बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर ग्रामस्थ व पत्रकारांनी बेलापुर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन सण साजरा करुन चांगली परंपरा जपली आहे रक्षाबंधन सण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे मायेचे प्रतिक भाऊ आपल्या बहीणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो त्याप्रमाणे आपण घरात निवांत झोपतो त्यावेळी पोलीसदादा रात्रभर गस्त घालत असतात आपल्या आया बहीणींची रक्षा करत असतात याची जाण ठेवुन गेल्या काही वर्षापासून पत्रकार व बेलापुर ग्रामस्थ यांनी पोलीसा समवेत रक्षाबंधन साजरा करण्याची परंपरा सुरु केली या वेळी बोलताना जि प सदस्य शरद नवले म्हणाले की सिमेवर कर्तव्य बजावणारा जवान व गावात नागरीकांचे संरक्षण करणारा पोलीस यांचे कार्य समान आहे
पोलीसांना आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य द्यावे लागते त्यामुळे कोणताही सण उत्सव आपल्या कुटुंबासमवेत साजरा करता येत नाही त्यामुळे पोलीसा समवेत सण साजरे करण्याची चांगली प्रथा पत्रकार देविदास देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरु केली आहे गावात काम करताना नागरीकांच्या मूलभुत गरजा व्यतिरिक्त महीलांना सकाळ सायंकाळी फिरण्याकरीता सुरक्षित रस्ता तरुणांना अद्ययावत जिम हुशार विद्यार्थ्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षासाठी मार्गदर्शन व लायब्ररी असे उपक्रम राबविणार असल्याचे जि प सदस्य शरद नवले यांनी सांगितले या वेळी सरपंच महेंद्र साळवी बेलापुर महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँक्टर गुंफा कोकाटे मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे आदिंनी मनोगत व्यक्त केले बेलापुर महाविद्यालयाच्या प्राचार्या डाँक्टर गुंफा कोकाटे जे टी एस हायस्कुलच्या मुख्याध्यापक जयश्री अनभुले डाँक्टर संपदा काळे डाँक्टर स्मिता कडेकर यांनी पोलीस बांधव व उपस्थितांचे औक्षण करुन सर्वांना राख्या बांधल्या या वेळी पत्रकार सुहास शेलार दिलीप दायमा किशोर कदम महेश ओहोळ अँड .दिपक बारहाते अनिल गाढे सुभाष उंडे उपस्थित होते शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले
Post a Comment