श्रीरामपुर (प्रतिनिधी )- कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शासनाने व्यापाऱ्यांना वेळेची मर्यादा घालून दिली असुन व्यापारी वेळेचे बंधन पाळतात परंतु अवैध व्यवसाय खूलेआम दिवसभर सुरु असतात त्यांना पायबंद कोण घालणार ? असा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे.शासनाने घालून दिलेले नियम सर्व सामान्य जनता तंतोतंत पाळत आहेत परंतु अवैध व्यवसाय खूलेआम सुरु आहेत तालुक्यात मटका अन गुटखा खुलेआम सुरु आहे आकडा येण्याच्या वेळेस ठराविक ठिकाणी नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते ज्यांच्या आशिर्वादाने अवैध व्यवसाय सुरु आहेत त्यांना ही गर्दी दिसत नाही का? असा सवाल विचारला जात आहे आता मटका खेळण्यासाठी व खेळविण्यासाठी मोबाईलचा वापर केला जात आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी अवैध व्यवसाय आढळल्यास संबधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल असे सांगितले होते तरीही कुठेही अवैध व्यवसायात कमी आलेली नाही सर्व सामान्य नागरीकासाठी लाँकडाऊन असला तरी अवैध धंद्यावाल्यांना ती पर्वणीच ठरली आहे मंध्यतंरी गुन्हा अन्वेषन शाखेने गावठी हातभट्टी चालकावर कारवाई केली परंतु आजही मोठ्या प्रमाणात बनावट दारु तयार करुन ठराविक परमीट चालकांना विकली जाते गुटख्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई झाली नागरीकांना हायसे वाटले गुटखा विक्री बंद होईल असे वाटत असतानाच दाम दुपटीने गुटख्याची विक्री खूलेआम ठिकठिकाणी होत आहे आजही मोठ्या प्रमाणात बाहेरहून गुटख्याची आवक सुरुच आहे अनेक वाळू तस्कराकडे खेळण्यातल्या पिस्तूलाप्रमाणे गावठी कट्टे आहेत इतरांना धमकावण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे वाळू तस्करी प्रतिष्ठेची होत आहे अनेक व्हाईट काँलर राजकारणी वाळूच्या धद्यांत सहभागी होत आहे वाळू तस्करी सुरु राहण्याकरीता आपले राजकीय वजन वापरले जात आहे तर काही वाळू तस्कर पोलीस ,महसुल कर्मचाऱ्यांवर दबाव आणून वाळू तस्करी करत आहे अधिकारीही लालच व धमक्यांना बळी पडत आहेत बोगस पावत्यांच्या आधारे शासनाची फसवणूक होत आहे अनेक ठिकाणी पत्याचे क्लब जुगार अड्डे चालू आहेत मात्र सर्व सामान्यावर कारवाई केली जाते त्यामुळे अवैध व्यवसाय खूलेआम व व्यापाऱ्यांना बंधने हे सर्व सामान्यांच्या समजण्या पलीकडचे आहे मा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी या बाबीकडे लक्ष द्यावे या प्रकरणात बेजबाबदारपणे वागनारे अधिकाऱ्यांची व कर्मचार्यांची तडकाफडकी बदली करावी अशी नागरीक ,व्यापारी ,फेरीवाले ,शेतकरी आदिंची मागणी आहे.
Post a Comment