सामाजिक कार्यांबरोबरच या संघटनेचे रोज़गार, व्यापार, औद्योगिक क्षेत्रात देखील मोठे योगदान देण्याचे प्रयत्न आहे, औद्योगिक क्षेत्रासोबतच ट्रेडिंग, मार्केटींग, मॅन्युफेक्चरिंग आणि सेवापर्दान क्षेत्रातही ही कार्य करुन सन्मानजनक रोज़गार निर्माण करुन स्वावलंबी, स्वाभिमानी, आर्थिक सक्षम, समाज निर्माण करुन राज्यासहित देशाच्या आर्थिक प्रगतीत प्रत्यक्ष सामिल होऊन उल्लेखनीय योगदान देणे यावर संघटनेचा अधिक भर आहे,
महाराष्ट्राची राजकीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईत स्थापन झालेली ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे,आता भव्य,दिव्य, सक्रिय प्रभावी संगठन व्हावे याकरीता कुटुंब एॅपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातुन एक लाख सदस्य संघटनेत सामिल करण्याचे अभियान सुरु आहे, संघटन बांधणी यासोबतच समाजाचे आर्थिक विकासाकरीता उद्योग, व्यावसाय,तथा ब्रांडेड प्रोडक्ट उत्पादित करणे आणि ऑनलाईन मार्केटींगमध्ये देखील मुस्लिम समाजाचा सहभाग असावा याकरीता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मराठाखान हे सध्या राज्यभर दौऱ्यावर आहेत,
श्रीरामपूर (अहमदनगर) दौऱ्यानिमित्त आले असता त्यांनी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटला भेट दिली याप्रसंगी समता फाऊंडेशनचे अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी समता कॉप्यूटर इन्स्टिट्यूटचे संचालक इंजि.मोहसिन शेख,अकबर शेख,समता आरटीओ अॉनलाईन सर्व्हिसेसचे संचालक सरताज शेख,लोणी येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक फारुकभाई पठाण,तिरंगा न्यूजचे संपादक असलम बिनसाद, पत्रकार राज चौधरी,मेमन होजिअरीचे अफजल मेमन इम्रान शेख,मतीन शेख आदी.उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.मराठाखान म्हणाले की आज सर्वच व्यावसायीकांची स्थिती फार बिकट झालेली आहे,त्याच मुस्लिम सामाज हा मोठ्या संख्येने हातावरची मोलमजुरी करणारा समाज आहे, रोजचे कमावणे आणि रोजचे खाने मात्र कोवीड संकटाच्या लॉकडाऊनमुळे उत्पन्नच खुंटल्याने त्यांच्या व्यावसाय आणि आर्थिक बाबींची मोठी वाताहत झाली आहे,कोवीड बरोबरच व्यावसायिक आणि आर्थिक अशा तिहेरी संकटात सापडलेल्या मुस्लिम सामाजास पुनः उभारी मिळावी आणि आर्थिक धडी बसावी,रोजगारांची संधी उपलब्ध व्हावी,याकरीता
महाराष्ट्रीयन मुस्लिम विकास परिषदेने प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले, यावेळी छोटेखानी सत्काराच्या कार्यक्रमात पत्रकार शौकतभाई शेख यांची संघटनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली,
पुढे बोलताना श्री.खान म्हणाले की,राज्यातील दुय्यम संख्येने असलेला मुस्लिम समाज हा एकजुट नसुन विखुरलेला आहे,या सामाजातील छोटे-मोठे अशा सर्वांना लघु व्यावसायाच्या माध्यमातून सर्वाना एकत्र आनणे, प्रत्येक जिल्हा,तालुका स्तरावर एखादे लघु उघोगाची निर्मिती करणे, यापासून मोठ्यांना नफा तर छोट्यांना रोजगार उपलब्ध करुन देणे असे संघटनेचे धोरण आहे,
Post a Comment