बेलापुर (प्रतिनिधी )-दुपारी चार नंतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे मा .जिल्हाधिकारी यांचे आदेश असताना गावात पाच वाजले तरी दुकाने सुरुच होती पोलीसांनी कारवाई सुरु करताच अनेकांनी शटर बंद करुन पळ काढला कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने ठरवुन दिलेले नियम पाळणे बंधनकारक असताना बेलापूरात त्या नियमांचा फज्जा उडालेला पहावयास मिळाला पाच वाजले तरी सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसत होते दुकानेही उघडी होती तसेच सर्वत्र गर्दी दिसत होती ही बाब बेलापुर पोलीसांना समजताच हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक
रामेश्वर ढोकणे पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर पोपट भोईटे हरिष पानसंबळ यांनी गावात गस्त सुरु करताच अनेकांनी शटर बंद केली पोलीसांनी काही दुकानदारांना दंड केला अनेक लोक विनाकारण ठिकठिकाणी गप्पा मारत बसले होते पोलीसांना पहाताच अनेकांनी पळ काढला पोलीसांनी बेलापुर श्रीरामपुर चौकातील दुकानदारांना अनेक वेळा दंड करुनही ते दुकानदार दुकान उघडे ठेवत आहेत त्यामुळे पोलीसांनी आता मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे या बाबत कामगार तलाठी कैलास खाडे या सर्व दुकानदारांना सक्त ताकीद दिली असुन शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकान सुरु ठेवल्याचे आढळल्यास एक महीन्याकरीता दुकान सिल करण्याची तोंडी सूचना सर्वांना देण्यात आलेली असल्याचे कामगार तलाठी खाडे यांनी पत्रकारांना सांगितले.
Post a Comment