राहुरी (प्रतिनिधी) २१ जून रोजी कृषी संजीवनी सप्ताहास सुरुवात झाली. यानिमित्त पिंपळाचा मळा येथे श्री दिनेश तनपुरे यांचे कापूस पिकाच्या शेतात उपस्थित शेतकऱ्यांना 10% टक्के रासायनिक खत बचतीच्या मोहिमेअंतर्गत करावयाचे उपाययोजना यामध्ये जमीन आरोग्य पत्रिका नुसार रासायनिक खतांच्या शिफारशी ,सूक्ष्म मूलद्रव्यांचा कार्यक्षम वापर ,दोन टक्के युरियाची फवारणी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी विषयी मार्गदर्शन करण्यात आले .यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे व कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर,सहाय्यक कृषी अधिकारी चंद्रकांत म्हसे,शरदराव लांबे., शेतकरी अजित तनपुरे, सुरेंद्र तनपुरे ,शुभम तनपुरे ,अशोक तनपुरे ,कृणाल तनपुरे, अविनाश ढवळे ,दिनेश तनपुरें, संकेत तनपुरे व शरद तनपुरे उपस्थित होते.सदर कृषी संजीवनी सप्ताह मंडळातील सर्व गावात २१ जून ते १ जुलै पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे यांनी सांगितले.
Post a Comment