुळे बस सेवा बंद असल्यामुळे एस टी महामंडळ अडचणीत सापडले असुन डिझेल अभावी बसेस डेपोत उभ्या राहत असतील तर ते दुर्दैव आहे असे मत एस टी स्थापनेतील पहीले वाहक लक्ष्मणराव केवटे यांनी व्यक्त केले. एस टी परिवहन महामंडळाच्या स्थापनेतील पहीले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांनी वयाच्या ९८ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल प्रवासी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गोरख बारहाते हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड प्रसिध्द उद्योजक रामेश्वर मणियार आडते बाजार असोसिएशनचे सचिव संतोष बोरा ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षिरसागर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोहनलालजी मानधना यांच्या हस्ते केवटे यांचा सन्मान करण्यात आला या वेळी बोलताना प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड म्हणाले की आज एस टी महामंडळाची परिस्थिती ,आर्थिक नियोजन बिघडले आहे .या काळात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही महामंडळाकडे डिझेल भरण्यास पैसे नाहीत त्यामुळे सणासुदीचा काळ असतानाही बसेस डेपोत प्रवाशांची वाट पहात उभ्या आहेत अन बाहेर प्रवाशी बसेसची वाट पहात आहेत ही चिंतेंची तसेच चिंतनाची बाब आहे एस टी महामंडळाचे पहीले बस कंडक्टर लक्ष्मणराव केवटे यांची १००वी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येईल आजही केवटे यांची प्रकृती उत्तम असुन या वयातही ते चष्म्याशिवाय पुस्तक वाचु शकतात ही आश्चर्याची बाब असल्याचे श्रीगोड म्हणाले या वेळी प्रवासी संघटनेचे बाबासाहेब भालेराव जयंत देशपांडे नरेश पांडव पत्रकार देविदास देसाई संतोष बोरा आदि उपस्थित होते सुरेश केवटे यांनी स्वागत केले तर योग गुरु अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.
Post a Comment