श्रीरामपूर-पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व वाढवले आहे. त्यांचे अनुकरण करीत सर्व जगभर आज योगदीन पाळला जातो. सर्वांनी तानवमुक्त जीवनासाठी योगाचे महत्व ओळखावे. योग वाद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनते पर्यंत पोहोचवावे अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी व्यक्त केली.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतुन 21 जुन जागतिक योग दिवसाचे औचित्य साधून श्रीरामपूर भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील संत गाडगे बाबा उद्यानात योग शिबीर उत्साहात पार पडले. यावेळी बिंगले बोलत होते. प्रसिद्ध योग प्रशिक्षक अनिल कुलकर्णी, उदय वाणी व महिला प्रशिक्षक सौ. कुलकर्णी व सौ. सरोदे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रभावी साधन सिद्ध झाले आहे भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास 200 देशांनी स्विकारली असल्याचे अनिल कुलकर्णी म्हणाले.योग प्रशिक्षक वाणी म्हणाले, सूर्यनमस्कार व वेगवेगळ्या योगाचे महत्व पटवून सांगितले. रोगप्रतीकार शक्ती वाढवणे व मनाचे सामर्थ वाढवणे यासाठी योगसाधना उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे निमित्ताने कोरोना काळामधे अधिकाधिक लोकांनी योग साधना करणे आवश्यक आहे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनिल कुलकर्णी, वाणी सर,सौ कुलकर्णी, सौ सरोदे यांचा सत्कार करण्यात आला. शिबिरास शहर अध्यक्ष श्रीरामपूर मारूती बिंगले, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, औ. आघाडी जिल्हा अध्यक्ष सुनील चंदन, युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, सांस्कृतिक सेल भाजपा जिल्हा अध्यक्ष बंडुकूमार शिंदे, उपाध्यक्ष विनोद वाघमारे, उद्धव गिरमे् अनिल ओबेरॉय, रवि पंडित, सलीम जहागीरदार, दिपक जाधव, अभिजीत कांबळे, शुभम बिंगले, यशराज शिंदे, अमोल जावरे, सचिन मरसाळे, कृष्णा आढागळे, राज गायकवाड, पटेल, आकाश बिंगले, सौ.रेखा निर्मळ, गायकवाड, पटेल, ओबेरॉय, शिंदे, नायर, देशपांडे आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय योगदिन संयोजक बंडुकूमार शिंदे, सह संयोजक सुनील चंदन व विनोद वाघमारे सर यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार बिंगले यांनी मानले.
Post a Comment