श्रीरामपूर शहर पोलिसांन कडे दिनांक 23 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी पोलिसांच्या मारहाणीत एका युवकाचा हात फॅक्चर होऊन मोठी दुखापत झालेली आहे.या घटनेची सीसीटीव्ही फुटेज हे माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागितली होती. मात्र सदर अर्जाची माहिती मुदतीमध्ये देण्यात आली नाही त्यामुळे अपील दाखल करावी लागली. प्रथम अपीलीय अधिकारी याच्याकडे अपील करण्यात आले यावेळी दोन्ही बाजूने माहिती घेत अपीलार्थी यांच्या बाजुने निकाल दिला व सदर प्रकरणी सुनावणी करुन दि. 05.07.2021 रोजी आदेश जरी करण्यात आला. तात्काळ माहिती ही विनामूल्य देण्याचे आदेश जारी केले. मात्र श्रीरामपूर शहर पोलिस निरीक्षक यांनी आदेशाला केराची टोपली दाखवत आज १७ दिवस उलटले तरी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. साहेबांना भेटा,साहेबांची सही आजून झलेली नाही. सदर माहिती अधिकारी हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून माहिती लपवण्याचा जाणून बुजून प्रयत्न करत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा ही अपेक्षा घेऊन.मी लवकरच श्रीरामपूर पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या विरोधात अहमदनगर जिल्हा पोलीस कार्यालय या ठिकाणी लवकरच उपोषण करणार आसल्याची माहिती असलम बिनसाद यांनी दिली आहे.
Post a Comment