श्रीरामपूर |प्रतिनिधी|-श्रीरामपूर शहरात एका विधवेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लग्नाचे नाटक करुन तिच्यावर वेळोवेळी त्याच्या घरी लैंगीक अत्याचार केला. तसेच फ्लॅट घेवून देतो असे म्हणून 2 लाख 80 हजार रुपये पीडित महिलेकडून घेऊन तिची फसवणूक केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात एक़ा जणाविरुध्द फसवणुकीसह अॅट्रोसिटी व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहरातील 45 वर्ष वयाच्या महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, माझ्या पतीचे निधन झाल्यानंतर बंटी आछडा मला म्हणाला की, माझे सोबत चोरून लग्न कर मी तुला राहण्यासाठी एक नवीन फ्लॅट घेऊन देतो, असे म्हणून आरोपी मला अशोकनगर परिसरातील एका मंदिरात घेऊन गेला. तेथे त्याने माझ्या कपाळावर कुंकू लावून तू माझ्यासोबत लग्न केले आहे असे कोणालाही काही सांगायचे नाही, असे सांगितले. बंटी आछडा घरी एकटा असल्यावर मला घरी बोलावून घ्यायचा व माझेबरोबर बळजबरीने अत्याचार करायचा.तसेच अशोकनगर येथील त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर यासह इतर ठिकाणी नेऊन अत्याचार करायचा. मला नवीन फ्लॅट घेऊन देतो असे सांगून 2 लाख 80 हजार माझ्याकडून घेऊन मला फ्लॅट खरेदी करून दिला नाही. त्यासंबंधी विचारले असता फ्लॅटऐवजी नेवासा रोडलगत एक मोकळी जागा दाखवून ही जागा खरेदी करण्याचे सांगितले. तेव्हा मी चौकशी केली असता ती जागा दुसर्या लोकांची असल्याचे समजले. आरोपी बंटी आछडा याने पैसे घेतले, फ्लॅट दिला नाही व पैसेही परत दिले नाही.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी बंटी मोहन आछडा याच्याविरुद्ध भादंवि कलम 376, 376(2) (न) 420 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम 3 (1) (डब्ल्यू) 3 (2) (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करत आहेत.
Post a Comment