आ. कानडे-पोलीस निरीक्षकांत जोरदार हमरीतुमरी.

राहुरी प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिका सभागृहात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील  विविध विषयांवरील आढावा बैठकीत आ. लहू कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. आ. कानडे यांनी जबाबदारीची जाणीव ठेवताना लोकप्रतिनिधींबरोबर ‘प्रोटोकॉल’ पाळण्याचा सल्ला दिल्यानंतर संतप्त झालेल्या दुधाळ यांनी माझी 25 वर्षे सेवा झाली. आम्हाला जबाबदारी समजते. असे सांगून धावून बोलू नका, असे उलट उत्तर देऊन आ. कानडे यांची उलट तपासणी घेतली. त्यामुळे या आढावा बैठकीत  तणावपूर्ण शांतता निर्माण होऊन मूळ विषयांना बगल मिळून उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांची चांगलीच करमणूक झाली.दरम्यान, सार्वमतच्या देवळालीत दरोडाप्रकरणी वृत्तावर आ. कानडे यांनी दुधाळ यांना जाब विचारून त्यांना चांगलेच धारेवर धरले. दरोड्याच्या घटनेत काय प्रगती झाली? याची विचारणा केली. मात्र, यावर दुधाळ यांची उत्तरे देताना चांगलीच दमछाक झाली. खडाजंगीनंतर आढावा बैठकीत ‘लेटलतीफ’ ठरलेल्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना आ. कानडे यांनी बैठकीतून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर दुधाळ यांनी मधूनच आढावा बैठकीचे कामकाज अर्धवट सोडून काढता पाय घेतला. आमदारांबरोबर ‘प्रोटोकॉल’ न पाळता त्यांच्याबरोबर अरेरावी करणार्‍या दुधाळ यांच्यावर आमदारांकडून काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.श्रीरामपूर मतदारसंघातील देवळाली प्रवरासह प्रवराकाठच्या 32 गावांतील जिव्हाळ्याच्या विषयावर आ. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, तत्पूर्वीच आ. कानडे यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकार्‍यांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. त्याचे रूपांतर बाचाबाचीत झाले. पोलीस निरीक्षक दुधाळ हे तावातावाने आढावा बैठकीतून निघून गेल्यानंतर पुन्हा विस्कळीत झालेल्या कामकाजाला सुरूवात झाली.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget