मागणी जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने रणजीत श्रीगोड यांनी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे .
या बाबत प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड यांनी महसुल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले असुन त्या निवेदनात पुढे म्हटले आहे की सन २०१६ पासून एस. टी. खात्याने एखादया प्रवाशाचा बसमधून प्रवास करताना मृत्यू झाल्यास
त्याचे वारसदाराला १० लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून आर्थिक सहाय्य व्हावी या करीता "अपघात सहाय्यता निधी "
योजना तयार करून ट्रस्टची स्थापना केली. प्रत्यक्षात मात्र या घटनेतील उद्देश पाहून जनतेची
दिशाभूल करण्यात आली आहे वारंवार तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल
यांचे अध्यक्षतेखाली ७ वरिष्ठ अधिका-यांची ट्रस्टीज म्हणून नियुक्त करण्यात आली होती .होणारे सर्व व्यवहार हे धर्मदाय आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे होणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्ष कारभार
धर्मदाय आयुक्त यांचे नियमानुसार होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. हा सर्व खर्च
प्रत्येक प्रवासाचे वेळी प्रवाशाकडून या कामासाठी १ रुपया विशेष निधी वसुल करण्यात येतो. हा
सर्व निधी ट्रस्टचे बँकेत जमा होत नाही असा आरोप या निवेदनात करण्यात आलेला आहे या बरोबरच इतरही ९ सुचनांचे निवेदन ना. थोरात यांना देण्यात आले आहे
सर्व परिस्थिती लक्षात घेता या ट्रस्टचा सर्व कारभार पारदर्शकपणाने होण्याची गरज आहे. अन्यथा
जनतेचा विश्वास उडेल.या बाबत वारंवार पत्रव्यवहार करुन सुध्दा दखल घेण्यात आली नाही.आमच्या तक्रारीला केराची
टोपली दाखविण्यात आली आहे . जिल्हा प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड यांनी आमदार डॉ. सुधीर
तांबे, आमदार लहू कानडे यांचे उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, माजी
कार्याध्यक्ष ब्रिजलालजी सारडा व अशोक सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रनाथ पा. थोरात
इ. पदाधिकारी यांनाही दिलेले आहे यापूर्वी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे,
उपमुख्यमंत्री ना. अजीतदादा पवार, परिवहन मंत्री ना. अनिल परब, प्रदेश भाजपा अध्यक्ष
आ. चंद्रकांत पाटील, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष
Post a Comment