July 2021

बेलापुर (प्रतिनिधी देविदास देसाई )- महसुल दिनानिमित्त महसुल विभागात चांगले कार्य करणाऱ्या अधीकाऱ्यांचा सन्मान करण्यात येत असुन जिल्ह्यात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली असुन १आँगस्ट महसुल दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महसुल दिनानिमित्त चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप असावी जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढेल तसेच इतरांनाही प्रेरणा मिळेल या भावनेतुन महसुल विभागात  उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असुन या वर्षी उत्कृष्ट तहसीलदार म्हणून श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे  उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पूनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांची निवड करण्यात आली आहे उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून श्रीगोंदा तहसील मधील श्रीमती योगीता ढोले व जिल्हा पुरवठा कार्यालयातील अभिजीत वांढेकर यांची निवड करण्यात आलेली आहे उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून बेलापुर (श्रीरामपुर )मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व पाथर्डी येथील विरेश्वर खेडकर तर उत्कृष्ट अव्वल कारकुन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील एस व्ही ठोंबरे व राहुरी तहसील मधील श्रीमती ए एस राजवळ यांची निवड करण्यात आली आहे विशेष कोरोना योध्दा पुरस्कार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडधे आदर्श तलाठी प्रशांत हासे संगमनेर पोलीस पाटील गणेश जाधव संगमनेर आदेश साठे नेवासा राजेंद्र गीते जामखेड कोतवाल बी एम बोरडे पारनेर शरद गोंधणे शेवगाव आकाश कर्पे नगर उत्कृष्ट महसुल शिपाई हनुमान बोरगे उत्कृष्ट वाहन चालक महादेव डोंगरे उत्कृष्ट तलाठी बाळकृष्ण साबळे अकोले गुंजवटे सुजाता कर्जत कृष्णा आरसेवार राहाता महसुल सहाय्यक मंगेश ढुमणे आर एम शिरसाठ आदिची जिल्ह्यात उत्कृष्ट महसुलअधिकारी कर्मचारी म्हणून महसुल दिनानिमित्त निवड करण्यात आली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर प्राथमिक  आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गळनिंब येथे लसीकरण सुरू असताना अचानक गोंधळ उडाल्याने लसीकरण अर्ध्यावरच सोडून जाण्याची नामुष्की बेलापूर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांवर आली.   सविस्तर असे की,गळनिंब ता.श्रीरामपूर येथे गुरुवारी बेलापूर उपकेंद्रा अंतर्गत ४५ वर्षावरील नागरीकांसाठी दुसर्‍या डोसचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लसीकरणाची सुरवात ८ वाजेपासून आधार कार्ड जमा करुन  नाव नोंदणी करण्यात आली सरपंच शिवाजी चिंधे हे त्या ठिकाणी थांबून होते  ४५ वर्षापुढील दुसर्‍या डोससाठी आधार कार्ड जमा करून टोकन पध्दतीने लसीकरण सुरू करण्यात आले .६५ ते ७० पंचेचाळीस वर्षापुढील नागरीकांचा दुसरा डोस शिस्तबध्द पार पाडल्यानंतर ४५ वर्षाच्या आतील काही नागरीकांनी पहीला डोस मिळण्यासाठी अरेरावी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे लसीकरण काही काळ बंद करावे लागले डाॅक्टर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दोन तास गोंधळातच बसुन रहावे लागले.वैद्यकीय अधिकारी डाँक्टर देविदास चोखर यांनी प्रथम दुसरा डोस झाल्यानंतर लस शिल्लक राहीली तर १८ वर्षापुढील नागरीकांना देण्यात येईल असे सांगुन देखील जबाबदार नागरीकांनीच गोंधळ घातला या गोंधळामुळे नागरीकांना सेवा देणार्या कर्मचाऱ्यांवर उपाशी पोटी काम करण्याची वेळ आली त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजी पसरली बेलापुर  प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कडीत खूर्द कडीत बु!!मांडवे फत्याबाद कुरणपुर गळनिंब उक्कलगाव एकलहरे नरसाळी बेलापुर खूर्द बेलापुर बु!! ऐनतपुर या गावांचा समावेश येतो नागरीकांना विशेष करुन वयोवृध्द नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास होवू नये म्हणून जि प सदस्य शरद नवले यांनी उपकेंद्रात जावून लसीकरण करण्याची सूचना केली होती त्यानुसार  डाँक्टर देविदास चोखर यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावोगावी लसीकरण सुरु केले होते त्यात पहीली लस घेतलेल्या ४५ वर्षापुढील नागरीकांना प्राधान्याने दुसरी लस द्यावी अशा सूचना असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ४५ वर्षावरील नागरीकांना लसीकरण सुरु केले त्यातच काही १८ वर्षावरील तरुणांचीही नोदणी केलेली होती त्या वेळी लस शिल्लक राहीली तर १८ वर्षावरील नागरीकांना देवु असे सांगताच काहींनी गोंधळ सुरु केला  हा गोंधळ तासभर चालू होता आरोग्य कर्मचारी देखील या गोंधळास वैतागले आलेली  लस संपवुन  त्यांनी गळनिंब मधुन काढता पाय घेतला गावातील काही जाणकार अडाणी नागरीकांमुळे अनेक गोरगरीब नागरीकांना लसीपासून वंचीत राहावे लागले.आता उपकेंद्रात होणाऱ्या गोंधळामुळे बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण करण्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी )- एस. टी. च्या अपघात सहाय्यता निधी योजनेच्या ट्रस्टचा कारभार धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या नियमानुसार पारदर्शक व्हावा अशी

मागणी जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रणजीत श्रीगोड यांनी  महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे .

या बाबत प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी महसुल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले असुन त्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सन २०१६ पासून एस. टी. खात्याने एखादया प्रवाशाचा बसमधून प्रवास करताना मृत्यू झाल्यास

त्याचे वारसदाराला १० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून  आर्थिक सहाय्य व्हावी या करीता "अपघात सहाय्यता निधी "

योजना तयार करून ट्रस्टची स्थापना केली. प्रत्यक्षात मात्र या घटनेतील उद्देश पाहून जनतेची

दिशाभूल करण्यात आली आहे  वारंवार तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल

यांचे अध्यक्षतेखाली ७ वरिष्ठ अधिका-यांची ट्रस्टीज म्हणून नियुक्त करण्यात आली होती .होणारे सर्व व्यवहार हे धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे होणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्ष कारभार

धर्मदाय आयुक्त यांचे नियमानुसार होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. हा सर्व खर्च

प्रत्येक प्रवासाचे वेळी प्रवाशाकडून या कामासाठी १ रुपया विशेष निधी वसुल करण्यात येतो. हा

सर्व निधी ट्रस्टचे बँकेत जमा होत नाही असा आरोप या निवेदनात करण्यात आलेला आहे या बरोबरच  इतरही  ९ सुचनांचे निवेदन ना. थोरात यांना देण्यात आले आहे

सर्व परिस्थिती लक्षात घेता या ट्रस्टचा सर्व कारभार पारदर्शकपणाने होण्याची गरज आहे. अन्यथा

जनतेचा विश्वास उडेल.या बाबत  वारंवार पत्रव्यवहार करुन सुध्दा दखल घेण्यात आली नाही.आमच्या तक्रारीला  केराची

टोपली दाखविण्यात आली आहे . जिल्हा प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड यांनी आमदार डॉ. सुधीर

तांबे, आमदार लहू कानडे यांचे उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, माजी

कार्याध्यक्ष ब्रिजलालजी सारडा व अशोक सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रनाथ पा. थोरात

इ. पदाधिकारी यांनाही दिलेले आहे   यापूर्वी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे,

उपमुख्यमंत्री ना. अजीतदादा पवार, परिवहन मंत्री ना. अनिल परब, प्रदेश भाजपा अध्यक्ष

आ. चंद्रकांत पाटील, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष

ना. जयंत पाटील यांना निवेदन दिलेले आहे. ते काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

श्रीरामपुर   (प्रतिनिधी  )- कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शासनाने व्यापाऱ्यांना वेळेची मर्यादा घालून दिली असुन व्यापारी वेळेचे बंधन पाळतात परंतु अवैध व्यवसाय खूलेआम दिवसभर सुरु असतात त्यांना पायबंद कोण घालणार ? असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.शासनाने घालून दिलेले नियम सर्व सामान्य जनता तंतोतंत पाळत आहेत परंतु अवैध व्यवसाय खूलेआम सुरु आहेत तालुक्यात मटका अन गुटखा खुलेआम सुरु आहे आकडा येण्याच्या वेळेस ठराविक ठिकाणी नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते ज्यांच्या आशिर्वादाने अवैध व्यवसाय सुरु आहेत त्यांना ही गर्दी दिसत नाही का? असा सवाल विचारला जात आहे आता मटका खेळण्यासाठी व खेळविण्यासाठी मोबाईलचा वापर केला जात आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवैध व्यवसाय आढळल्यास संबधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे सांगितले होते तरीही कुठेही अवैध व्यवसायात कमी आलेली नाही सर्व सामान्य नागरीकासाठी लाँकडाऊन असला तरी अवैध धंद्यावाल्यांना ती पर्वणीच ठरली आहे मंध्यतंरी गुन्हा अन्वेषन शाखेने गावठी हातभट्टी चालकावर कारवाई केली परंतु आजही मोठ्या प्रमाणात बनावट दारु तयार करुन ठराविक परमीट चालकांना विकली जाते गुटख्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली नागरीकांना हायसे वाटले गुटखा विक्री बंद होईल असे वाटत असतानाच दाम दुपटीने गुटख्याची विक्री खूलेआम ठिकठिकाणी होत आहे आजही मोठ्या प्रमाणात बाहेरहून गुटख्याची आवक सुरुच आहे अनेक वाळू तस्कराकडे खेळण्यातल्या पिस्तूलाप्रमाणे गावठी कट्टे आहेत इतरांना धमकावण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे वाळू तस्करी प्रतिष्ठेची होत आहे अनेक व्हाईट काँलर राजकारणी वाळूच्या धद्यांत सहभागी होत आहे वाळू तस्करी सुरु राहण्याकरीता आपले राजकीय वजन वापरले जात आहे तर काही वाळू तस्कर पोलीस ,महसुल कर्मचाऱ्यांवर दबाव आणून वाळू तस्करी करत आहे अधिकारीही लालच व धमक्यांना बळी पडत आहेत बोगस पावत्यांच्या आधारे शासनाची फसवणूक होत आहे अनेक ठिकाणी पत्याचे क्लब जुगार अड्डे चालू आहेत मात्र सर्व सामान्यावर कारवाई केली जाते त्यामुळे अवैध व्यवसाय खूलेआम व व्यापाऱ्यांना बंधने हे सर्व सामान्यांच्या समजण्या पलीकडचे आहे मा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी या बाबीकडे लक्ष द्यावे या प्रकरणात बेजबाबदारपणे वागनारे अधिकाऱ्यांची व कर्मचार्‍यांची तडकाफडकी बदली करावी अशी नागरीक ,व्यापारी ,फेरीवाले ,शेतकरी आदिंची मागणी आहे.

बेलापुर :-(प्रतिनिधी )तळागाळातील गरीब माणूस केंद्रबिंदू मानून काम करत असल्यानेच मला अनेक क्षेत्रातील चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. माणसाने आपल्या जीवनात सामाजिक बांधिलकी जपून, जबाबदारी समजून समाजाचे ऋण फेडले पाहिजे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. मोठ्याचे काम तर कोणी करते! पण, समाजातील गरिबातल्या गरीब माणसाची कामं करणे, हाच खरा मानवतावादी धर्म आहे! असे प्रतिपादन श्रीरामपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी केले.

   महाराष्ट्र लघू वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून श्री नाईक यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकतअली शेख यांनी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे गेली 29 वर्षा चा सामाजिक कार्याची सविस्तरपणे माहीती सांगितली. 

      या वेळी बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन अनिल नाईक, चंद्रकांत नाईक, शेषराव पवार, संतोष कुर्‍हे, प्रकाश कुर्‍हे, बाळासाहेब भांड, पत्रकार सुहास शेलार, किशोर कदम, दीपक क्षत्रिय, असलम बिनसाद, अक्षय नाईक, सुभाष गायकवाड, मुसा सय्यद, कासम शेख, एजाज शेख, मोहंमदअली सय्यद, अमीर जहागीरदार, विलास मेहत्रे, शफिक शेख, राजाराम कुमावत, प्रकाश कुमावत, अयाज सय्यद एफ. एम.शेख आदी उपस्थित होते.

      अरूण पाटील नाईक यांचे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बरकत अली शेख, महाराष्ट्र प्रदेश महासचिव शेख फकीर मोहंमद, उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजमोहंमद शेख, प्रदेश सचिव किशोर गाढे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागिरदार, प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण, प्रदेश उपाध्यक्ष नासीर पठाण, इलेक्ट्रॉनिक मिडीया अहमदनगर जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाबभाई शेख, श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष जावेद के. शेख, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासमभाई शेख, श्रीरामपूर शहर संघटक गौतम राउत, बेलापूर शहरध्यक्ष एजाज सय्यद, बेलापूर शहर उपाध्यक्ष मोहंमद अली सय्यद, बेलापूर शहरसंघटक मुसाभाई सय्यद, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज भाई पठाण, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, पुणे शहराध्यक्ष हनीफभाई तांबोळी, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान के. शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मनसुरभाई पठाण, नाशिक जिल्हा सचिव वहाब खान, नाशिक शहराध्यक्ष छबुराव साळुंके, नाशिक शहर उपाध्यक्ष अन्वर पठाण, चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, राहाता तालुकाध्यक्ष विजय खरात,राहाता तालुका संपर्क प्रमुख गोरक्ष गाढवे,

शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जाद पठाण, शेवगाव शहराध्यक्ष उगलमुगले, शेवगाव तालुका उपाध्यक्ष जिशान काजी, शेवगाव तालुका कार्याध्यक्ष जमीर शेख, वैजापूर तालुकाध्यक्ष मुअज्जम भाई शेख, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, श्रीरामपूर तालुका महिलाध्यक्षा संगीता वाबळे, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक कोपरे, कोपरगाव शहराध्यक्ष हनीफभाई शेख, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्लाभाई चौधरी, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद ईदरीसभाई शेख, संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर शाह, घाटकोपर तालुकाध्यक्ष आसिफभाई सय्यद, संगमनेर शहराध्यक्ष शाहनवाज बेगमपूरे, मालेगाव शहराध्यक्ष इलियास छोटेमिया, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, अकबरभाई शेख, अमीर बेग मिर्झा, अहमदनगर जिल्हा संघटक अरुण बागुल, रमेश शिरसाठ, शब्बीर फतुभाई कुरेशी, साईनाथ बनकर, अकबर भाई शेख, आदि व इतर सर्व पत्रकार संघाचे सदस्य व सभासद महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून  हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

       कार्यक्रमाचे सुत्र संचालन पत्रकार राजमोहंमद शेख यांनी केले. प्रकाश कुर्‍हे यांनी आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.


श्रीरामपूर(प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, नेवासा, राहुरी तालुक्यांमध्ये गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांनी गावठी कट्ट्याचा वापर केला असल्याचे दिसून आले. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने श्रीरामपुर, नेवासा, राहुरी मध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून 81 ठिकाणी छापे टाकून अवैध शस्त्रांचा शोध घेत कारवाई केली. 

       या कारवाईमध्ये 7 गावठी कट्टे ,8 जिवंत काडतुसे ,3 तलवारी असा एकूण 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.तीन तालुक्यात केलेल्या कारवाईमध्ये एकूण 14 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. 

       सदर कारवाईमध्ये १)आकाश उर्फ देवात जालिंदर लष्करे रा.नेवासा फाटा, नेवासा २)रुपेश पुनमचंद साळवे रा.मुक्तापुर, नेवासा ३)शुभम विश्वनाथ गर्जे रा.वडुले, नेवासा ४)लक्ष्मण साधू अडांगळे रा. गंगानगर, नेवासा ५)शाहरुख निमेश पटेल रा.संजय नगर, वार्ड नंबर 2, श्रीरामपूर ६)अनिल बाळू मिरजे रा.देवळाली, राहुरी ७)कैलास रामू धोत्रे रा.देवळाली, राहुरी ८)काशिनाथ बबन शिंदे रा.वैदुवाडी, सावेडी, नगर ९)शाहरुख ऊर्फ चाटया जावेद शेख रा.घोडेगाव, नेवासा १०)अनिल कचरू साळुंखे रा.गंगापूर, औरंगाबाद ११) मयूर दीपक तावर रा.वार्ड नंबर 3, श्रीरामपूर १२)नागेश पाराजी जाधव रा.देवळाली, राहुरी १३)सिद्धार्थ अशोक पठारे रा.गंगापूर, औरंगाबाद आणि एक अल्पवयीन आरोपी यांना जेरबंद करण्यात आले आहे. 

       या कारवाईसाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 25 पोलीस उपनिरीक्षक व 350 पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आले होते. पकडलेल्या काही आरोपींवर गंभीर स्वरूपाचे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल आहेत.

         पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके तसेच संबंधित पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय अहमदनगर येथील पोलीस अंमलदार यांनी संयुक्तरीत्या सदरची कारवाई केली.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- बेलापुर ऐज्यूकेशन संस्थेतील शिपाई महेश उध्दवगिरी गोसावी (वय ५० वर्ष ) यांनी राहत्या घरी आज सकाळी आत्महत्या केली आहे.  येथील महेश उध्दवगिरी गोसावी यांनी राहत्या घरी सकाळी आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली ते सकाळी अंघोळीला बाथरुममध्ये गेले होते तेथेच त्यांनी स्वतःच्या हाताने धारदार शस्राने गळा कापून आत्महत्या केली बराच वेळ होवुनही ते बाहेर येत नसल्यामुळे घरातील लोकांनी दरवाजा उघडून पाहीला असता जखमी  अवस्थेत असल्याचे लक्षात आले त्यांना तातडीने साखर कामगार दवाखान्यात हलविण्यात आले तेथे डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे बेलापुर पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली असुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालादार अतुल लोटके हे तपास करत आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-सार्वजनिक शौचालयाकडे जाणारे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील अनेक महीलांनी बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे .             ग्रामपंचायत बेलापुर यांना दिलेल्या निवेदनात सौ भारती लांबोळे यांनी पुढे म्हटले आहे की सार्वजनिक शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाले असुन वांरवार मागणी करुन देखील या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. सार्वजनिक शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संबधीतांनी अतिक्रमण करुन रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी समजावुन सांगुन देखील संबधीत रस्ता बंद करण्याची धमकी देत आहेत.त्यामुळे महीलांची कुचंबना होत आहे . या ठिकाणी अनेक वेळा महीलांना अरेरावी करण्यात आलेली आहे .या बाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रारी करुन देखील त्याची गंभीरतेने दखल न घेतल्यामुळे संबधीताची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने न काढल्यास सोमवार दिनांक २ आँगस्ट रोजी साकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी अहमदनगर ,जिल्हा पोलीस प्रमुख अहमदनगर, जिल्हा परिषद अहमदनगर  ,उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर ,तहसीलदार श्रीरामपुर , पंचायत समीती श्रीरामपुर  ,श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, बेलापुर औट पोस्ट आदिंना पाठविण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर सौ भरती लांबोळे ,मंगल रोडे ,कल्पना तांबे, पुजा सातापुते ,सलमा शेख, वंदना मोरे ,सुनिता रणवरे, बिसमील्लाह सय्यद, रेशमा आतार, संगीता औटी, माधुरी बैताडे, अंजना साळवे ,नंदा बैताडे ,लक्ष्मीबाई पठारे, रेखा मोरे, सुनिता मोरे ,लहानबाई शेजुळ, सुनिता साटोटे, राणी जगताप ,लिलाबाई जगताप, हिराबाई मोरे, यमुनाबाई कुमावत ,सुशिला कुमावत आदिसह अनेक महिलांच्या सह्या आहेत.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-खोदकाम करताना सापडलेल्या गुप्त  धनाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी या मागणी करीता मनसेच्या वतीने  सुरु केलेले उपोषण भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या मध्यस्थीने व पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या अश्वासना नंतर मागे घेण्यात आले. बेलापुर येथे खटोड यांच्या निवासस्थानी खोदकाम करताना गुप्तधन सापडले होते त्यात मोठ्या प्रमाणात सोने असल्याची चर्चा होती खोदकाम करणाऱ्या मजुरांनी देखील  विविध वृत्तवाहीनीला मुलाखत देताना सांगीतले होते त्यानंतर केवळ चांदीच शासनाच्या हवाली करण्यात आली मजुरांनाही लालच देण्यात आली त्यामुळे या सर्व घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करुन सर्व गुप्त धन शासनाने ताब्यात घ्यावे व तो सर्व निधी बेलापूरच्या विकासाकरीता वापरण्यात यावा या मागणी करीता मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव तुषार बोबडे उपाध्यक्षसुरेश जगताप डाँक्टर संजय नवथर गणेश दिवसे सचिन पाळंदे उदय उदावंत राहुल दातीर विशाल शिरसाठ नंदु गंगावणे विष्णू अमोलीक प्रविण कार्ले गोरक्षनाथ येळे भास्कर येळे करण कापसे हे उपोषणास बसले होते काल रात्री १० वाजता भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या उपस्थितीत  श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आपले म्हणणे वरीष्ठांना कळवू आपण उपोषण सोडावे  अशी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देवून आपण उपोषण सोडत असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी जाहीर केले

बेलापुर  (प्रतिनिधी  )- घरातून रागारागाने निघुन चाललेल्या दोन लहान मुलांना सामाजिक कार्यकर्ते  व पोलीसांच्या जागृकतेमुळे पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असुन बालकांना पाहून आई वडीलांचा जिव भांड्यात पडला घरात वडील रागावले म्हणून गायकवाड वस्तीवरील सुनिल कर्पे यांची लकी कर्पे वय ११ वर्ष व साहील कर्पे वय १३ वर्ष हे सायंकाळी पिशवीत सामान भरुन पायी बेलापूरला आले नगर रोडवर विशाल आंबेकर अमोल खैरे अजय अनाप सागर जावरे बबलू कामठे राहुल माळवदे सौरभ कापसे ओंकार साळूंके हे गप्पा मारत बसले असता ही दोन लहान मुले अंधारात चाललेली दिसली विशाल आंबेकर व राहुल माळवदे यांना शंका आली त्यांनी त्या मुलांची विचारपुस केली असता आम्ही मनमाडहून आलो असल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कानावर ही घटना घातली त्यांनी तातडीने दोन्ही मुलांना घेवून पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले त्या मुलांना पोलीस स्टेशनला आणल्या नंतर पोलीस कान्स्टेबल पोपट भोईटे यांनी दोन्ही मुलांना विश्वासात घेतले असता आम्ही गायकवाड वस्तीवर राहणारे असुन वडीलांनी मारल्यामुळे रागारागाने मनमाडला जाणार आहोत असे सांगितले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीने सरपंच महेंद्र साळवी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मुलांच्या आई वडीलांना निरोप दिला तिकडे आई वडीलही मुलांना शोधत फिरत होते सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हवालदार अतुल लोटके रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे निखील तमनर यांनी आई वडीलांना पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या समोर हजर केले त्या लहान मुलांना आई वडीलांच्या स्वाधीन केले तसेच मुलांची काळजी घेण्याचीही सक्त ताकीद दिली गावातील सामाजिक कार्याकर्त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे रागाने चाललेली दोन लहान मुले पुन्हा आई वडीलांना परत मिळाली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- पशु वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी संप काळात पशु धनाचे नुकसान होवू नये म्हणून  आपली सेवा सुरुच ठेवावी ही  जि प सदस्य शरद नवले यांची  विनंती रुरल व्हेटर्निटी प्रँक्टीशनर्स असोसिएशनने मान्य केली असल्याची माहीती संघटनेचे उपाध्यक्ष नितीन शेलार यांनी दिली आहे. शासकीय प्रमाणपत्र मिळावे नोंदणी प्रमाणपत्र मिळावे शासकीय पशुवैद्याकीय भरती प्रक्रिया तातडीने राबवावी आदीसह विविध मागण्याकरीता पशू वैद्यकिय व्यवसायीकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता संप काळात पशु धनाचे नुकसान होवु नये म्हणून जि प सदस्य शरद नवले यांनी रुरल व्हेटर्निटी प्रँक्टीशनर असोसिएशनच्या सर्व अधिकाऱ्यांना  विनंती केली की आपण संपावर गेल्यास शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होवू शकते अनेक पशु पालकांचे भवितव्य आपल्या हातात आहे आपल्या मागण्या रास्त असल्या तरी आपण संपावर गेल्यास गोपालकाचे कधीही भरुन न येणारे नुकसान होवु शकते त्यामुळे आपण संप काळातही गोपालकांना सेवा द्यावी आपल्या मागण्या शासन स्तरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु अशी विनंती  जि प सदस्य शरद नवले यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केली त्यांची  विनंती मान्य करुन सर्व पशु वैद्यकीय व्यवसायीकांनी आपली सेवा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक दुग्ध व्यवसायीकांनी जि प सदस्य शरद नवले व  पशु वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष सागर अभंग डाँक्टर संजय फरगडे नितीन शेलार यांना धन्यवाद दिले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावातील खटोड यांच्या घरी सापडलेले गुप्त धन शासकीय नियमानुसार पंचनामा करुन शासनाच्या ताब्यात दिलेले असतानाही काही लोक गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असुन शासनाने योग्य ती दखल घेण्याची मागणी गावातील नागरीकांनी केली आहे                                        ग्रामस्थ व मारवाडी समाजाच्या वतीने मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की हरिनारायण प्रेमसुख खटोड यांच्या घरी खोदकाम करताना एका घड्यात चांदीची पुरातन नाणी सापडली ती त्यांनी प्रामाणिकपणे लेखी अर्ज करुन  श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या ताब्यात दिली असे असताना काही लोक गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहे काही अति उत्साही लोक या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असुन यामुळे गावातील वातावरण खराब होवू शकते तरी या प्रकरणी आपण योग्य ती  दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी  उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर  तहसीलदार श्रीरामपुर पोलीस निरीक्षक श्रीरामपुर जिल्हाध्यक्ष माहेश्वरी समाज यांना देण्यात आलेली आहे या निवेदनावर सर्वश्री रामेश्वर सोमाणी शरद सोमाणी प्रशांत लढ्ढा  दिपक सिकची विशाल दरक गोपाल लढ्ढा प्रशांत बिहाणी सुभाष बिहाणी चैतन्य दायमा रविद्र खटोड दिलीप काळे अतुल राठी शैलेंद्र राठी सुरेशचंद्र राठी दिनेश लखोटीया संतोष ताथेड गोविंद सोमाणी प्रकाश राठी राजेंद्र सीकची संजय लढ्ढा पुरुषोत्तम मुंदडा राजेंद्र मुंदडा रामप्रसाद चांडक पवन चांडक किशोर चांडक हरिप्रसाद सिकची राजेंद्र सिकची चेतन सिकची चेतन दायमा जगन्नाथ राठी सुनिल लढ्ढा सुविजय सोमाणी सचिन बिहाणी आदिंच्या सह्या आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-दुपारी चार नंतर  सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे मा .जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना गावात पाच वाजले तरी दुकाने सुरुच होती पोलीसांनी कारवाई सुरु करताच अनेकांनी शटर बंद करुन पळ काढला                                      कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने ठरवुन दिलेले नियम पाळणे बंधनकारक असताना बेलापूरात त्या नियमांचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला पाच वाजले तरी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसत होते दुकानेही उघडी होती तसेच सर्वत्र गर्दी दिसत होती ही बाब बेलापुर पोलीसांना समजताच हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक

रामेश्वर ढोकणे पोलीस नाईक गणेश भिंगारदे  पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ यांनी गावात गस्त सुरु करताच अनेकांनी शटर बंद केली पोलीसांनी काही दुकानदारांना दंड केला अनेक लोक विनाकारण ठिकठिकाणी गप्पा मारत बसले होते पोलीसांना पहाताच अनेकांनी पळ काढला पोलीसांनी बेलापुर श्रीरामपुर चौकातील दुकानदारांना अनेक वेळा दंड करुनही ते दुकानदार दुकान उघडे ठेवत आहेत  त्यामुळे पोलीसांनी आता मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे या बाबत कामगार तलाठी कैलास खाडे या सर्व दुकानदारांना सक्त ताकीद दिली असुन शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकान सुरु ठेवल्याचे आढळल्यास एक महीन्याकरीता दुकान सिल करण्याची तोंडी सूचना सर्वांना देण्यात आलेली असल्याचे कामगार तलाठी खाडे यांनी पत्रकारांना सांगितले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- येथील खटोड यांच्या घरी सापडलेल्या गुप्त धनाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी मनसेच्या वतीने आज पासुन उपोषण सुरु करण्यात आले असुन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदेसह अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत                                   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष  बाबासाहेब शिंदे यांनी या बाबत पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते म्हणाले की बेलापुर येथील खटोड यांच्या घरी खोदाकाम सुरु असताना एक हंडा सापडला त्यात खाली सोन्याची नाणी व वरती चांदी होती संबधीत मालकाने त्यातील सोने काढुन केवळ दिखाव्यासाठी चांदी शासनाच्या हवाली केली आहे जमिनीत सापडलेले गुप्तधन हे शासनाच्या मालकीचे असातानाही ते लपवुन केवळ चांदीच जमा करण्यात आली असुन तसे जबाबही खोदकाम करणाऱ्या मजुरांनी दिलेले आहेत त्यावरुन गुन्हा दाखल करुन जमिनीत सापडलेले गुप्तधन हे ताब्यात घेण्यात यावे तसेच संबधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी केली आहे  मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे तुषार बोबडे सुरेश जगताप डाँक्टर संजय नवधर गणेश दिवसे सचिन पाळंदे उदय उदावंत राहुल दातीर विशाल शिरसाठ नंदु गंगावणे विष्णू अमोलीक प्रविण कार्ले गोरक्षनाथ येळे भास्कर सरोदे करण कापसे आदि कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )-येथील चौदा वर्ष वयाची एक अल्पवयीन मुलगी दुपारी दोन वाजेपासून घरातून निघुन गेली असुन शोधा शोध करुनही मुलगी न सापडल्यामुळे नातेवाईकांनी सायंकाळी बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे.या बाबत समजलेली हकीकत अशी की पढेगाव रोडवर असणाऱ्या पाहुणे नगर मधील एक अल्पवयीन मुलगी (वय वर्ष १४ ) दुपारी दोन वाजेदरम्यान आईला डबा घेवुन निघाली होती परंतु ती गावात पोहोचलीच नाही त्यामुळे तिची आई व नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु कुठेही आढळून आली नाही त्यामुळे त्यांनी बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सी सी टिव्ही च्या अधारे शोध घेतला असता एका रस्त्याने ती मुलगी एकटीच जाताना दिसली या बाबत पोलीसांनी अधिक चौकशी करुन माहीती घेतली असता गावातील एक २१ वर्षाचा तरुणही घरातून पैसे घेवून निघुन गेल्याची माहीती मिळाली असुन या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

राहुरी ( प्रतिनिधी): राहुरी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पदोन्नती मिळाल्या बद्दल Dysp संदीप मिटके , pi नंदकुमार दुधाळ यांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात. थेट Dysp साहेबांनीच पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर स्टार लाऊन दिल्यामुळे कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.  Psi वाघ यांनी प्रास्तविक केले , Asi ढाकणे, Asi गायकवाड, hc राठोड, hc चव्हाण, Lpn गुंजाळ, pn साखरे यांनी भावना व्यक्त केल्या तर Lpn कोहकडे यांनी आभार मानले.पदोन्नती मिळालेले पोलीस कर्मचारी खालील प्रमाणे 

हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षक

१) नारायण यादवराव ढाकणे २)चंद्रकांत निवृत्ती बऱ्हाटे ३)संजय यशवंत शिंदे

नाईक ते हवालदार पदी बढती मिळालेले

१)योहान शांतवन सरोदे २)आदिनाथ भगवान बडे ३)वाल्मीक दादाभाऊ पारधी

४)संजय शंकर कारेगावकर ५)सोमनाथ भगवान जायभाय ६)संजय बाबुराव राठोड

७)दिनकर राजाराम चव्हाण ८)विठ्ठल न्हनू राठोड


पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस नाईक

१)उत्तरेश्वर सोमनाथ मोराळे २)मंजुश्री सुभाष गुंजाळ ३)जालिंदर धनाजी साखरे

४)शाहमद शब्बीर शेख ५)गणेश भरत सानप.


बेलापुर  (प्रतिनिधी )- जुन्नर शहरातील एका तरुणाशी लग्न करण्याचा बनाव करुन फसवणूक केल्याप्रकरणी बेलापुर येथील रखमा गाढे सह चार आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची जुन्नर पोलीसांनी दिली आहे जुन्नर शहरालगतच्या कबाडवाडी पाडळी येथील शेतकरी तरुणाशी लग्न करण्याचा बनाव करून लग्नानंतर रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने घेऊन नवरी पळून गेल्याप्रकरणी दाखल प्रकरणाचा तपास जुन्नर पोलिसांनी शिताफीने तपास करून यामधील चार आरोपींना अटक केली आहे.गणेश रामदास पवार या शेतकरी तरुणाने याबाबतची फिर्याद दि. २८ एप्रिलला जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गणपत आबाजी चौधरी (रा. चांदवड, नाशिक), छाया बाबूराव गायकवाड, रुपाली बाळासाहेब शिनगारे, सुनीता बाळासाहेब शिनगारे (सर्व जण रा. खंडाळा, श्रीरामपूर), रखमाजी गाडे-पाटील (रा.बेलापूर, श्रीरामपूर) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व आरोपींचा जुन्नर पोलिस शोध घेत होते. सायबरमार्फत या सर्वांचे मोबाईल लोकेशन काढून माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल लोहकरे, पोलिस अंमलदार संदीप लोहकरे, प्रशांत म्हस्के, वाल्मीक शिंगोटे, प्रसाद दातीर, मनीषा ताम्हाणे, किरण आघाव, शीतल गारगोटे या पथकाने चांदवड व श्रीरामपूर येथे जाऊन या पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

जबरी चोरी प्रकरणाची Dysp संदिप मिटके यांच्या कडून गंभीर दखल

दिनांक 18/ 7 /2021 रोजी मध्यरात्री देवळाली प्रवरा येथे झालेल्या जबरी चोरी व घरफोडीचे प्रकरणाची Dy.s.p संदीप मिटके यांनी गंभीर दखल घेत देवळाली प्रवरा दूरक्षेत्र चे अधिकारी व अंमलदार यांच्या तडकाफडकी बदल्या करून त्यांचे जागी नवीन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.देवळाली प्रवरा सह इतर 32 गावातील कामकाज या विषयावर  देवळाली प्रवरा नगरपरिषद येथे आमदार लहू कानडे  यांनी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीदरम्यान देवळाली प्रवरा येथे झालेल्या घरफोडीच्या अनुषंगाने आमदार लहू कानडे व राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचेत  चांगलीच खडाजंगी झाली होती सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत Dy.s.p.संदीप मिटके यांनी देवळालीप्रवरा चे सर्व अधिकारी व अंमलदार यांची तात्काळ बदली करून त्यांचे जागी नवीन अधिकारी आणि अमालदर यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत

यांची झाली बदली

PSI मधुकर शिंदे

Asi टिक्कल

Pn  जानकीराम खेमनार

PC  गणेश फाटक

Pc  अमोल पडोळे

Pc  किरण ठोंबरे

नवनियुक्त अधिकारी कर्मचारी

Psi निलेश वाघ

Hc प्रभाकर शिरसाठ

Pn  वैभव साळवे

Pc सुरेश भिसे,  महेंद्र गुंजाळ,  सागर माळी,  शहामद शेख.

श्रीरामपूर शहर पोलिसांन कडे दिनांक 23 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी पोलिसांच्या  मारहाणीत एका युवकाचा हात फॅक्चर होऊन मोठी दुखापत झालेली आहे.या घटनेची सीसीटीव्ही फुटेज हे माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली होती. मात्र सदर अर्जाची माहिती मुदतीमध्ये देण्यात आली नाही त्यामुळे अपील दाखल करावी लागली. प्रथम अपीलीय अधिकारी याच्याकडे अपील करण्यात आले यावेळी दोन्ही बाजूने माहिती घेत अपीलार्थी यांच्या बाजुने निकाल दिला व सदर प्रकरणी सुनावणी करुन दि. 05.07.2021 रोजी आदेश जरी करण्यात आला.  तात्काळ माहिती ही विनामूल्य देण्याचे आदेश जारी केले.  मात्र श्रीरामपूर शहर पोलिस निरीक्षक यांनी आदेशाला केराची टोपली दाखवत आज १७ दिवस उलटले तरी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. साहेबांना भेटा,साहेबांची सही आजून झलेली नाही.  सदर माहिती अधिकारी हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून माहिती लपवण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही अपेक्षा घेऊन.मी लवकरच श्रीरामपूर पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या विरोधात अहमदनगर जिल्हा पोलीस कार्यालय या ठिकाणी लवकरच उपोषण करणार आसल्याची माहिती असलम बिनसाद यांनी दिली आहे.

"" ईद-उल-अजहा '"म्हणजे फक्त आपल्या भारतातच त्यालाच " बकरी ईद '" म्हणतात .   ".कुरबानी ईद "" म्हणून ही बोली भाषेत प्रसिद्धी आहे. आणि भारतातील खुप कॅलेंडर मधे त्याला बकरी ईद म्हणून च प्रसिद्धी देवून टाकतात ,पण असे नाही आहेत ,ईद अल अजहा ही ईद फार पवित्र ईद आहेत .. या दिवसाचे फार महत्त्व पवित्र आहे .

         ५पांचहाजार वर्षे पुर्वी प्रेषीत इब्राहिम अलैहिससलाम .यांना अल्लाह ने स्वपनामधे आज्ञा केली की, तुझं सर्वात प्रिय जे काही आहे ते कुरबान करं , तदनंतर हजरत इब्राहिम अलै.यांनी खुप विचार केला. काय आहे अपलं सर्वात प्रिय .तर डोळ्यांसमोर विज कपकपावी तसं झालं , लख्खप्रकाश पडाव तसं झालं , समोरच एकुलता एक मुलगा हजरत इस्माईल अलै. त्यांच्या डोळ्यासमोर  होते . आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी अगदी उतारवयात जन्म झालेला एकुलता एक मुलगा , ज्यासाठी अल्लाहा रबबुल आलमीन जवळ कित्येक वेळा दुआ करून अल्लाहाच्या आशिर्वादाने झालेल्या मुलाला अल्लाहा त्याची कुरबानी मागतात .

            एकप्रकारे अल्लाहा कडून परीक्षाच होती ती . 

          क्षणाचाही विचार न करता हजरत इब्राहिम अलै.नी हा विचार आपल्या पत्नीला व एकुलता एक भर जवानीत आलेल्या मुलाला हजरत इस्माईल अलै . यांना बोलावुन अल्लाहा रबबुल आलमीन ची ईच्छा सांगतात . तो आज्ञाधारक मुलगा हजरत इस्माईल अलै . आपल्या वडिलांच्या आज्ञाला लगेच यत्किंचितही विचार न करता लगेच अल्लाहा रबबुल आलमीन ची ईच्छाच असेल तर , होकार देतात .....

तारीख असते जिलहिजजा १०,मीनाचं मैदानात ,एक वयोवृद्ध वडील आपल्या उतारवयातील काठी ज्याला म्हणतात अशा आपल्या काळजाच्या तुकड्यांला घेवून कुरबानी साठी तयार करून नेतात.

 काय घडी असेल ती .......मन स्तंभ होवून जातं........हा विचार करून...

               अल्लाहा कडून परीक्षाची घडीच होती  ती...

अल्लाहा रबबुल आलमीन च्या परीक्षा साठी

हजरत इब्राहिम अलै. तययार होतात. डोळ्याला पट्टी बांधून कुरबानी साठी आपल्या मुलांवर सुरी चालवण्यासाठी जातात तेवढ्यात अल्लाहा ने काही क्षणातच चमत्कारिक घडावं तसं  पापणीच्या उघडझाप होण्याच्या आधीच तेथे हजरत जिब्राईल अलै.यांच्याद्वारे  एक दुमंबा (,मेंढा) पाठवून . त्या दुमंब्याची कुरबान दिली . काही वेळा ने हजरत इब्राहिम डोळ्यावरील पट्टी काढून बघतात आश्चर्य च बघावयास मिळते .हजरत इब्राहिम कृतज्ञता व्यक्त करतात .

अल्लाहा  कडून मानव जातीला एक उदाहरण होते.

   ...जगाच्या पाठीवर एक ऐतिहासिक कुरबानी होती ती. 

अल्लाहा ने हजरत इब्राहिम अलै.व हजरत इस्माईल अलै यांची सत्व परीक्षा बघून .. समस्त मानवजातीसाठी धडाच  दिला.

          तदनंतर आजपर्यंत  लोकांकडून त्याची आठवण म्हणुन व समस्त जगातील मुस्लिम ज्यांची कुरबानी करण्याची ऐपत आहे ते  कुरबानी करतात..त्यामधे तीन हिस्से करून एक वाटा आपल्या साठी ,ऐक वाटा मित्रगण व नातेवाईक व तीसरा वाटा गोरगरिबांसाठी वाटून देण्यात येते ....

                      त्याचप्रमाणे कुरबानी म्हणजे फक्त रक्त सांडून न होता आपले मनातील वाईट भावना , विचार ,आचार यांचं ही सोडून देणं होय ....व चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणे ही .....ही पवित्र भावना ही असते....

              तसेच काही धनिक वर्ग हाज यात्रेला जावून करतात ."" .हाज यात्रा .....""".

ज्यांच्याकडे मुलाबाळांचे सर्व खर्च भागून जो पैसा शिल्लक राहिलेला आहे त्या पैशातून हाज ला जाण्यासाठी एवढी रक्कम आहे त्यांनी ' हाज 'करणे , आयुष्यात एक वेळा पैसा असलेल्यांसाठी हाज अनिवार्य केले आहेत.

   ऊर्द महिन्याचा १२वा महिना जिल-हिजजा ,या जिलहिजजा  महिन्यातील ता.८ ,९ १० ,११ ,१२,  असतात . हाजी. लोकं  ता. ८ जिलहिजला मक्का च्या काबागृहामध्ये अंगावर पांढरेशुभ्र वस्त ्गुंडाळून, लपेटून  पुरुष असो स्त्री असो अंगाला  पांढरा शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करून पुरुष अडीच ते तीन मीटर लांब कपडा आपल्या सर्व अंगात गुंडाळून व स्त्रिया पांढरा शुभ्र ऐहराम चा कपडा  परीधान करून येतात त्यांस''  ऐहराम "' असे म्हणतात .

                          ऐहेराम पांघरूण , '" आल्लाहा मी हजर आहे ,।। आल्लाहा मी हजर आहे।। आल्लाहा  मी हजर आहे  ।।। 

आशा मंजुळ स्वरांचा निनाद  दुमदुमत रात्रंदिवस  मक्केमध्ये  हाजमय वातावरणात  मीना नावाच्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या"  आराफात  " या पवित्र ऐतिहासिक मैदानात पोहोचतात .९ नऊ जिलहिज हे  हाज  चा प्रमुख मुख्य दिवस असतो .

                       तर सर्व हाजी सकाळी बाराच्यासुमारास  पवित्र ऐतिहासिक मैदानात पोचून " मस्जिद ऐ नमराह  ' येथे जोहरची नमाज अदा करतात .आपल्या पापांची क्षमा ,करुणा ,मागतात . मुला-बाळांसंबंधी , नातेवाईकासंबंधी आपल्या देशासंबंधी त्याठिकाणी दुआ मागतात .

त्याठिकाणी जगातील विविध देशातून आलेले विविध भाषिक जवळपास ३५६४ बोलीभाषा  बोलल्या जातात , आशा कित्येक ठिकाणाहून आलेले हाजी  एकाच आराफात च्या पवित्र मैदानामध्ये एकत्र जमून  कोणीही उच्य नाही, कोणी गरीब नाही ,कोणी काळा नाही व कोणी गोरा नाही  सर्व लेकरे आल्लाहाची आहेत.सर्व माणसं सारखीच  30 ते 40 लाख लोक एकाच रांगेत अल्लाच्या छताखाली बसून अल्लाहच्या आदेशाचे पालन करतात, एकाच भाषेच्या कुरआन मजीद मधे सांगितलेल्या आदेशाचे पालन करतात. रडून-रडून, व्याकुळ होऊन,ऊर बडवून अल्लाहा जवळ आपण केलेल्या कळत-नकळत पापांची  माफी मागतात .आल्लाहा जवळ पाप मुक्तीची प्रार्थना करतात.

           ३ मार्च ६३२ या दिवशी हजरत प्रेषित मोहम्मद सल्ल. यांनी " मानवी कल्याणासाठी जगप्रसिद्ध ऐतिहासिक  ( Historical Farewell Pilgrimage Speech)  म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यालाच हाजजतुल विदाह खुतबा दिलेला आहेत .

अल्लाहचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सल्ल. यांनी मक्का विजयानंतर आपल्या ' जीवनाची अंतिम हाज' यात्रेला आपल्या पत्नीसह सुमारे एक लाखापेक्षा जास्त सहाबा व अनुयायी सह "  3मार्च ६३२ '

 '  आराफात " या मैदानात  दाखल झाले . लोकं हजरत प्रेषित यांना बघून उत्साहाला सिमाच राहिली नाही. भक्तीच्या सागरात लोटलेल्या लोकांना  प्रेषित मुहम्मद स्व.यांच्या प्रवचनची ओढ  क्षणाक्षणाला लागलेली होती. 

                            प्रेषित हजरत सल्ल.  यांनी  टेकडीवर चढून  खूतबा  Historical speech देण्यास प्रारंभ केला, 

                        "  सर्व स्तुतीसुमनं ही फक्त अल्लाहासाठी आहे . व  मी असे घोषित करतो की आल्लाहा  हा केवळ एकच आहेत , व प्रेषित मोहम्मद स्व.  शेवटचे प्रेषित (नबी व रसुल)आहेत. तुम्ही सर्व आदम ची संतान आहात. तुमचा रब हा

 एकच आल्लाह आहेत . आदम हे मातीने बनवलेले होते , परंतु तुम्ही सर्व आपापसात एकमेकांचे भाऊ , बंधु आहेत .तुम्ही सर्व मातीतूनच जन्मलेले आहेत. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे .    मानवामध्ये जात-पात , रंग ,.नसल,काळे-गोरे, वर्णदोषाला काही स्थान नहीं .

शेवटी सर्व मानवजात   ही एकाच आल्लाहाची लेकरे आहेत .त्यामुळे संयम बाळगा .तुम्ही परस्परांचे गळे कापुन श्रद्धा- हिन होवू नका . 

कोणत्याही कळ्यांचा गोऱ्यांवर अधिकार नाही व कोणत्याही गोर्‍यांचा काळ्यावर अधिकार नाही असे म्हणत तुम्ही सर्व एकच आहेत .

 हे लोकांनो , जो अपराध  करील त्याच्या खेरीज अन्यकोणावर त्या अपराधाची जबाबदारी येत नसते . व  त्यांनी केलेल्या अपराधाची त्याचा मुलगा जबाबदार असत नाही व मुलाने केलेल्या अपराधासाठी त्याचा बाप जबाबदार असंच नाही ;

   त्यामुळे खून खराबा पासून सावध राहा,  दूर राहा , तुम्ही परस्परांचे गळे कापून श्रद्धाहीन होऊ नका , कायम अल्लाहाचे भय बाळगा.आल्लाहा सगळे काही बघत आहे .

         तुम्ही कष्टाने काम करून खाणारे अल्लाहाला जास्त प्रिय आहेत .

        त्यामुळे तुम्ही जे काही हाराम काम करता आहेत उदा.  सट्टा खेळणे , व्याज देणे -घेणे, दारू पिणे ,पाडणे.चोरी -लूट करणे, इत्यादी हाराम कामापासून अलिप्त रहा, सावध रहा ,दूर रहा .

         कष्ट करणारे आल्लाहाजवळ जास्त प्रिय आहेत .

              जर तुम्ही एखाद्यास ऊधार मदत केली असेल तर त्याच्याकडून व्याज व जास्तीचे पैसे घेऊ नका त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा ; 

         जर तुम्ही कर्ज दाराजवळ एवढे पैसे नसतील तर तुम्ही त्याला माफ करा , संपूर्ण पैसे माफ करा. अशा करण्यामुळे आल्लाहच्या कृपाप्राप्त व्हाल. 

       वारसांना वारसाहक्क लवकरात लवकर द्या . 

       महिला या अल्लाहाच्या' "" अमानती'"  आहेत त्याबद्दल अल्लाहचे भय बाळगा, त्यांना त्रास देऊ नका ,त्यांचा योग्य सांभाळ करा ,त्यांचे जे काही हक्क असतील ते सर्व हकक लवकर देऊन टाका. त्यांच्या विरासतीतील  हिस्सा जो असेल तर लवकर देऊन टाका .ते विरासतीमधील हिस्सेदार आहेत .त्यांच्या बरोबर योग्य ज्ञाय करा ,इंसाफ करा. त्यांना तुम्ही अल्लाच्या जामीनावर  स्विकारलेली आहेत .

         तर तुमचे तुमच्या पत्नीवर अधिकार आहेत ,; आणि तसेच तुमच्याप्रमाणे तुमच्या पत्नीचे तुमच्यावर अधिकार आहेत तर त्यांचे अधिकार द्या. त्यांना योग्य प्रकारे वागवा ,त्यांचा संभाळ योग्य प्रकारे कारा.  त्याची तमा बाळगा. आल्लाहा  सर्व काही बघत आहेत. कयामतच्या  दिवशी तुम्हाला  हिशोब द्यायचा आहे ; तर तुम्ही त्या दिवसाची आठवण ठेवा ..

     हे लोकांनोंं,  माझे म्हणणे.,(खुतबा), काळजीपूर्वक  ऐकावे ,कारण  या वर्षांनंतर मी तुमच्यात असेल किंवा नसेल हे मी सांगू शकत नाही .

        तुमचे प्राण वित्त ,अंतिम निर्णय  हा कयामतच्या दिवसापर्यंत पवित्र व अतुलनीय आहेत ..

                    लक्षात ठेवा शेवटी तुम्हाला आल्लाहासमोर हजर व्हायचे आहेत , तोच तुमच्या सार्‍या स्वर्गीय व नरकाच्या  हिशोब बांधणार आहेत..

         लोकांनों ,मी माझे जीवन कार्य पूर्ण केलेले आहेत मी माझ्या आल्लाहाचा कुरआन मजिद  व त्यांच्या प्रेषितांचे सुन्नत(हादीस) तुम्हांसाठी सोडून जात आहेत.     तर त्यास श्रद्धेने व  आपल्या जीवनामधे  त्यांच्यावर अंमल करा,अंमलात आणा ,  तुम्ही सरळ मार्ग कधीही सोडू नका ,तुम्ही आल्लाहच्या मार्गावर चला. व सर्व जगात हा संदेश पाठवा ''. 

                             प्रेषितांचे  हे प्रवचन , संदेश ऐकून लाखोंच्या संख्येने त्यांचे मित्रगण (सहाबा , रजि.)  ढसाढसा रडू लागले व तिथूनच आपल्या लाडक्या प्रेषितांचे लोक कल्याणकारी  संदेश घेऊन जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात   ज्यांना जेथे जेथे मार्ग भेटले तेथे तेथे अनुयायी( सहाबा) व त्यांनाही मानणाऱ्या संतांनी ,वलींनी , पीर ,व ईतर धर्म प्रचारक  असतील त्यांनी ईसलाम व प्रेषीतांचा लोककल्याणकारी संदेश शांतपणे ,शांतबद्ध रितीने प्रसारित केला.व आजही करीत आहेत ..... 



लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख.

बैतुशशिफा दवाखाना, श्रीरामपूर

९२७१६४००१४,.

बेलापूर वार्ताहर,कासम शेख व त्यांचे सहकारी यांची महाराष्ट्र लघुवृत्तपत्र पत्रकार संघात बेलापुर चे माहिती व कायद्या या मासिक व्रत्त पत्राचे  प्रतिनिधी यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ यामध्ये नवनिर्वाचित पदांची निवड झाल्याने इलेक्ट्रॉनिक मिडीया जिल्हा अध्यक्ष श्री असलम बिनसाद यानी सदिच्छा भेटी दरम्यान त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच शितल टाइम्स चेउपसंपाद सुहास शेलार यांचाही सत्कार करण्यात आला.निवड झालेले पदाधिकारी,बेलापूर शहर प्रमुख एजाज सय्यद,उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद,शहर संघटक मुसा सय्यद तालुका अध्यक्ष कासम शेख यांचाही सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी माहिती व कायद्याचे पत्रकार एजाज सय्यद,मोहम्मद अली सय्यद,शफिक शेख, जिल्हा प्रतिनिधी कासम शेख,तसेच समीर भाई,मजर भाई आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर :-( प्रतिनिधी)महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या बेलापूर शहर कार्यकारिणी ची नुकतीच निवड करण्यात आली असून शहराध्यक्षपदी माहीती व कायदा या वृत्तपत्राचे प्रतिनिधी एजाज सय्यद तर शहर उपाध्यक्ष पदी मोहंमद अली सय्यद तसेच बेलापूर शहर संघटक पदी मुसा सय्यद यांची निवड करण्यात आली. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी शेख यांनी श्रीरामपूर येथील पत्रकार संघाचे मुख्य कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी सदरील पत्रकारांच्या कार्याचा आढावा घेता या पदांवर निवड करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर मोहंमद,प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, किशोर गाढे, राज मोहंमद शेख जिल्हाध्यक्षसु भाषराव गायकवाड, अरुण बागुल, अमीर जागीरदार, असलम बिनसाद, विलास पठारे, अरुण त्रिभुवन, मुदस्सर पटेल, वहाब खान, उस्मान के. शेख, फिरोज पठाण, सुखदेव केदारे, रवींद्र केदारे, राहुल गायकवाड, अन्वर पठाण, छबुराव साळुंखे, सूर्यकांत गोसावी, हाजी शकील शेख, अब्दुल्ला भाई चौधरी, इदरीस भाई शेख दस्तगीर शहा, शाहनवाज बेगमपूरे, सज्जाद पठाण, जीशान काझी, उगलमुगले, मिलिंद शेंडगे, अफजल खान, हनिफ भाई तांबोळी, रियाज खान पठाण, विजय खरात, गोरक्ष गाढवे, शब्बिर भाई कुरेशी, अक्रम कुरेशी, साईनाथ बनकर, अकबर भाई शेख, गुलाब भाई शेख, जावेद के. शेख, रमेश शिरसाट, हनीफ शेख, आदींनी शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर : मुस्लिम धर्मीय बांधवांचा पवित्र बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांपूर्वी, पोलीस प्रशासन, पालिका प्रशासन, मुस्लिम धर्मगुरू ,तसेच समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीवेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, यांनी शासनाच्या गाईडलाईन, तसेच नियमांच्या अधीन राहून यंदाच्या वर्षी कोरोनाच्या तिसऱ्या लाटांचे संकट उभे असल्याने प्रतिकात्मक स्वरूपात, कुर्बाणीचा कार्यक्रम करावा आशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर, शहरातील वार्ड नंबर २ व इतर भागात पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला, यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप, साह्ययक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक घायवट, पोलीस उपनिरीक्षक उजे यांच्यासह, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाच्या जवानांसह, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे ६५ कर्मचारी सहभागी झाले होते. नियम पाळण्याचे आवाहन 


पंढरपूर सोलापूर :  आषाढी एकादशीनिमित्त आज २० जुलै २०२१ रोजी पंढरपूरमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा भक्तीमय वातावरणात पार पडली.दरम्यान, पहाटे सव्वा दोन वाजल्यापासून या महापुजेला सुरुवात झाली होती. दरवेळेस मुख्यमंत्र्यांसोबत एका वारकऱ्याला या महापुजेचा मान मिळतो. मात्र यंदा वारीच नसल्याने हा मान विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विणेकरी मूळचे वर्धा येथील केशव शिवदास कोलते यांना हा मान मिळाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत वर्धा येथील केशव शिवदास कोलते व त्यांची पत्नी इंदूबाई केशव कोलते यांना यंदा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला.  आजच्या या महापुजेला मुख्यमंत्र्यांसोबतच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. तसेच पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी मंदिरात हजर होते.आषाढी एकादशीच्या महापूजेनिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर उजळून निघाले होते. यंदा आषाढी एकादशीची महापूजा ही वारकऱ्यांविनाच पार पडली. खरं तर गेली अनेक शतकं वारीची परंपरा मात्र कोरोनाचं संकटामुळे मागील दोन वर्षापासून ही परंपरा खंडित झाली. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित येणाऱ्या माऊलींच्या पादुका यंदा राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून पंढरपुरात दाखल झाल्या. यावेळी मोजके वारकरी या पालख्यांसोबत होते. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज ओसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर). ह. भ. प. प्रकाश नवंजाळ तसेच कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, सदस्य, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद व अन्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

राहुरी प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिका सभागृहात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील  विविध विषयांवरील आढावा बैठकीत आ. लहू कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. आ. कानडे यांनी जबाबदारीची जाणीव ठेवताना लोकप्रतिनिधींबरोबर ‘प्रोटोकॉल’ पाळण्याचा सल्ला दिल्यानंतर संतप्त झालेल्या दुधाळ यांनी माझी 25 वर्षे सेवा झाली. आम्हाला जबाबदारी समजते. असे सांगून धावून बोलू नका, असे उलट उत्तर देऊन आ. कानडे यांची उलट तपासणी घेतली. त्यामुळे या आढावा बैठकीत  तणावपूर्ण शांतता निर्माण होऊन मूळ विषयांना बगल मिळून उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांची चांगलीच करमणूक झाली.दरम्यान, सार्वमतच्या देवळालीत दरोडाप्रकरणी वृत्तावर आ. कानडे यांनी दुधाळ यांना जाब विचारून त्यांना चांगलेच धारेवर धरले. दरोड्याच्या घटनेत काय प्रगती झाली? याची विचारणा केली. मात्र, यावर दुधाळ यांची उत्तरे देताना चांगलीच दमछाक झाली. खडाजंगीनंतर आढावा बैठकीत ‘लेटलतीफ’ ठरलेल्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना आ. कानडे यांनी बैठकीतून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर दुधाळ यांनी मधूनच आढावा बैठकीचे कामकाज अर्धवट सोडून काढता पाय घेतला. आमदारांबरोबर ‘प्रोटोकॉल’ न पाळता त्यांच्याबरोबर अरेरावी करणार्‍या दुधाळ यांच्यावर आमदारांकडून काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.श्रीरामपूर मतदारसंघातील देवळाली प्रवरासह प्रवराकाठच्या 32 गावांतील जिव्हाळ्याच्या विषयावर आ. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, तत्पूर्वीच आ. कानडे यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकार्‍यांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. त्याचे रूपांतर बाचाबाचीत झाले. पोलीस निरीक्षक दुधाळ हे तावातावाने आढावा बैठकीतून निघून गेल्यानंतर पुन्हा विस्कळीत झालेल्या कामकाजाला सुरूवात झाली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget