अहमदनगर|(प्रतिनिधी )तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला नाशिक येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वाघ याला अटक करून आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली. निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.कोतवाली पोलीस ठाण्याचा तात्कालिक पोलीस निरीक्षक विकास वाघ वादग्रस्त ठरल्यानंतर त्याची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. त्याच्या विरोधात एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर वाघ विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान सदर महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दुसरा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पसार असेला वाघ याला अटक करण्यात आली आहे.पहिल्या गुन्ह्यात हायकोर्टातून जामीन घेतल्यानंतर वाघ याच्या विरोधात पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करुन शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले होते. त्यानुसार तोफखाना पोलिसांच्या विशेष पथकाने नाशिक येथून वाघ याला अटक केली. त्याला दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.
Post a Comment