बेलापुर( विशेष प्रतिनिधी )- येथील एका अल्पवयीन मुलीसह फरार झालेल्या जोडप्याला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले असुन दोघांनाही ताब्यात घेवुन पोलीस श्रीरामपुरकडे रवाना झाले आहे.बेलापुर येथील १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी २३ जुलै रोजी दुपारी घरातून निघुन गेली होती या बाबत बेलापुर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता मुलीचा लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे व गावातील पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे केली होती त्या नंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी गावात येवुन ग्रामस्थांची बैठक घेतली होती त्या वेळीही तपास सुरु आहे लवकरच दोघांनाही ताब्यात घेवु असे अश्वासन त्यांनी दिले होते त्यांनंतर भाजपाचे प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले दोनच दिवसांनी शिवप्रहार संघटनेच्या वतीने श्रीरामपुर बेलापुर बंदचे अवाहन करण्यात आले होते व्यापारी व ग्रामस्थांनीही बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता त्यामुळे पोलीसावर दबाव वाढला होता पोलीस आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत होते ज्या ज्या ठिकाणी पोलीसांना माहीती मिळत होती पोलीस तेथे जावुन रिकाम्या हाताने परत येत होते तपासाबाबत ग्रामस्थ तसेच वरीष्ठाकडूनही वांरवार विचारणा होत असल्यामुळे त्या जोडप्यांना पडण्यासाठी पोलीसांनी चंग बांधला होता अखेर २३जुलै रोजी सैराट झालेले ते दोघे तब्बल एक महीन्यानंतर धुळे येथे असल्याची खबर पोलीसांना मिळाली पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संजय सानप ऐ पी आय संभाजी पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे धुळे जिल्ह्यात पोहोचले धुळे जिल्ह्यातील पाळधी या गावी अल्पवयीन मुलीसह तो मुलगा असल्याची पक्की खबर पोलीसांना मिळाली ऐ पी आय संभाजी पाटील हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे हे वेषांतर करुन मिळालेल्या ठिकाणावर पोहोचले परंतु पोलीस पोहोचण्या आधीच तो मुलगा फरार झाला होता पोलीसांनी पुन्हा त्याच ठिकाणी सापळा लावला दुसऱ्या दिवशी त्या मुलाला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले यात फुरकान शेख यांनी तांत्रीक विश्लेषणच्या आधारे कामात मोठी कामगिरी बजावली अल्पवयीन मुलगी व त्या मुलाला ताब्यात घेवुन पोलीस श्रीरामपुरच्या दिशेने रवाना झाली आहेत एक महीन्याच्या प्रयत्नानंतर पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे पोलीसांच्या विशेष कामगीरी बद्दल नागरीकांनी पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
Post a Comment