श्रीरामपुर (प्रतिनिधी )- पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंद्याबाबत तालुका व शहर पोलीस स्टेशनला कडक सुचना दिल्या असल्या तरी श्रीरामपुर शहर व तालुक्यात अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असुन वरीष्ठांचे आदेशच धाब्यावर बसविण्याचाच हा प्रकार तर नव्हे ना अशी शंका नागरीकांना येत आहे जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या गुन्हेगारीचे मुळ हे अवैध धंदे असल्यामुळे ते बंद करण्याच्या सूचना सर्व पोलीस निरीक्षक यांना तीन ते चार दिवसांपासून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून किंवा सूचनांच्या आधारे देण्यात आलेल्या असल्या तरी श्रीरामपुर शहर व तालुक्यात या आदेशाचे तिन तेरा वाजलेले पहावयास मिळत आहे गुटखा अन त्या जोडीला मटका हे खूलेआम सुरु आहेत समोर एक छोटासा पडदा लावून त्या पडद्या आड सारे काही तर खुलेआम मोकळ्या रोडवर भरचौकात जोरात चालू असुन सायंकाळ झाली की वाळू तस्कर जोरात असतात वाळू भरण्यावरुन कित्येक वेळा दोन गटात हाणामार्या झालेल्या आहेत परंतु त्या आपसात मिटलेल्या आहे ती भांडणे कुणाच्या मध्यस्थीने मिटली हा संशोधनाचा विषय आहे किरकोळ भांडणाचा विषय मारामरी नंतर खूनाच्या धमकी पर्यत या तस्करांची मजल जात आहे काही व्हाईट काँलर पुढारीही आता वाळू धंद्यात उतरले आहेत त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांनी तक्रार करावयाची तर कुणाकडे असा प्रश्न निर्माण होत आहे आता गुंडापेक्षा सर्व सामान्य नागरीकांनाच कायद्याची भिती वाटत आहे काही ठलरेल्या ठिकाणी तर गावठी दारुचा सतत घमघमाट दरवळत असतो रस्त्याने जाणारांना पूर्वी नाक बंद करुन जावे लागायचे आता मास्क असल्यामुळे त्या परिसरातुन जाताना नाक बंद करावे लागत नसले तरी तरुण पिढी या दारुच्या अहारी जात आहे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध धद्याना लागाम घालण्याची वेळ आलेली आहे शहरातील व तालुक्यातील गुटखा मटका दारु गुत्ते वाळू तस्करीस पायबंद घालावा अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.
Post a Comment