बेलापुर (प्रतिनिधी )-खोदकाम करताना सापडलेल्या गुप्त धनाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी या मागणी करीता मनसेच्या वतीने सुरु केलेले उपोषण भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या मध्यस्थीने व पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या अश्वासना नंतर मागे घेण्यात आले. बेलापुर येथे खटोड यांच्या निवासस्थानी खोदकाम करताना गुप्तधन सापडले होते त्यात मोठ्या प्रमाणात सोने असल्याची चर्चा होती खोदकाम करणाऱ्या मजुरांनी देखील विविध वृत्तवाहीनीला मुलाखत देताना सांगीतले होते त्यानंतर केवळ चांदीच शासनाच्या हवाली करण्यात आली मजुरांनाही लालच देण्यात आली त्यामुळे या सर्व घटनेची निपक्षपातीपणे चौकशी करुन सर्व गुप्त धन शासनाने ताब्यात घ्यावे व तो सर्व निधी बेलापूरच्या विकासाकरीता वापरण्यात यावा या मागणी करीता मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे जिल्हा सचिव तुषार बोबडे उपाध्यक्षसुरेश जगताप डाँक्टर संजय नवथर गणेश दिवसे सचिन पाळंदे उदय उदावंत राहुल दातीर विशाल शिरसाठ नंदु गंगावणे विष्णू अमोलीक प्रविण कार्ले गोरक्षनाथ येळे भास्कर येळे करण कापसे हे उपोषणास बसले होते काल रात्री १० वाजता भाजपाचे नेते प्रकाश चित्ते यांच्या उपस्थितीत श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी आपले म्हणणे वरीष्ठांना कळवू आपण उपोषण सोडावे अशी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देवून आपण उपोषण सोडत असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी जाहीर केले
Post a Comment