अहमदनगर प्रतिनिधी - नगर कल्याण रोड पासुन रेल्वे स्टेशन ब्रिजपर्यंत सीना नदीपात्रातील झाडाझुडपातअनेक प्रकारचे अवैद्य अनैतिक धंदे सुरू असताना पोलिस प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषता गावठी दारूचा धंदा याठिकाणी तेजीत असून शहरात बेवारसपणे रस्त्याने हिंडणारे भिकारी जुगाारी यांचे या परिसरात मोठे वास्तव्य आहे यापूर्वीही परिसरात मृतदेह सापडले आहेत. या परिसरात काल दारू विक्रीच्या विक्रीच्या वादातुन एक घटना घडली आहे. या परिसरात पोलिसांचे पेट्रोलिंगची आवश्यक आहे.नगर कल्याण रोड वरील सीना नदी पात्रातील परिसरात दारूच्या नशेत शाब्दिक बाचाबाची होऊन सायंकाळी सहाच्या दरम्यान दिलीप देवराम विदरकर रा. ठाणगे मळा याचा लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड घालून खून करण्याचा मिनीनाथ उर्फ सोनू बळीराम बिज्जा रा. लोंढे बस्ती नालेगाव याने खुन केला स्थानिक गुन्हे शाखेने एक तासाच्या आत आरोपीस अटक केली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. राहुल दिलीप विदरकर यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.बुधवार दि. 16 जुनला दिलेल्या फिर्यादी राहूल दिलीप विरदकर यांनी म्हटले आहे की माझे वडील नामे दिलीप देवराम विरदकर रा. ठाणगे मळा, काल सायंकाळी 6.30 दरम्यान दरम्यान नगर - कल्याण रोड, अमरधामच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाच्या खाली शेडमध्ये सोनू बळीराम बिज्जा, यास दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने व त्याच्याविरुध्द पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी जाणार या कारणावरुन आरोपी याने माझ्या वडीलांना लाकडी दांडक्याने व डोक्यामध्ये दगड घालून जिव ठार मारले आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार सपोनि सोमनथ दिवटे, संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, सागर सुलाने यांना गुप्त खबर्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि, गुन्हयातील आरोपी मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिज्जा रा.लोंढेवस्ती नालेगांव, अहमदनगर हा गणेश नगर. नेप्ती नाका परिसर आला असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नाम मिनीनाथ ऊर्फ सोनू बळीराम बिंज्जा वय 27 वर्षे रा.लोंढेवस्ती नालेगांव,अहमदनगर यास ताब्यात घेवून सदर गुन्ह्याच्या अनुशगाने विचारपूस केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर आरोपीयास पुढील कार्यवाहीसाटी कोतवाली पोस्टेला हजर केल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment