बेलापुर (प्रतिनिधी )-पोलीस असल्याचे भासवून बेलापूर बायपास जवळ एक तोळ्याची अंगठी घेवुन चोरटे पसार झाले असुन पोलीस त्यांचा शोध घेत आहे या बाबत समजलेली माहीती अशी की गोरक्षनाथ कुऱ्हे हे आपल्या घरी चालले असताना बेलापुर बायपासला एका लाल टी शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांना अडविले आम्ही पोलीस आहोत तुमची झडती घ्यावयाची आहे असे सांगुन बोटातील एक तोळ्याची अंगठी काढुन धूम ठोकली त्या वेळी जवळच काही नागरीक उभे होते त्यांच्या ही बाब लक्षात आली तो पर्यत चोरटे पसार झाले होते बेलापुर चौकात आता सी सी टी व्ही कँमेरे लावलेले असतानाही कँमेऱ्याची नजर चुकवुन चोरटे दिवसा नागरीकांना लुटत आहे घटनेची माहीती मिळताच पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे व हरिष पानसंबळ यांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे परंतु ठोस असे काहीही हाती आले नाही.
Post a Comment