अहमदनगर०६ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी २९ वर्षीय सुमिता दिनेश जाधव राहणार म्हसे खुर्द, तालुका पारनेर ही महिला गावातून घराच्या दिशेने जाधववाडी रस्त्यावरून एकटी पायी जात असतांना, पाठीमागून मोटार सायकलवरुन आलेल्या, अनोळखी इसमाने सदर महिलेस चाकूचा धाक दाखवून, तिच्या जवळील सोन्याचे मंगळसुत्र, कर्णफूले व दोन मोबाईल असा एकूण १९ हजार रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेल्याचा घटना घडली होती, सदर घटनेबाबत सुमिता दिनेश जाधव या महिलेने, दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात, अज्ञात आरोपी विरुद्ध गुरनं. ५६९/२०२१, भादवि कलम ३९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने, समांतर तपास करीत असताना, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे, सदर गुन्हा किरण मेहेत्रे, राहणार जामखेड याने केला असल्याची माहिती मिळताच.पोलीस निरीक्षक कटके यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, मनोहर गोसावी, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरंदले, रवि सोनटक्के, पोकॉ रणजित जाधव, जालिंदर माने, चालक पोहेकॉ उमाकांत गावडे आदींना आरोपी संदर्भातील माहितीची शहानिशा करून, ताब्यात घेण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, आरोपी नामे किरण अरुण मेहेत्रे, वय- २७ वर्षे, राहणार सदाफूले वस्ती, जामखेड,यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता. तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास विश्वसात घेवून कसून चौकशी केली असता. त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ५ हजार रुपये किंमतीचा विवो कंपणीचा मोबाईल काढून दिल्याने, पोलिसांनी तो जप्त करुन,आरोपीस मुद्देमालासह पारनेर पोलीस ठाण्यात हजर की असून. या पुढील कार्यवाही पारनेर पोलीस करीत आहेत. आरोपी किरण अरुण मेहेत्रे हा सराईत गुन्हेगार असून. त्याचे विरुध्द यापुर्वी दरोडा, दरोड्याची तयारी, अपहार अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Post a Comment