बेलापुर (प्रतिनिधी )-बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गळनिंब येथे लसीकरण सुरू असताना अचानक गोंधळ उडाल्याने लसीकरण अर्ध्यावरच सोडून जाण्याची नामुष्की बेलापूर उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांवर आली. सविस्तर असे की,गळनिंब ता.श्रीरामपूर येथे गुरुवारी बेलापूर उपकेंद्रा अंतर्गत ४५ वर्षावरील नागरीकांसाठी दुसर्या डोसचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लसीकरणाची सुरवात ८ वाजेपासून आधार कार्ड जमा करुन नाव नोंदणी करण्यात आली सरपंच शिवाजी चिंधे हे त्या ठिकाणी थांबून होते ४५ वर्षापुढील दुसर्या डोससाठी आधार कार्ड जमा करून टोकन पध्दतीने लसीकरण सुरू करण्यात आले .६५ ते ७० पंचेचाळीस वर्षापुढील नागरीकांचा दुसरा डोस शिस्तबध्द पार पाडल्यानंतर ४५ वर्षाच्या आतील काही नागरीकांनी पहीला डोस मिळण्यासाठी अरेरावी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली त्यामुळे लसीकरण काही काळ बंद करावे लागले डाॅक्टर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दोन तास गोंधळातच बसुन रहावे लागले.वैद्यकीय अधिकारी डाँक्टर देविदास चोखर यांनी प्रथम दुसरा डोस झाल्यानंतर लस शिल्लक राहीली तर १८ वर्षापुढील नागरीकांना देण्यात येईल असे सांगुन देखील जबाबदार नागरीकांनीच गोंधळ घातला या गोंधळामुळे नागरीकांना सेवा देणार्या कर्मचाऱ्यांवर उपाशी पोटी काम करण्याची वेळ आली त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजी पसरली बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कडीत खूर्द कडीत बु!!मांडवे फत्याबाद कुरणपुर गळनिंब उक्कलगाव एकलहरे नरसाळी बेलापुर खूर्द बेलापुर बु!! ऐनतपुर या गावांचा समावेश येतो नागरीकांना विशेष करुन वयोवृध्द नागरिकांना येण्या जाण्याचा त्रास होवू नये म्हणून जि प सदस्य शरद नवले यांनी उपकेंद्रात जावून लसीकरण करण्याची सूचना केली होती त्यानुसार डाँक्टर देविदास चोखर यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावोगावी लसीकरण सुरु केले होते त्यात पहीली लस घेतलेल्या ४५ वर्षापुढील नागरीकांना प्राधान्याने दुसरी लस द्यावी अशा सूचना असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ४५ वर्षावरील नागरीकांना लसीकरण सुरु केले त्यातच काही १८ वर्षावरील तरुणांचीही नोदणी केलेली होती त्या वेळी लस शिल्लक राहीली तर १८ वर्षावरील नागरीकांना देवु असे सांगताच काहींनी गोंधळ सुरु केला हा गोंधळ तासभर चालू होता आरोग्य कर्मचारी देखील या गोंधळास वैतागले आलेली लस संपवुन त्यांनी गळनिंब मधुन काढता पाय घेतला गावातील काही जाणकार अडाणी नागरीकांमुळे अनेक गोरगरीब नागरीकांना लसीपासून वंचीत राहावे लागले.आता उपकेंद्रात होणाऱ्या गोंधळामुळे बेलापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातच लसीकरण करण्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानसिकता झालेली आहे.
Post a Comment