June 2021

(प्रतिनिधी) :राहुरी येथील  पत्रकार  श्री रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला Cr.no.286/2021 भादवि कलम 363,341 वाढिव कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास  Dy.S.P. संदीप मिटके  श्रीरामपुर यांचेकडे वर्ग होताच त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे यास नेवासा फाटा येथून तर दुसरा आरोपी अक्षय कुलथे यास  उत्तरप्रदेश येथून शिताफीने अटक केली आहे.सदर गुन्ह्याचा तपास  सुरू असताना व्यापारी अनिल गावडे  याने आरोपी कान्हु  मोरे  यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. सदर प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा  होती. परंतु राहुरी पोलिसांनी व्यापारी अनिल गावडे यास सहआरोपी केले व भादवि कलम 212 प्रमाणे कलम वाढवून   न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर केला आहे 

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मा .जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बेलापुरात केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे पोलीसांनी धडक कारवाई करत अनेक दुकानदारांकडून दंड वसुल केला असुन चार नंतर दुकाने सुरु असल्यास कारवाई करण्याचा ईशारा बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके  यांनी दिला आहे           मा .जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून सर्व व्यवहारांना दुपारी चार वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे  असे असताना बेलापूरात चार वाजेनंतरही अनेक दुकाने सुरुच होती बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे रामेश्वर ढोकणे पोपट भोईटे निखील तमनर हरिष पानसंबळ गावात फेरी मारुन दुपारी चार नंतर जी दुकाने सुरु होती अशा जवळपास वीस दुकानदारांना दंड ठोठावला आहे कोरोना नियमाचा भंग करणारावर यापुढेही अशीच दंडात्मक कारवाई सुरुच राहणार असुन नागरीकांनी कोरोनाचे नियम पाळावे असे अवाहन हवालदार लोटके यांनी केले आहे

राहुरी - दि.२९ जून रोजी राहुरी कृषी मंडळात केंदळ बुद्रुक, पिंप्री वळण व देसवंडी या गावांमध्ये मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत कापूस व सोयाबीन पिकांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. यावेळी तज्ञ पर्यवेक्षक तुळशीराम पवार यांनी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी शरद लांबे व भिमराज गडधे यांनी कापूस लागवड तंत्रज्ञान याबाबत चर्चेद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. चंद्रकांत म्हसे यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली.यावेळी केंदळ बु.येथे सहाय्यक कृषी अधिकारी सोमनाथ बाचकर, शेतकरी प्रमोद तारडे,नामदेव तारडे, प्रल्हाद तारडे, भिमराज चव्हाण, बापूसाहेब मांगुर्डे,सदाशिव तारडे, बापूसाहेब तारडे, विठ्ठल भोसले, गोविंद जाधव व रामेश्वर कैतके उपस्थित होते.पिंप्री वळण येथे सहाय्यक  कृषी अधिकारी मंगेश बनकर, बिरू केसकर, आकाश गोरे, शेतकरी शत्रुघ्न आढाव, भाऊसाहेब पुंड,राजेंद्र गरूड, यशपाल पवार, बजरंग कानडे, मेघवर्मा जाधव, आबासाहेब लहारे,अशोक जरे,धनराज जाधव, बाबासाहेब डमाळे व आरिफ शेख उपस्थित होते.देसवंडी येथे तालुका कृषी अधिकारी श्रीमती विमल शेंडगे, महिला शेतकरी वैशाली शिरसाठ,शकुंतला शिरसाठ, अनुराधा शिरसाठ, उषा शिरसाठ आदी उपस्थित होत्या.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- राहुरी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या हद्दीबाहेर असलेल्या बेलापुर गावातील वाळूच्या गाड्या पकडून त्यांचेवर कारवाई करण्याऐवजी आर्थिक तडजोड करुन त्या सोडून दिल्या असुन अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा टँक्सी असोसिएशनचे अध्यक्ष  व बेलापुर पत्रकार संघाचे खजिनदार सुनिल मुथा यांनी जिल्हा पोलीस प्रमुखाकडे केली आहे                    जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात सुनिल मुथा यांनी पुढे म्हटले आहे की राहुरी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे हे दिनांक १९ जुन ते २० जुन च्या रात्री दोन वाजता बेलापुर येथे आले व त्यांनी पढेगाव रोडवरुन वाळू वहातूक करणारी वाहने पकडून बेलापुर चौकातुन नेली या वाहनधारकाकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वसुली करण्यात आली असुन हे सर्व सी सी टी व्ही कँमेर्यात कैद झाले आहे त्यांची हद्द नसतानाही ते श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर येथे आपल्या चार सहकार्यासमवेत आले त्यांनी वाळूच्या गाड्याही पकडल्या परंतु नंतर आर्थिक तडजोडी करुन त्या गाड्या सोडून देण्यात आलेल्या आहेत यात फार मोठ्या प्रमाणात देवाण घेवाण झालेली आहे ज्या गाडीने पी एस आय शिंदे आले होते ती गाडी शिंदे यांच्या मुलाच्या नावावर आहे पी एस आय शिंदे यांनी केलेले कृत्य हे पोलीस खात्याला काळीमा फासणारे आहे आपल्या सारख्या कर्तबगार आधिकार्याच्या कार्यक्षेत्रात आशा प्रकारे कृत्य करत असेल तर न्याय कुणाकडे मागावा ही लुट म्हणजे  कायद्याचे ज्ञान असणारांनी टाकलेला दरोडाच नव्हे काय  ? त्यामुळे अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही मुथा यांनी केली आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- भाजपाच्या वतीने श्रीरामपुरात करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात श्रेयवादावरुन चाललेली धुसफुस अखेर चव्हाट्यावर आली असुन कार्येकर्त्या समोरच पदाधिकार्यांनी एकमेकावर तोंड सुख घेतल्याने कार्येकर्त्यांनी याचा काय आदर्श घ्यावयाचा हाच प्रश्न निर्माण झाला आहे                                       महाअघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यांआंदोलना नंतर तहसीलदार श्रीरामपुर यांना निवेदन द्यावयाचे ठरले होते परंतु तहसीलदार कार्यालयात नाहीत असे  भाजपाच्या एका जबाबदार पदाधिकार्याने सांगितले त्यामुळे बेलापुररातील सुनिल मुथासह काही कार्येकर्ते निघुन गेले त्या नंतर त्याच पदाधिकार्यांने तहसीलदार साहेब कार्यालयात आले असुन आपल्याला निवेदन देण्यास जायचे आहे असे सांगताच बेलापुर येथील भाजपाचे पदाधिकारी प्रफुल्ल डावरे यांनी याचा जाब विचारला सुनिल मुथा सह काही कार्येकर्ते निघुन गेल्यावरच निवेदन देण्याचे का ठरविले असा जाब विचारताच भाजपाच्या जबाबदार पदाधिकार्याने जाब विचारणारे भाजपाचे पदाधिकारी डावरे यांना सर्वासमोर शिवी दिली त्यामुळे डावरे यांनी देखील मागेपुढे न पहाता त्याच भाषेत साडेतोड उत्तर दिले सर्व कार्येकर्त्यासमोरच पदाधिकार्यात एकमेकांना शिव्याची लाखोली वाहीली जात होती आंदोलन राहीले बाजुला परंतु श्रेय वादावरुनच भाजपा पदाधिकारी आपापसात भिडले एकमेकांना मनसोक्त अरेरावी शिवीगाळ झाल्यानंतर सुनिल मुथाही पुन्हा त्या ठिकाणी आले बेलापूरातील भाजपाचे कार्येकर्ते व मुथा समर्थक तातडीने जमा झाले परंतु  तो पर्यंत श्रीरामपुरातील ते पदाधिकारी निघुन गेले होते नाही तर मुद्द्याची श्रेयवादाची लढाई गुद्द्यापर्यत पोहोचली असती आता हा श्रेय वादाचा चेंडू जिल्हाध्यक्ष याच्या कोर्टात पोहोचला आहे.

मुंबई-राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक दि चैन’ अंतर्गत ४ जून २०२१ पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ, खासगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळांसंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.जमावबंदी कशी असेल?nजमावबंदीच्या आदेशानुसार आपत्ती म्हणून कोविड-१९ जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल. बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही. nखुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही. कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही. एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त कार्यक्रम असतील तर कार्यक्रमांमध्ये पुरेसा कालावधी असावा.nसंमेलन अथवा मेळावे होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेले एसओपीचे काटेकोरपणे पालन करावे आणि असे होत नसल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. वारंवार मार्गदर्शक एसओपींचे उल्लंघन होत असेल तर त्या आस्थापनेला पूर्णपणे बंद केले जाईल आणि कोविड आपत्ती असेपर्यंत या आस्थापनांना उघडण्याची मुभा मिळणार नाही. जर एखाद्या ठिकाणी खाण्यापिण्यासह संमेलन असेल अशा ठिकाणी उपाहारगृहांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची  अंमलबजावणी केली जाईल.

 धार्मिक स्थळे - स्तर तीन, चार आणि पाचमध्ये सर्व धार्मिक स्थळे अभ्यागतांसाठी बंद असतील.

1)जमावाचे सर्व नियम पाळून स्तर एकमधील अभ्यागतांना धार्मिक स्थळे खुले असतील.

2)स्तर तीन, चार आणि पाचमध्ये बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धार्मिक स्थळे बंद असतील. जेथे लग्नकार्य आणि अंतिम संस्कार केले जात असतील, अशा धार्मिक स्थळी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. 

3)कोणत्याही धार्मिक कार्य किंवा पवित्र दिवसाच्या निमित्ताने काही विशेष कार्य असल्यास त्या धार्मिक स्थळाला सर्व नियमांचे पालन करून ते पार पाडावे लागतील.खासगी प्रशिक्षण वर्ग, कौशल्य केंद्रे शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खासगी प्रशिक्षण वर्ग अर्थात कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असेल. अपवाद : कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी, वैद्य कौशल्याचे प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणारे कौशल्य केंद्रे हे अपवाद असतील. अशा प्रकारच्या वर्गांवर कोणतेही निर्बंध नसतील. क्षमतेच्या अटीवर हॉटेलमधील उपहारगृहे हे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी चालू राहतील. सुविधांचा उपयोग निर्बंधांना अनुसरूनच करावा.

पाहुण्यांसाठी हॉटेल उघडी-पाहुण्यांना प्रवेशासाठी सर्व स्तरांच्या हॉटेलांना उघडे ठेवण्याची परवानगी असेल. तरीही वेगवेगळ्या स्तरातून येणाऱ्या पाहुण्यांच्या निर्बंधांबद्दल अंकुश ठेवण्याची जबाबदारी आस्थापनेवर असेल.   पर्यटन स्थळे प्रशासन कोणत्याही प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करू शकतात. यासाठी पॉझिटिव्हिटी रेट किंवा भरलेले ऑक्सिजन बेड हे निकष नसतील. या पर्यटन स्थळांच्या परिसरातील सर्व हॉटेलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. जर हे पर्यटनस्थळ स्तर पाचमध्ये असेल तर ई-पासशिवाय कोणत्याही अभ्यागतांना तेथे येण्याची परवानगी नसेल. पाहुणे स्तर पाचमधील असतील तर त्यांना एक आठवड्यासाठी विलगीकरणात राहावे लागेल. 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-श्रीरामपूर शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका महिलेच्या  गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे गंठण चोरण्याचा प्रकार थत्ते ग्राऊंड परिसरातील उत्सव मंगल कार्यालयातील अपार्टमेंटसमोर घडला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत साई उत्सव अपार्टमेंट, उत्सव मंगल कार्यालयाजवळ, वॉर्ड नं.7 श्रीरामपूर  येथे राहणार्‍या अश्विनी वैभव गोडसे (वय 38) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 जून 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मी साई उत्सव अपार्टमेंटच्या पार्किंगसमोर उभा असताना एक अज्ञात इसम तेथे आला आणि त्याने पत्ता विचारला. पत्ता विचारण्याचा बहाणा करून माझ्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने धक्का देवून ओढून घेतले आणि गेटबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या साथीदाराच्या मोटारसायकलवर बसून आरोपी पसार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अश्विनी गोडसे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांत कलम गु.र.नं. 419/ 2021 प्रमाणे भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सानप यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. समाधान सुरवडे करीत आहेत.


श्रीरामपूर (प्रतिनिधी ) येथील पत्रकार प्रकाश बापुराव कुलथे यांची शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळावर निवड व्हावी अशी विनंती स्वरूप मागणी श्रीरामपूर साहित्यिकांतर्फे करण्यात आली आहे. 

   आंतरराष्ट्रीय किर्ती असलेल्या शिर्डीचे साईबाबा संस्थान हे जगात श्रद्धाभावाचे तीर्थस्थान आहे.श्रद्धा आणि सबुरी ही  जीवनमूल्ये जपणारे, चरित्र आणि चारित्र्य,अभ्यास आणि भक्तीध्यास, संस्कृती आणि सदवृत्ती,शुद्धविचारांची पत्रकारिता, सामाजिक सेवाभाव,साहित्य आणि  परंपरा अशा गुणवत्तेने वाटचाल करणारे पत्रकार प्रकाश कुलथे जिल्ह्यातील साहित्यिकांचे आवडते व्यक्तिमत्व आहेत. श्रीरामपूर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष,महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, राज्य  अधिस्वीकृती समितीचे सदस्य,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त उपाध्यक्ष, श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णंकार संस्था श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक  उपाध्यक्ष,वाचन संस्कृती प्रतिष्ठान, श्रीरामपूर संस्थेचे उपाध्यक्ष, साहित्य प्रबोधन मंच, श्रीरामपूरचे माजी अध्यक्ष, टाकळीभान येथील साहित्य परिवाराचे संस्थापक सदस्य, वर्ल्ड सामनाचे मुख्य संपादक, दिवाळी अंकाचे मुख्य संपादक अशा विविध संस्था आणि सेवाकार्यात सदैव सहभागी असलेले पत्रकार प्रकाश कुलथे हे श्रीसाईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा आदर्श जपत कार्य करतील असा आम्हा साहित्यिकांना विश्वास आहे, तरी त्यांची साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी निवड व्हावी अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष कामगार नेते अविनाश आपटे, माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्रा डॉ बाबुराव उपाध्ये, नामदेवराव देसाई, सुखदेव सुकळे, डॉ.  शिवाजी काळे,कवी  पोपटराव पटारे, डॉ रामकृष्ण जगताप,कवयित्री  संगीता फासाटे कटारे, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, पत्रकार शौकतभाई शेख,आदी साहित्यिक, पदाधिकारी यांनी केली आहे.

श्रीरामपूर (शौकतभाई शेख)-  येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक सौ.अर्चना फटांगरे (घनवट) यांना मोटार वाहन निरीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल, शासनमान्य कॉमन सर्व्हिस सेंटर - समता (आरटीओ) अॉनलाईन सेवा केंद्राचे संचालक सरताज शेख यांच्या हस्ते, सर्व धर्मिय सेवाभावी संस्था असलेल्या समता फाऊंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आरटीओ प्रतिनिधी फईम शेख,अफजल मेमन, प्रदिप नरवडे, इम्रान शेख, मतीन शेख, राजेंद्र ओमने,उमेश बागीले आदी उपस्थित होते.

आरटीओ अधिकारी अर्चना फटांगरे (घनवट) यांनी २०१५ ते १९ या आपल्या पहिल्या पोस्टींगमध्ये अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर सन २०१९ साली त्यांची बदली श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली,या ठिकाणी त्यांनी सलग दोन वर्ष आपली उत्कृष्ट कारकिर्द गाजवली, आरटीओ अधिकारी कसे असवेत हे त्यांनी आपल्या सेवा कारकिर्दीतून दाखवून दिले, हेडक्वाटर्स असो की फ्लाईंग, ज्या, ज्या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्येक्षेत्रात सेवा बजावली त्या, त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तबगारीची छाप सोडली,कोणी कितीही मोठा असो, पुढारी असो की अन्य कोणी असो, योग्य कागदपत्र असल्याखेरीज ते कामे करत नाही,शासनाने ठरवून दिलेली जबाबदारी तथा वरिष्ठांच्या आदेशाला आपली भक्ती समजून त्यांनी आजवर आपली सेवा बजावली, श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे कार्येक्षेत्र तसे खुप मोठे आहे, अकोले, संगमनेर, कोपरगांव, राहाता, राहुरी, श्रीरामपूर,नेवासा असे तब्बत सात तालुक्याचा कारभार या कार्यालयांतर्गत येतो,सहजिकच सात तालुक्यातील नागरीक आपल्या कामानिमित्त या कार्यालयात येतात,या कार्यालयात आपल्या कामानिमित्त आलेल्या नागरीकांची नेहमीच मोठी वर्दळ असते,वाहन चालविण्याचे कच्चे, पक्के लायसन्स सोबत वाहन पासिंग आणि इतर आरटीओतील कामे हाताळताना त्यांनी मोठ्या संयमाने आपली सेवा बजावली, सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्येंत सातत्याने विना ब्रेक कामे करणारी महिला आरटीओ अधिकारी म्हणून सौ.फटांगरे मॅडम यांनी वेगळीच ख्याती प्राप्त केलेली आहे, शासनाने त्यांच्या या उत्कृष्ट कर्तबगारीची दखल घेऊन  मोटार वाहन निरीक्षकपदी त्यांना पदोन्नती दिल्याने तथा बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात पोस्टिंग मिळाल्याने खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या उज्वल कार्याची पावतीच मिळाली आहे, अहमदनगर व श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाप्रमाणेच त्या बुलढाणा आरटीओत देखील आपल्या उत्कृष्ट कार्याची छाप सोडतील यात शंका नाही,

त्यांच्या पदोन्नती निमित्त येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे साहेब,समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख,समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक इंजि.मोहसिन शेख, समता आरटीओ अॉनलाईन सर्व्हिसेसचे संचालक सरताज शेख, मयुर मोटार ड्रायव्हिंगचे प्रतापराव शिंदे,मनोज बोहत, बाळासाहेब झेंडे यांच्यासमवेत श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील आरटीओ अधिकारी, कर्मचारी, आरटीओ प्रतिनिधी यांनी त्यांच्या पुढील भावी उज्वल कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत.

राहुरी तालूक्यातील खडांबे येथील साळवे कुटूंबावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार करण्यात आला. त्या साळवे कुटूंबाला न्याय न मिळाल्यास तसेच आरोपीला पाठीशी घालणारे राहुरी येथील पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांचे निलंबन झाले नाहीतर येत्या अधिवशनात काळे झेंडे दाखवण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी आज दिनांक २५ जून रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी दिला. 

      राहुरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. न्याय व्यवस्था दलित व अदिवासी समाजाला न्याय देण्यात कमी पडत आहे. तालूक्यातील खडांबे येथे अत्याचार करणाऱ्या आरोपींना पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. येत्या आठ दिवसांत पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निलंबित केले नाहीतर अहमदनगर येथील पोलिस मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा तालूकाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला. या प्रसंगी डाॅ. जालिंदर घिगे यांनी सांगितले कि, कायद्याचे पालन करणारेच कायदा मानत नसेल तर अंदोलन करणे गरजेचे आहे. गुन्हेगारांना पाठिशा घालणाऱ्या अधिकाऱ्यास तातडीने निलंबित करावे. तालुक्यातील खंडाबे व कुरणवाडी येथील दोन्ही घटना अत्यंत गंभिर आहेत. छत्रपतीच्या राज्यात शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद केला नाही. ते अन्यायाच्या विरोधात लढत राहिले. आम्ही त्यांच्याच मार्गावर चालत आहोत. 

        यावेळी बोलताना ॲड. भाऊसाहेब पवार म्हणाले कि, राहुरी पंचायत समितिचा सदस्य बाळासाहेब लटके यासह त्याच्या कुटूंबियाने साळवे कुटूंबियांना मारहाण करुन जातिवाचक शिविगाळ केली होती. मात्र राहुरीचे पोलिस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी साळवे कुटूंबाची खरी तक्रार न घेता चुकीची फिर्याद घेतली. त्याचवेळी ॲट्रोसिटी का दाखल केली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेऊन मोर्चा काढण्याचे निवेदन दिले. तेव्हा तब्बल पंधरा दिवसाने राहुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल. निवेदन देताच का लगेच आरोपींना अटक केली? याचा अर्थ काय? की पोलिस या आरोपींना पाठिशी घालत होते?

        यावेळी बौध्द महासभेचे गौतम पगारे, बाबुराव मकासरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून राहुरी पोलिस ठाण्याच्या कारभारा बाबत नाराजगी व्यक्त केली. या अंदोलनात पिंटूनाना साळवे, सलिम शेख, बाळासाहेब बर्डे, ईश्वर खिलारी, सुनिल ब्राम्हणे, रविंद्र गायकवाड, गोरख थोरात, खडांबे येथिल पिडीत कुटूंबातील महिला, मुलगा व मुलगी यासह अनेक कार्यकर्ते अंदोलनात सामिल झाले होते.

         यावेळी निवेदन स्विकरतांना पोलिस उपधिक्षक राहुल मदने यांनी अंदोलनकांना सांगितले की, तुम्हाला पुन्हा अंदोलन करण्याची गरज पडणार नाही. यावेळी अंदोलकांनी प्रश्न केला की पोलिस निरिक्षक दुधाळ यांना निलंबित कधी करणार? तेव्हा संबधित घटने बाबत चौकशी करून जिल्हा पोलिस अधिक्षकाकडे सर्व अहवाल पाठवण्यात येईल व न्याय दिला जाईल. असे मदने यांनी सांगितले.

दिनांक २५ रोजी मौजे टाकळीमियाँ येथे कृषि संजीवनी सप्ताह अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला. या प्रशिक्षण वर्गास मंडळ.कृषि अधिकारी राहुरी प्रशांत डहाळे, कृषि पर्यवेक्षक तुळशिराम पवार, कृषि सहायक शिवप्रसाद कोहकडे ,कृषि भिमराज गडधे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते .

या प्रशिक्षण वर्गात भिमराज गडधे यांनी कापुस लागवड व एकात्मिक खत व्यवस्थापन तसेच किड व रोग नियंत्रण या बाबत मार्गदर्शन केले .कृषि पर्यवेक्षक तुळशिराम पवार यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्क तयार करणे व त्याचा वापर कसा करावा या बाबत मार्गदर्शन केले. कृषि सहायक शिवप्रसाद कोहकडे यांनी सोयाबीन पिकावर येणारी किड व रोग यांची ओळख व नियंत्रण करण्यासाठी उपाय योजनांची माहीती दिली तसेच या वेळी निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्याक्षीक दाखविण्यात आले ,

या वेळी साहेबराव निमसे, संजय तोडमल, बाबासाहेब करपे, साहेबराव गायकवाड, दत्तात्रय नलावडे, बाबासाहेब ढोबळे, अजित करपे, दादासाहेब जाधव, गणेश तोडमल, गणेश निमसे, अक्षय करपे, अक्षय घोडके, सोमनाध सगळगिळे,  ऋषिकेश घोडके उपस्थित होते.



राहुरी-(प्रतिनिधी मिनाष पटेकर)-दिनांक २४ जून रोजी मौजे वळण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत बोलताना तज्ञ कृषी पर्यवेक्षक श्री शिवाजी कोरडे म्हणाले की कापूस लागवड करताना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी शेतकऱ्यांना शेतीशाळा, शेतीचे नियोजन व खर्चात बचत याबाबत खेळाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे यांनी खताची बचत, सोयाबीन पिक व्यवस्थापन व शासनाच्या विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर, सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गडधे,मंगेश बनकर, आकाश गोरे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे,सदस्य अशोकराव खुळे,अशोकराव कुलट,माजी सरपंच बाबासाहेब खुळे,दत्तात्रय खुळे,ज्ञानेश्वर खुळे, युनुस शेख,सारंगधर खुळे,अर्जुन आढाव,बाळासाहेब खुळे, बाबासाहेब मकासरे, अशोक काळे, षकीरचंद फुणगे,गोविंद फुणगे उपस्थित होते. हरिभाऊ डमाळे यांनी आभार प्रदर्शन केले. किसान कृषी सेवा केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.


राहुरी-(प्रतिनिधी मिनाष पटेकर)-दिनांक २३ जून रोजी मौजे मानोरी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे ,कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर ,तुळशीराम पवार ,कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे,भिमराज गडदे ,श्रीमती दुर्गा सहाने उपस्थित होते .सदर कार्यक्रमात श्री तुळशीराम पवार कृषी पर्यवेक्षक यांनी एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच भिमराज गडधे यांनी कापूस पीक लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले .तसेच चंद्रकांत म्हसे कृषी विभागाच्या विविध योजना व मका पिकावर अमेरिकन लष्करी आळी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास बापूसाहेब चोथे, शिवाजी पोटे, गणेश चोथे ,दत्तात्रय आढाव ,सचिन साबळे, नानासाहेब आढाव ,बन्सी शेख, पंढरीनाथ चौथे ,अशोक वाघ, बापूसाहेब वाघ,अभिषेक आढाव, नितीन चोथे ,विकास वाघ, बाळासाहेब राठोड ,दत्तात्रय आढाव ,सचिन साबळे ,शिवाजी पोटे व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.


श्रीरामपूर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने डाॅ,  शामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले 

यावेळी बोलताना भाजपा शहरअध्यक्ष मारूतीभाऊ बिंगले म्हणाले एक देशमे   दो निशान दो प्रधान दो संविधान नही चलेगे.असा त्यांचा मुल मंत्र होता. 

तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश  राठी यांनी सांगितले की 1951 साली भारतीय जनसंघाची स्थापना केली आज काश्मिर जो आपल्या भारतात आहे याचे सर्व श्रेय डाॅ, शामा प्रसाद मुखर्जी यांना जाते, घटनेच्या 370 या कलमास त्यांचा सक्त विरोध होता आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांच्या कालखंडात कलम 370 रद्द करण्यात आला आहे..

यावेळी मिलींदकुमार साळवे यांनी डाॅ,  शामा प्रसाद मुखर्जी यांच्या विषयी माहिती विशद केली. 

यावेळी शहरअध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले जिल्हा उपाध्यक्ष गणेश  राठी, सतिश सौदागर, जिल्हा अध्यक्ष सांस्कृतिक सेल बंडुकूमार शिंदे, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव उपाध्यक्ष रूपेश हरकल सचिव अक्षय नगारे, राहुल आठवल,अक्षय वर्पे, राजेंद्र कांबळे, अजित बाबेल, मिलींदकुमार साळवे, रवी पंडित, गणेश अभंग, डाॅ ललित सावज, बाळु आहिरे, विजय आखाडे, विशाल अंभोरे, संदिप रणनवरे,दत्तु देवकाते, पंकज करमासे, ललित गाडेकर, विशाल साबळे ,रोहित मिसाळ,गणेश कुर्हे, गजानन आढाव, व भारतीय जनता पार्टी च कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते.


.

बेलापूर (प्रतिनिधी  )-: जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी याची पुण्यतिथी बेलापूरात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली  . याप्रसंगी श्यामाप्रसाद मुखर्जी च्या प्रतिमेला गावातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.शरद देशपांडे व श्री.रमेश कुलथे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण केला व अभिवादन करण्यात आले. दिवंगत श्यामाप्रसाद यांनी त्यांच्या कार्यकाळात कायम काश्मीरच्या विषेश राज्याच्या संकल्पनेला व कलम ३७० ला वेळोवेळी विरोध केला याच आंदोलनात अटक झालेली असताना तुरुंगातच त्यांना वीरमरण आले ,असे शेवटपर्यंत कलम ३७० ला विरोध करणार्या या व्यक्तीमत्वाने कॉंग्रेस विरूध्द संपूर्ण विरोधी पक्षाला एकत्र आणण्याची जबाबदारी उचलून "जनसंघा"ची स्थापना करून जनसंघाचे सरकार प्रस्थापित केले. अशा धुरंधर नेत्याला म्हणावी तशी प्रसिद्धी त्या काळी मिळाली नाही. कारण श्यामाप्रसादजी हे प्रसिद्धी पासून फार दूर राहीले .मोदी सरकारने मात्र ३७० कलम रद्द करुन खर्या अर्थाने श्यामाप्रसाद मुखर्जीच्या विचारांचा मानसन्मान वृद्धिंगत केला.बेलापूर मधील या कार्यक्रमास भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पुरूषोत्तम भराटे, राकेश कुंभकर्ण, सागर ढवळे,राजेंद्र राशीनकर,किशोर खरोटे,गजानन डावरे,विशाल मेहेत्रे, भुषण चंगेडे,राजेंद्र गाडेकर,प्रशांत ढवळे,सागर हुडे,योगेश सोनवणे, दादा कुताळ,सुभाष मोहिते आदि उपस्थित होते

.

श्रीरामपुर (वीशेष प्रतिनिधी  )-राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहीतीच्या अधारे छापा टाकून बनावट दारु बनविणार्या रँकेटचा पर्दाफाश केला असुन यात साडे सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन  दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त खबर मिळाली की  श्रीरामपुर येथील संजयनगर ईदगाह मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात

बनावट देशी विदेशी दारु तयार केली जात असल्याची माहीती मिळाली राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप संचालक  अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य श्रीमती उषा वर्मा विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे गणेश पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक एस बी शेंडे एस एम सराफ उपआधिक्षक अ विभाग ऐ बी बनकर निरीक्षक ब विभाग एस के कोल्हे निरीक्षक कोपरगाव बी बी हुलगे निरीक्षक श्रीरामपुर  ऐ व्ही पाटील निरीक्षक  पी व्ही अहीरराव एम डी कोडे व्ही एम बारवकर एम एस धोका एस बी भगत जगताप के यु छत्रे कुमारी घोडे नम्रता वाघ आदिंनी आपल्या सहकार्या समवेत ईदगाह मैदान संजयनगर येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारु तयार केली जात असल्याचे आढळून आले या ठिकाणी बनावट दारु तयार करण्याकरीता लागणारे स्पिरीट २०० लिटर  बनावट दारु तयार करण्यासाठी लागणारे ३०लिटर विदेशी मद्य १८०मिली क्षमतेच्या ४४० बनावट ब्रँण्डच्या बाटल्या बनावट देशी मद्याच्या १८०मिलीच्या ३८४बाटल्या तसेच देशी भिंगरी व संत्रा  लेबलच्या बाटल्या बनावट देशी व विदेशी दारुची बुच नामांकिता कंपनी इम्पेरियल ब्लू व मेक्डाल न. १ विस्की राँयल स्टग कंपनीचे व भिंगरी संत्रा दारूच्या बाटल्या कृत्रीम स्वाद पदार्थ  इसेन्स व फ्लेवर बँरल ड्रम एम एच ०६ बी जी ०८५२ क्रमांकाची पिकअप वाहन असा सहा लाख एकुण पन्नास हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन मोहन यशवंत काळे रा दत्तनगर राकेशकुमार केवलप्रसाद दहीया उर्फ मुन्ना राहणार ईटामा कोठार तालुका अमरपाटण जिल्हा सतना मध्य प्रदेश ह मु संगमनेर चंद्रकांत शाम पवार यांचे विरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पवार हा फरार झालेला आहे या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने नागरीकांना अवाहन करण्यात आले आहै की अशा प्रकारे अवैध बनावट देशी विदेशी दारु निर्मीती खरेदी विक्री वहातुक करत असेल तर अशी माहीती राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवावी आपले नाव गुप्त ठेवले जाईल असे अवाहन करण्यात आले आहे.

राहुरी (प्रतिनिधी) २१ जून रोजी कृषी संजीवनी सप्ताहास सुरुवात झाली. यानिमित्त पिंपळाचा मळा येथे श्री दिनेश तनपुरे यांचे कापूस पिकाच्या शेतात उपस्थित शेतकऱ्यांना 10% टक्के रासायनिक खत बचतीच्या मोहिमेअंतर्गत करावयाचे उपाययोजना यामध्ये जमीन आरोग्य पत्रिका नुसार रासायनिक खतांच्या शिफारशी ,सूक्ष्म मूलद्रव्यांचा कार्यक्षम वापर ,दोन टक्के युरियाची फवारणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी विषयी मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे व कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर,सहाय्यक कृषी अधिकारी चंद्रकांत म्हसे,शरदराव लांबे., शेतकरी अजित तनपुरे, सुरेंद्र तनपुरे ,शुभम तनपुरे ,अशोक तनपुरे ,कृणाल तनपुरे, अविनाश ढवळे ,दिनेश तनपुरें, संकेत तनपुरे व शरद तनपुरे उपस्थित होते.सदर कृषी संजीवनी सप्ताह मंडळातील सर्व गावात २१ जून ते १ जुलै पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे मंडळ  कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.

श्रीरामपूर-पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व वाढवले आहे. त्यांचे अनुकरण करीत सर्व जगभर आज योगदीन पाळला जातो. सर्वांनी तानवमुक्त जीवनासाठी योगाचे महत्व ओळखावे. योग वाद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवावे अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी व्यक्त केली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतुन 21 जुन जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून श्रीरामपूर भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील  संत गाडगे बाबा उद्यानात योग शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी बिंगले बोलत होते. प्रसिद्ध योग प्रशिक्षक अनिल कुलकर्णी, उदय वाणी व महिला प्रशिक्षक सौ. कुलकर्णी व सौ. सरोदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त  ठेवण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झाले आहे भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास 200 देशांनी स्विकारली असल्याचे अनिल कुलकर्णी म्हणाले.योग प्रशिक्षक वाणी म्हणाले, सूर्यनमस्कार व वेगवेगळ्या योगाचे महत्व पटवून सांगितले. रोगप्रतीकार शक्ती वाढवणे व मनाचे सामर्थ वाढवणे यासाठी योगसाधना उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे निमित्ताने कोरोना काळामधे अधिकाधिक लोकांनी योग साधना करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनिल कुलकर्णी, वाणी सर,सौ कुलकर्णी, सौ सरोदे यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरास शहर अध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, औ. आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनील चंदन, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, सांस्कृतिक सेल भाजपा जिल्हा अध्यक्ष बंडुकूमार शिंदे, उपाध्यक्ष विनोद वाघमारे, उद्धव गिरमे् अनिल ओबेरॉय, रवि पंडित, सलीम जहागीरदार, दिपक जाधव, अभिजीत कांबळे, शुभम बिंगले, यशराज शिंदे, अमोल जावरे, सचिन मरसाळे, कृष्णा आढागळे, राज गायकवाड, पटेल, आकाश बिंगले, सौ.रेखा निर्मळ, गायकवाड, पटेल, ओबेरॉय, शिंदे, नायर, देशपांडे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय योगदिन संयोजक बंडुकूमार शिंदे, सह संयोजक सुनील चंदन व विनोद वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार बिंगले यांनी मानले.


श्रीरामपुर  (प्रतिनिधी )- पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्याबाबत तालुका व शहर पोलीस स्टेशनला कडक सुचना दिल्या असल्या तरी श्रीरामपुर  शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असुन वरीष्ठांचे आदेशच धाब्यावर बसविण्याचाच हा प्रकार तर नव्हे ना अशी शंका नागरीकांना येत आहे जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या गुन्हेगारीचे मुळ हे अवैध धंदे असल्यामुळे ते बंद करण्याच्या सूचना सर्व पोलीस निरीक्षक यांना तीन ते चार दिवसांपासून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून किंवा सूचनांच्या आधारे देण्यात आलेल्या असल्या तरी श्रीरामपुर  शहर व तालुक्यात या आदेशाचे तिन तेरा वाजलेले पहावयास मिळत आहे गुटखा अन त्या जोडीला मटका हे खूलेआम सुरु आहेत समोर एक छोटासा पडदा लावून त्या पडद्या आड सारे काही तर खुलेआम मोकळ्या रोडवर भरचौकात जोरात चालू असुन सायंकाळ झाली की वाळू तस्कर जोरात असतात वाळू भरण्यावरुन कित्येक वेळा दोन गटात हाणामार्या झालेल्या आहेत परंतु त्या आपसात मिटलेल्या आहे ती भांडणे कुणाच्या मध्यस्थीने मिटली हा संशोधनाचा विषय आहे किरकोळ भांडणाचा विषय मारामरी नंतर खूनाच्या धमकी पर्यत या तस्करांची मजल जात आहे काही व्हाईट काँलर पुढारीही आता वाळू धंद्यात उतरले आहेत त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांनी तक्रार करावयाची तर कुणाकडे असा प्रश्न निर्माण होत आहे आता गुंडापेक्षा सर्व सामान्य नागरीकांनाच कायद्याची भिती वाटत आहे काही ठलरेल्या ठिकाणी तर गावठी दारुचा सतत घमघमाट दरवळत  असतो रस्त्याने जाणारांना पूर्वी नाक बंद करुन जावे लागायचे आता मास्क असल्यामुळे त्या परिसरातुन जाताना नाक बंद करावे लागत नसले तरी तरुण पिढी या दारुच्या अहारी जात आहे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धद्याना लागाम घालण्याची वेळ आलेली आहे शहरातील व तालुक्यातील गुटखा मटका दारु गुत्ते वाळू तस्करीस पायबंद घालावा अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) राज्यतील सर्वच जिल्हा आणि तालुकास्तरावरुन मुस्लिम सामाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी महाराष्ट्रियन मुस्लिमांचे सामाजिक, राजकीय सशक्तिकारण करणे, शिक्षा आणि रोज़गारात भागीदारी मिळविणे, तसेच न्याय व अधिकार प्राप्तीकरीता संवेधानिक मार्गाने संघर्ष करणे यासाठी महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषद राज्यभर सक्रिय आहे, ही अराजकीय एक सामाजिक संघटना असून मुस्लिम समुदायातील उपेक्षित घटकांत जनजागृतीची मोहिम आणि चळवळीत गत १८ वर्षांपासून राज्यभर कार्यरत आहे, यामध्ये डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार, साहित्यकार विचारवंत, कर्तुत्ववान गुणवंत, सामाजिक, राजकीय, अशा विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यरत आहेत,

सामाजिक कार्यांबरोबरच या संघटनेचे रोज़गार, व्यापार, औद्योगिक क्षेत्रात देखील मोठे योगदान देण्याचे प्रयत्न आहे, औद्योगिक क्षेत्रासोबतच ट्रेडिंग, मार्केटींग, मॅन्युफेक्चरिंग आणि सेवापर्दान क्षेत्रातही ही कार्य करुन सन्मानजनक रोज़गार निर्माण करुन स्वावलंबी, स्वाभिमानी, आर्थिक सक्षम, समाज निर्माण करुन राज्यासहित देशाच्या आर्थिक प्रगतीत प्रत्यक्ष सामिल होऊन उल्लेखनीय योगदान देणे यावर संघटनेचा अधिक भर आहे,

महाराष्ट्राची राजकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत स्थापन झालेली ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे,आता भव्य,दिव्य, सक्रिय प्रभावी संगठन व्हावे याकरीता कुटुंब एॅपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातुन एक लाख सदस्य संघटनेत सामिल करण्याचे अभियान सुरु आहे, संघटन बांधणी यासोबतच समाजाचे आर्थिक विकासाकरीता उद्योग, व्यावसाय,तथा ब्रांडेड प्रोडक्ट उत्पादित करणे आणि ऑनलाईन मार्केटींगमध्ये देखील मुस्लिम समाजाचा सहभाग असावा याकरीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मराठाखान हे सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत,

 श्रीरामपूर (अहमदनगर) दौऱ्यानिमित्त आले असता त्यांनी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटला भेट दिली याप्रसंगी समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक इंजि.मोहसिन शेख,अकबर शेख,समता आरटीओ अॉनलाईन सर्व्हिसेसचे संचालक सरताज शेख,लोणी येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक फारुकभाई पठाण,तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद, पत्रकार राज चौधरी,मेमन होजिअरीचे अफजल मेमन इम्रान शेख,मतीन शेख आदी.उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.मराठाखान म्हणाले की आज सर्वच व्यावसायीकांची स्थिती फार बिकट झालेली आहे,त्याच मुस्लिम सामाज हा मोठ्या संख्येने हातावरची मोलमजुरी करणारा समाज आहे, रोजचे कमावणे आणि रोजचे खाने मात्र कोवीड संकटाच्या लॉकडाऊनमुळे उत्पन्नच  खुंटल्याने त्यांच्या व्यावसाय आणि आर्थिक बाबींची मोठी वाताहत झाली आहे,कोवीड बरोबरच व्यावसायिक आणि आर्थिक अशा तिहेरी संकटात सापडलेल्या मुस्लिम सामाजास पुनः उभारी मिळावी आणि आर्थिक धडी बसावी,रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी,याकरीता

महाराष्ट्रीयन  मुस्लिम विकास परिषदेने प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले, यावेळी छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रमात पत्रकार शौकतभाई शेख यांची संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली,

पुढे बोलताना श्री.खान म्हणाले की,राज्यातील दुय्यम संख्येने असलेला मुस्लिम समाज हा एकजुट नसुन विखुरलेला आहे,या सामाजातील छोटे-मोठे अशा सर्वांना लघु व्यावसायाच्या माध्यमातून सर्वाना एकत्र आनणे, प्रत्येक जिल्हा,तालुका स्तरावर एखादे लघु उघोगाची निर्मिती करणे, यापासून मोठ्यांना नफा तर छोट्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे असे संघटनेचे धोरण आहे,

यासोबतच सर्व जाती-धर्मांमध्ये जातिय सलोखा निर्माण व्हावा, सर्वांनी एकत्र मिळुन सामाजोन्नतीचे कार्य करावे,प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या खांद्याला खादा लाऊन कामे केल्यास सर्वांचीच प्रगती होते शेवटी असेही ते म्हणाले.या छोटेखानी कार्यक्रमाचे सुत्र संचालन इंजि. मोहसिन शेख यांनी केले,तर शौकतभाई शेख यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी )-येथील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन वेळोवेळी बलात्कार केला तसेच मोबाईल मध्ये त्याचे चित्रीकरण केले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन वेळोवेळी शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले या वरुन एका जणा विरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे                                        बेलापुर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस रोहीत शाम भिंगारदीवे रा राजवाडा बेलापुर  याने राहत्या घरी बोलावुन प्रेम संबधाचे नाटक करुन शरीर संबध ठेवण्यास भाग पाडले तसेच त्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करुन ते व्हायरल करण्याची धमकी देवुन डिसेंबर २०२० पासुन आजतागायत आरोपीचे राहते घरी तसेच इतर ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केले या बाबतची फिर्यादीवरुन पोलीसांनी रोहीत भिंगारदीवे याचा विरुध्द भादवि कलम ३७६ ३५४ पोक्सो बाल लैंगिक अत्याचार कायदा या प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एस आय कृष्णा धायवट हे करत आहे.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) - जिल्ह्यात चोर्‍या, दरोडे, हत्या, गावठी दारू, मावा, गुटखा विक्री ,चंदन तस्करी, अवैध वाळू उत्खनन इत्यादी अनैतिक व्यवसायात वाढ झाल्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतली असून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा अन्यथा ठाण्याच्या प्रभारींना जबाबदार धरले जाईल असा  इशारा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खूलेआम अवैध व्यवसाय सुरुच आहेत अवैध व्यवसाय बंद करण्या बाबत नागरीकांच्या तक्रारी येवून देखील काहीच ठोस कारवाई झाली नाही पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंदे बंद करण्या बाबत सर्व पोलीस निरीक्षक यांना सुचित केले होते तरी देखील  जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरुच राहीले काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसुली सुरु झाली जिल्ह्यात वाळू माफीयांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे पोलीसांच्या आशिर्वादामुळे वाळू तस्कर महसुलच्या पथकांना देखील  दादा देइनासे झाले नागरीकांनी आंदोलन करुन देखील वाळू उपसा सुरुच आहे या अवैध धंद्यातूनच गुंडगीरी फोफावत चालली आहे अवैध धंद्याच्या वादातूनच मारामार्या खून होत आहेत हे वेळीच रोखणे गरजेचे आहे पारनेर मधील पॅरोलवरील आरोपीची हत्या, नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून हल्ला, मध्यप्रदेशातील दरोडेखोरांची कार्यरत टोळी अशा अनेक घटनांमधून पोलीस प्रशासनाबद्दलची भीती संपल्याचे संकेत मिळत आहेत. त्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा मी पाठविलेल्या पथकाकडून कारवाई झाल्यास संबंधीत ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिला आहे.अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे सर्व व्यवहार ठप्प होते. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्व उद्योग-धंदे सुरू झाले आहेत. लॉकडाऊन काळात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांनी उचल खाल्ली आहे. नदीपात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. याला महसूलसह पोलिसांचे पाठबळ मिळत आहे, असे आरोप होत आहे. वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी हप्ते मागितले आहे. या हप्तेखोरीतून अनेक पोलीस कर्मचार्यांवर लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली आहे. यामुळे पोलीस दलाची बदनामी होत आहे. अवैध दारू विक्री, मावा, गुटखा विक्री, चंदनतस्करी जिल्ह्यात सुरू झाली आहे. गावठी कट्ट्यांचा वापर करून गुन्हेगारीत वाढ होत आहे. या सर्व घटनांचा आढावा घेत अधीक्षक पाटील यांनी अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. छापेमारी करून अवैध धंद्यावर कारवाई कराव्यात, अन्यथा माझे पथकाने एखाद्या पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली आणि त्यात अवैध धंदे उघडकीस आल्यास संबंधीत प्रभारी अधिकार्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पोलीस अधिक्षक यांनी कडक कारवाईचा पावित्रा घेतल्याशिवाय अवैध धद्यांना चाप बसणार नाही.

अहमदनगर प्रतिनिधी - नगर कल्याण रोड पासुन रेल्वे स्टेशन ब्रिजपर्यंत सीना नदीपात्रातील झाडाझुडपातअनेक प्रकारचे अवैद्य अनैतिक धंदे सुरू असताना पोलिस प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषता गावठी दारूचा धंदा याठिकाणी तेजीत असून शहरात बेवारसपणे रस्त्याने हिंडणारे भिकारी जुगाारी यांचे या परिसरात मोठे वास्तव्य आहे यापूर्वीही परिसरात मृतदेह सापडले आहेत. या परिसरात काल दारू विक्रीच्या विक्रीच्या वादातुन एक घटना घडली आहे. या परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंगची आवश्यक आहे.नगर कल्याण रोड वरील सीना नदी पात्रातील परिसरात दारूच्या नशेत शाब्दिक बाचाबाची होऊन सायंकाळी सहाच्या दरम्यान दिलीप देवराम विदरकर रा. ठाणगे मळा याचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून करण्याचा मिनीनाथ उर्फ सोनू बळीराम बिज्जा रा. लोंढे बस्ती नालेगाव याने खुन केला स्थानिक गुन्हे शाखेने एक तासाच्या आत आरोपीस अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. राहुल दिलीप विदरकर यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बुधवार दि. 16 जुनला दिलेल्या फिर्यादी राहूल दिलीप विरदकर यांनी म्हटले आहे की माझे वडील नामे दिलीप देवराम विरदकर रा. ठाणगे मळा, काल सायंकाळी 6.30 दरम्यान दरम्यान नगर - कल्याण रोड, अमरधामच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाच्या खाली शेडमध्ये सोनू बळीराम बिज्जा, यास दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने व त्याच्याविरुध्द पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी जाणार या कारणावरुन आरोपी याने माझ्या वडीलांना लाकडी दांडक्याने व डोक्यामध्ये दगड घालून जिव ठार मारले आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार सपोनि सोमनथ दिवटे, संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, सागर सुलाने यांना गुप्त खबर्‍याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, गुन्हयातील आरोपी मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिज्जा रा.लोंढेवस्ती नालेगांव, अहमदनगर हा गणेश नगर. नेप्ती नाका परिसर आला असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नाम मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिंज्जा वय 27 वर्षे रा.लोंढेवस्ती नालेगांव,अहमदनगर यास ताब्यात घेवून सदर गुन्ह्याच्या अनुशगाने विचारपूस केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपीयास पुढील कार्यवाहीसाटी कोतवाली पोस्टेला हजर केल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर |प्रतिनिधी|-श्रीरामपूर शहरात एका विधवेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लग्नाचे नाटक करुन तिच्यावर वेळोवेळी त्याच्या घरी लैंगीक अत्याचार केला. तसेच फ्लॅट घेवून देतो असे म्हणून 2 लाख 80 हजार रुपये पीडित महिलेकडून घेऊन तिची फसवणूक केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एक़ा जणाविरुध्द फसवणुकीसह अ‍ॅट्रोसिटी व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील 45 वर्ष वयाच्या महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर बंटी आछडा मला म्हणाला की, माझे सोबत चोरून लग्न कर मी तुला राहण्यासाठी एक नवीन फ्लॅट घेऊन देतो, असे म्हणून आरोपी मला अशोकनगर परिसरातील एका मंदिरात घेऊन गेला. तेथे त्याने माझ्या कपाळावर कुंकू लावून तू माझ्यासोबत लग्न केले आहे असे कोणालाही काही सांगायचे नाही, असे सांगितले. बंटी आछडा घरी एकटा असल्यावर मला घरी बोलावून घ्यायचा व माझेबरोबर बळजबरीने अत्याचार करायचा.तसेच अशोकनगर येथील त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर यासह इतर ठिकाणी नेऊन अत्याचार करायचा. मला नवीन फ्लॅट घेऊन देतो असे सांगून 2 लाख 80 हजार माझ्याकडून घेऊन मला फ्लॅट खरेदी करून दिला नाही. त्यासंबंधी विचारले असता फ्लॅटऐवजी नेवासा रोडलगत एक मोकळी जागा दाखवून ही जागा खरेदी करण्याचे सांगितले. तेव्हा मी चौकशी केली असता ती जागा दुसर्‍या लोकांची असल्याचे समजले. आरोपी बंटी आछडा याने पैसे घेतले, फ्लॅट दिला नाही व पैसेही परत दिले नाही.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी बंटी मोहन आछडा याच्याविरुद्ध भादंवि कलम 376, 376(2) (न) 420 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम 3 (1) (डब्ल्यू) 3 (2) (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करत आहेत.


अहमदनगर|(प्रतिनिधी )तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वाघ याला अटक करून आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.कोतवाली पोलीस ठाण्याचा तात्कालिक पोलीस निरीक्षक विकास वाघ वादग्रस्त ठरल्यानंतर त्याची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. त्याच्या विरोधात एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर वाघ विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दुसरा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पसार असेला वाघ याला अटक करण्यात आली आहे.पहिल्या गुन्ह्यात हायकोर्टातून जामीन घेतल्यानंतर वाघ याच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करुन शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले होते. त्यानुसार तोफखाना पोलिसांच्या विशेष पथकाने नाशिक येथून वाघ याला अटक केली. त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

बेलापूर (प्रतिनिधी ) - शेतकरी व दुध उत्पादकांसाठी शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांचा  शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन जि.प.सदस्य शरद नवले यांनी केले.

जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या विशेष प्रयत्नाने जि.प. सेस फंडातून मंजूर मिल्किंग मशीन व मुक्त गोठा लाभार्थी शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, रमेश अमोलिक, भास्कर बंगाळ, अँड.राजेंद्र सोमाणी, डॉ.व्ही.आर.धिमटे, अनिल गाढे, दादासाहेब कुताळ, मच्छिंद्र खोसे, विलास भालेराव, दादासाहेब शेळके, महेश कु-हे, विशाल आंबेकर, कर्मचारी श्री.शिंदे, प्रसाद लड्डा, शेतकरी बांधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.नवले म्हणाले की, जनतेने आपल्याला दोन वेळा जि.प.सदस्य पदाची संधी दिली. त्यामुळेचआपण  कोट्यावधीचा निधी आणून विकास कामे करु शकलो . कृषी समितीच्या सभापतीपदावर काम करताना लोकांना शासकीय योजनांचा सर्वाधिक लाभ करुन दिला. आताही विकास कामासाठी अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे नवले यांनी सांगितले .

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget