बेलापुर (प्रतिनिधी )- एनसीआरटी यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेच्या कमालपूर शाखेतील विद्यार्थीनी सायली उदरभरे हीने विशेष नैपुण्य मिळविले असुन तीला आता शासनाची शिष्यवृत्ती मिळणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली एन सी आर टी यांच्या मार्फत इयत्ता आठवी साठी एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी )परीक्षा घेतली जाते सदर परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली होती.या परीक्षेमध्ये बेलापूर शिक्षण संस्थेचे काशिनाथ पाटील मुरकुटे विद्यालय कमालपूरमधील सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये इयत्ता आठवी ची विद्यार्थिनी कुमारी सायली उदरभरे हिचा अहमदनगर जिल्ह्यात गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक आलेला आहे.तिला इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षासाठी अर्थात 48 महिन्यांसाठी प्रत्येकी 1000/- रुपये प्रमाणे 48000/- रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विशेष म्हणजे कोविड परिस्थितीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष संपर्कात नसून देखील सायली उदरभरे या विद्यार्थीनीने हे सुयश संपादन केले आहे . कुमारी सायली उदरभरे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री श्रीकांत साळुंके ,श्री.शशिकांत थोरात व सहकारी शिक्षक यांचे बेलापूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री गणपतलाल मुथा, सचिव श्री शरद सोमाणी,चेअरमन श्री भरत साळुंके,माजी सरपंच भास्करराव पा. मुरकुटे ,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश निवृत्ती गोरे, मुख्याध्यापक श्री पडवळ सर यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment