बेलापुर (प्रतिनिधी )-गावातील खटोड यांच्या घरी सापडलेले गुप्त धन शासकीय नियमानुसार पंचनामा करुन शासनाच्या ताब्यात दिलेले असतानाही काही लोक गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत असुन शासनाने योग्य ती दखल घेण्याची मागणी गावातील नागरीकांनी केली आहे ग्रामस्थ व मारवाडी समाजाच्या वतीने मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की हरिनारायण प्रेमसुख खटोड यांच्या घरी खोदकाम करताना एका घड्यात चांदीची पुरातन नाणी सापडली ती त्यांनी प्रामाणिकपणे लेखी अर्ज करुन श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या ताब्यात दिली असे असताना काही लोक गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करत आहे काही अति उत्साही लोक या प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत असुन यामुळे गावातील वातावरण खराब होवू शकते तरी या प्रकरणी आपण योग्य ती दखल घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर तहसीलदार श्रीरामपुर पोलीस निरीक्षक श्रीरामपुर जिल्हाध्यक्ष माहेश्वरी समाज यांना देण्यात आलेली आहे या निवेदनावर सर्वश्री रामेश्वर सोमाणी शरद सोमाणी प्रशांत लढ्ढा दिपक सिकची विशाल दरक गोपाल लढ्ढा प्रशांत बिहाणी सुभाष बिहाणी चैतन्य दायमा रविद्र खटोड दिलीप काळे अतुल राठी शैलेंद्र राठी सुरेशचंद्र राठी दिनेश लखोटीया संतोष ताथेड गोविंद सोमाणी प्रकाश राठी राजेंद्र सीकची संजय लढ्ढा पुरुषोत्तम मुंदडा राजेंद्र मुंदडा रामप्रसाद चांडक पवन चांडक किशोर चांडक हरिप्रसाद सिकची राजेंद्र सिकची चेतन सिकची चेतन दायमा जगन्नाथ राठी सुनिल लढ्ढा सुविजय सोमाणी सचिन बिहाणी आदिंच्या सह्या आहेत.
Post a Comment