बेलापुर (प्रतिनिधी देविदास देसाई )- महसुल दिनानिमित्त महसुल विभागात चांगले कार्य करणाऱ्या अधीकाऱ्यांचा सन्मान करण्यात येत असुन जिल्ह्यात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली असुन १आँगस्ट महसुल दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महसुल दिनानिमित्त चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप असावी जेणेकरुन त्यांचा उत्साह वाढेल तसेच इतरांनाही प्रेरणा मिळेल या भावनेतुन महसुल विभागात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असुन या वर्षी उत्कृष्ट तहसीलदार म्हणून श्रीरामपुरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून पूनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांची निवड करण्यात आली आहे उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून श्रीगोंदा तहसील मधील श्रीमती योगीता ढोले व जिल्हा पुरवठा कार्यालयातील अभिजीत वांढेकर यांची निवड करण्यात आलेली आहे उत्कृष्ट मंडलाधिकारी म्हणून बेलापुर (श्रीरामपुर )मंडलाधिकारी बाबासाहेब गोसावी व पाथर्डी येथील विरेश्वर खेडकर तर उत्कृष्ट अव्वल कारकुन म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील एस व्ही ठोंबरे व राहुरी तहसील मधील श्रीमती ए एस राजवळ यांची निवड करण्यात आली आहे विशेष कोरोना योध्दा पुरस्कार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विरेंद्र बडधे आदर्श तलाठी प्रशांत हासे संगमनेर पोलीस पाटील गणेश जाधव संगमनेर आदेश साठे नेवासा राजेंद्र गीते जामखेड कोतवाल बी एम बोरडे पारनेर शरद गोंधणे शेवगाव आकाश कर्पे नगर उत्कृष्ट महसुल शिपाई हनुमान बोरगे उत्कृष्ट वाहन चालक महादेव डोंगरे उत्कृष्ट तलाठी बाळकृष्ण साबळे अकोले गुंजवटे सुजाता कर्जत कृष्णा आरसेवार राहाता महसुल सहाय्यक मंगेश ढुमणे आर एम शिरसाठ आदिची जिल्ह्यात उत्कृष्ट महसुलअधिकारी कर्मचारी म्हणून महसुल दिनानिमित्त निवड करण्यात आली आहे.
Post a Comment