बेलापुर (प्रतिनिधी )- शासनाच्या खावटी योजनेंतर्गत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजुर यांच्या वतीने बेलापुर बु!!बेलापुर खुर्द वळदगाव उंबरगाव ऐनतपुर या गावातील लाभार्थ्यांना जि प सदस्य शरद नवले व प .स सदस्य अरुण पा नाईक यांच्या उपस्थितीत ९५ आदिवासी बांधवांना खावटी अनुदान वाटप करण्यात आले कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने आदिवासी बांधवाकरीता या वर्षी खावाटी अनुदान योजना सुरु केली आहे या योजनेंतर्गत प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या खात्यावर रोख दोन हजार रुपये तसेचएक किलो मटकी दोन किलो चवळी तिन कोलो हरबरा एक किलो वटाणा दोन किलो तूरदाळ एक किलो उडीद दाळ तीन किलो मिठ अर्धा किलो गरम मसाला एक लिटर शेंगदाणा तेल एक किलो मिरची अर्धा किलो चहा पावडर तीन किलो साखर असे अठरा किलो वस्तू व एक तेल पिशवी असे मोफत देण्यात आले तसेच लाभार्थ्याच्या खात्यावर रोख दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे या वेळी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे सदस्य मुस्ताक शेख रमेश अमोलीक शफीक बागवान भगवान मोरे जिना शेख दादासाहेब कुताळ मोहसीन सय्यद बाबुराव पवार दत्तू निकम सोपान निकम अनवर बागवान आदिवासी प्रकल्प विभाग राजुर येथील सुरेश कुराकुटे सुनिल गायकवाड अनिल मेढे वाल्मिक जाधव प्रशांत आचारी उपस्थित होते.
Post a Comment