बेलापुर (प्रतिनिधी )-येथील चौदा वर्ष वयाची एक अल्पवयीन मुलगी दुपारी दोन वाजेपासून घरातून निघुन गेली असुन शोधा शोध करुनही मुलगी न सापडल्यामुळे नातेवाईकांनी सायंकाळी बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे.या बाबत समजलेली हकीकत अशी की पढेगाव रोडवर असणाऱ्या पाहुणे नगर मधील एक अल्पवयीन मुलगी (वय वर्ष १४ ) दुपारी दोन वाजेदरम्यान आईला डबा घेवुन निघाली होती परंतु ती गावात पोहोचलीच नाही त्यामुळे तिची आई व नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली परंतु कुठेही आढळून आली नाही त्यामुळे त्यांनी बेलापुर पोलीस स्टेशनला धाव घेतली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके व त्यांच्या सहकाऱ्यांनी सी सी टिव्ही च्या अधारे शोध घेतला असता एका रस्त्याने ती मुलगी एकटीच जाताना दिसली या बाबत पोलीसांनी अधिक चौकशी करुन माहीती घेतली असता गावातील एक २१ वर्षाचा तरुणही घरातून पैसे घेवून निघुन गेल्याची माहीती मिळाली असुन या बाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
Post a Comment