बेलापुर (प्रतिनिधी )-गावातून एका अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेण्याच्या घटनेला आज दहा दिवस उलटून गेले असुन अजुनही त्या मुलीचा शोध न लागल्यामुळे पालकांचा जिव टांगणीला लागला आहे येथील मोल मजुरी करणाऱ्या कुटुंबातील एक अल्पवयीन मुलगी २३ जुलै रोजी दुपारी घरातुन निघुन गेली होती या बाबत मुलीच्या आईने मुलीला कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन पळवुन नेल्याची फिर्याद बेलापुर पोलीस स्टेशनला दिलेली आहे मुलीच्या आईच्या तक्रारी वरुन पोलीसांनी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा राजि . नंबर I ४९३/२०२१ भा द वि कायदा कलम ३६३प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ज्या दिवशी ही मुलगी घरातून गेली त्याच दिवशी गावातील एक तरुणही घरातून पैसे घेवुन गायब झालेला आहे पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे परंतु त्यांचा कोठेही ठावठिकाणा लागलेला नाही मुलीचे नातेवाईकही सर्वत्र मुलीचा शोध घेत आहे तसेच पोलीसही आरोपीच्या मागावर आहेत लवकरच मुलीला पालकाच्या ताब्यात देवू असा विश्वास पोलीसांना आहे या बाबत पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील हे पुढील तपास करत आहे.
Post a Comment