बेलापुर (प्रतिनिधी )-डिझेल घेण्यासाठी एस टी महामंडळाकडे पैसेच नसल्यामुळे अनेक बसेस डेपोतच उभ्या करण्यात आल्या असुन यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार प्रवासी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी केली आहे परिवहन मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात प्रदेशाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाचे सावट थोडेफार कमी झाल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला असला तरी एस टी महामंडळाच्या आडमुठेपणामुळे नागरीक विशेषकरुन महीला वर्ग त्रस्त झाला आहे सध्या सणासुदीचे दिवस असुन या महीन्यात सणामुळे महीला वर्ग आपल्या माहेरी नातेवाईकाकडे जात असतो महीलांना सुरक्षित प्रवास हा केवळ एस टी बसचाच वाटत असल्यामुळे बसने प्रवास करण्यास महीला आग्रह धरतात असे असले तरी केवळ बसला इंधन नसल्यामुळे अनेक बस डेपोतच उभ्या आहेत बस नसल्यामुळे प्रवाशांची तर कुचंबणा होतेच परंतु बसचे चालक व वाहक यांनाही कामे राहीलेले नाहीत कोरोनामुळे बस बंद होती त्यामुळे त्यांना कामही नव्हते आता बस सुरु होवुन देखील केवळ चुकीच्या नियोजनामुळे बस डेपोतच उभ्या आहेत या नुकसानीस जबाबदार कोण ? एस टी महामंडळाच्या गलथान काराभारामुळे महामंडळासहीत सर्वच जण अडचणीत सापडले आहेत केवळ डिझेलमुळे बस डेपोत उभी राहत असेल तर त्या सारखे दुसरे दुर्दैव नाही असा सवाल श्रीगोड यांनी केला आहे या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते खासदार आमदार यांना पाठविण्यात आलेल्या आहेत
Post a Comment