बेलापुर (प्रतिनिधी )-सार्वजनिक शौचालयाकडे जाणारे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील अनेक महीलांनी बेलापुर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे . ग्रामपंचायत बेलापुर यांना दिलेल्या निवेदनात सौ भारती लांबोळे यांनी पुढे म्हटले आहे की सार्वजनिक शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाले असुन वांरवार मागणी करुन देखील या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आलेले नाही. सार्वजनिक शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संबधीतांनी अतिक्रमण करुन रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळोवेळी समजावुन सांगुन देखील संबधीत रस्ता बंद करण्याची धमकी देत आहेत.त्यामुळे महीलांची कुचंबना होत आहे . या ठिकाणी अनेक वेळा महीलांना अरेरावी करण्यात आलेली आहे .या बाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रारी करुन देखील त्याची गंभीरतेने दखल न घेतल्यामुळे संबधीताची मुजोरी वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने न काढल्यास सोमवार दिनांक २ आँगस्ट रोजी साकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे. या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी अहमदनगर ,जिल्हा पोलीस प्रमुख अहमदनगर, जिल्हा परिषद अहमदनगर ,उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर ,तहसीलदार श्रीरामपुर , पंचायत समीती श्रीरामपुर ,श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन, बेलापुर औट पोस्ट आदिंना पाठविण्यात आलेल्या आहेत. या निवेदनावर सौ भरती लांबोळे ,मंगल रोडे ,कल्पना तांबे, पुजा सातापुते ,सलमा शेख, वंदना मोरे ,सुनिता रणवरे, बिसमील्लाह सय्यद, रेशमा आतार, संगीता औटी, माधुरी बैताडे, अंजना साळवे ,नंदा बैताडे ,लक्ष्मीबाई पठारे, रेखा मोरे, सुनिता मोरे ,लहानबाई शेजुळ, सुनिता साटोटे, राणी जगताप ,लिलाबाई जगताप, हिराबाई मोरे, यमुनाबाई कुमावत ,सुशिला कुमावत आदिसह अनेक महिलांच्या सह्या आहेत.
Post a Comment