बेलापुर (प्रतिनिधी )- येथील खटोड यांच्या घरी सापडलेल्या गुप्त धनाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी मनसेच्या वतीने आज पासुन उपोषण सुरु करण्यात आले असुन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदेसह अनेक कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी या बाबत पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते म्हणाले की बेलापुर येथील खटोड यांच्या घरी खोदाकाम सुरु असताना एक हंडा सापडला त्यात खाली सोन्याची नाणी व वरती चांदी होती संबधीत मालकाने त्यातील सोने काढुन केवळ दिखाव्यासाठी चांदी शासनाच्या हवाली केली आहे जमिनीत सापडलेले गुप्तधन हे शासनाच्या मालकीचे असातानाही ते लपवुन केवळ चांदीच जमा करण्यात आली असुन तसे जबाबही खोदकाम करणाऱ्या मजुरांनी दिलेले आहेत त्यावरुन गुन्हा दाखल करुन जमिनीत सापडलेले गुप्तधन हे ताब्यात घेण्यात यावे तसेच संबधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी केली आहे मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे तुषार बोबडे सुरेश जगताप डाँक्टर संजय नवधर गणेश दिवसे सचिन पाळंदे उदय उदावंत राहुल दातीर विशाल शिरसाठ नंदु गंगावणे विष्णू अमोलीक प्रविण कार्ले गोरक्षनाथ येळे भास्कर सरोदे करण कापसे आदि कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत.
Post a Comment