बेलापुर (प्रतिनिधी )- पशु वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी संप काळात पशु धनाचे नुकसान होवू नये म्हणून आपली सेवा सुरुच ठेवावी ही जि प सदस्य शरद नवले यांची विनंती रुरल व्हेटर्निटी प्रँक्टीशनर्स असोसिएशनने मान्य केली असल्याची माहीती संघटनेचे उपाध्यक्ष नितीन शेलार यांनी दिली आहे. शासकीय प्रमाणपत्र मिळावे नोंदणी प्रमाणपत्र मिळावे शासकीय पशुवैद्याकीय भरती प्रक्रिया तातडीने राबवावी आदीसह विविध मागण्याकरीता पशू वैद्यकिय व्यवसायीकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता संप काळात पशु धनाचे नुकसान होवु नये म्हणून जि प सदस्य शरद नवले यांनी रुरल व्हेटर्निटी प्रँक्टीशनर असोसिएशनच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती केली की आपण संपावर गेल्यास शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होवू शकते अनेक पशु पालकांचे भवितव्य आपल्या हातात आहे आपल्या मागण्या रास्त असल्या तरी आपण संपावर गेल्यास गोपालकाचे कधीही भरुन न येणारे नुकसान होवु शकते त्यामुळे आपण संप काळातही गोपालकांना सेवा द्यावी आपल्या मागण्या शासन स्तरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करु अशी विनंती जि प सदस्य शरद नवले यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केली त्यांची विनंती मान्य करुन सर्व पशु वैद्यकीय व्यवसायीकांनी आपली सेवा सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक दुग्ध व्यवसायीकांनी जि प सदस्य शरद नवले व पशु वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष सागर अभंग डाँक्टर संजय फरगडे नितीन शेलार यांना धन्यवाद दिले आहे.
Post a Comment