बेलापुर (प्रतिनिधी )- घरातून रागारागाने निघुन चाललेल्या दोन लहान मुलांना सामाजिक कार्यकर्ते व पोलीसांच्या जागृकतेमुळे पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असुन बालकांना पाहून आई वडीलांचा जिव भांड्यात पडला घरात वडील रागावले म्हणून गायकवाड वस्तीवरील सुनिल कर्पे यांची लकी कर्पे वय ११ वर्ष व साहील कर्पे वय १३ वर्ष हे सायंकाळी पिशवीत सामान भरुन पायी बेलापूरला आले नगर रोडवर विशाल आंबेकर अमोल खैरे अजय अनाप सागर जावरे बबलू कामठे राहुल माळवदे सौरभ कापसे ओंकार साळूंके हे गप्पा मारत बसले असता ही दोन लहान मुले अंधारात चाललेली दिसली विशाल आंबेकर व राहुल माळवदे यांना शंका आली त्यांनी त्या मुलांची विचारपुस केली असता आम्ही मनमाडहून आलो असल्याचे सांगितले त्यामुळे त्यांनी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कानावर ही घटना घातली त्यांनी तातडीने दोन्ही मुलांना घेवून पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले त्या मुलांना पोलीस स्टेशनला आणल्या नंतर पोलीस कान्स्टेबल पोपट भोईटे यांनी दोन्ही मुलांना विश्वासात घेतले असता आम्ही गायकवाड वस्तीवर राहणारे असुन वडीलांनी मारल्यामुळे रागारागाने मनमाडला जाणार आहोत असे सांगितले उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी तातडीने सरपंच महेंद्र साळवी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी मुलांच्या आई वडीलांना निरोप दिला तिकडे आई वडीलही मुलांना शोधत फिरत होते सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हवालदार अतुल लोटके रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे निखील तमनर यांनी आई वडीलांना पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या समोर हजर केले त्या लहान मुलांना आई वडीलांच्या स्वाधीन केले तसेच मुलांची काळजी घेण्याचीही सक्त ताकीद दिली गावातील सामाजिक कार्याकर्त्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे रागाने चाललेली दोन लहान मुले पुन्हा आई वडीलांना परत मिळाली.

Post a Comment